“रेमल” चक्रीवादळ आज किनार्यावर धडकणार
चक्रीवादळ म्हंटल की अनेकांच्या अंगाला काटा येतो, किनाऱ्य लगतच्या जिल्हयान सह लगतच्या जिल्ह्यांना पण चक्रीवादळाचा तडाका बसतो. आत्ता पुनः एकदा चक्रीवादळ भारताच्या उंबरठ्यावर आहे रेमळ नावाचे चाकरीवादळ भारताच्या पूर्वेकडील समुद्रात म्हणजेच बंगालच्या उपसागरात रविवारी रात्री म्हणजेच आज धडकण्याचे संकेत भारतीय हवामान विभागाने दिले आहे
Remal Cyclone
रेमळ नावाच्या चक्रीवादळची गती तशी ११० ते १२० किलोमीटर प्रती ताशी असू शकते व ते किनाऱ्यावर धडकू शकतो. या वेळी समुद्रात १.५ ते २ मीटर उंच लाटा उसळू शकतो. त्यामुळे पश्चिम किनारी प्रदेश, पश्चिम बंगाल तसेच बांग्लादेशाचा सखल भाग पाण्याखाली जाऊ शकतो. हवामान खात्याने मच्छीमाऱ्याना २७ मे च्या सकाळ पर्यंत किनाऱ्यावर जाण्यास बंदी केली आहे, “रेमळ“च्या प्रभावामुळे पश्चिम बंगाल, ओडिसा, मिझोरम ते बिहारपर्यंत पावसाची शक्यता आहे.
रेमळ च्या प्रभावामुळे कोलकाता विमानतळावरील विमान सेवा रविवारी दुपारी १२ ते सोमवारी सकाळी ९ वाजेपर्यंत २१ तासांसाठी बंद करण्यात आली आहे. भारतीय तट रक्षक दलाने आपत्ति निवारण कक्षाची ९ पथके किनारी भागात तैनात करण्यात आली आहे. त्याशिवाय बंगाल मध्ये NDRF च्या १२ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहे.
रेमल चक्रीवादळ
हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार पश्चिम बंगाल उडीसा व ईशान्य भारतातील काही राज्य बिहार राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने रेल्वे वाहतुकीवर देखील याचा प्रभाव पडणार आहे, व काही तासांसाठी रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे.
रेमळ चक्रीवादळचा महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचा विशेष प्रभाव पडणार नाही. या चक्रीवादळचा भारताच्या पूर्व भागातच विशेष खबरदारी घेतली जाणार आहे.