मराठी उखाणे|Ukhane Marathi|उखाणे स्त्रियांकडून घेतली जाणारी नावे|Marathi Ukhane.

मराठी उखाणे | ukhane marathi | marathi ukhane

 

उखाणे घेणे किंव्हा नाव घेणे ही हिंदू संस्कृतीत किंव्हा महाराष्ट्रियन संस्कृतीत खूप महत्वाची आणि मजेशीर गोष्ट आहे यामध्ये यमक जुळणाऱ्या शब्दांचा वापर करून वाक्य रचना केली जाते, यामध्ये दोन ओळींचे वाक्य किंव्हा चार ओळींचे वाक्य तयार केले जाते. वधूवारांना नाव घे म्हणून प्रत्येकीला लग्नानंतर तर सातत्याने आग्रह केला जातो. लग्न ठरल्यावर तर होणाऱ्या नववधूला पहिला सल्ला दिला जातो तो मराठी उखाणे पाठ करण्याचा, मग शोध सुरू होतो तो उखाण्यांचा आणि उखाणे पाठ करण्याचा. उखाण्यांची महाराष्ट्रातील परंपरा खूप जुनी आहे, वधूवर ही होणाऱ्या जोडीदारचे नाव या यमक जुळणाऱ्या वाक्यात घेते. यामध्ये बऱ्याच प्रकारचे उखाणे येतात. हे उखाणे लग्ना मध्ये घेतले जातात , त्याच बरोबर बऱ्याच कार्यक्रमात उखाणा घेण्याची परंपरा आहे .

        महिलांसाठी उखाणे | Ukhane For Female | विनोदी उखाणे | Funny Marathi Ukhane | Vat Purnima Ukhane | लग्नाचे उखाणे | Marathi Ukhane For Marriage | रोमँटिक मराठी उखाणे | Romantic Marathi Ukhane | सत्यनारायण पूजा उखाणे | Satyanarayan Pooja Ukhane | बारश्यासाठी उखाणे | Marathi Ukhane For Baby Naming Ceremony | मकरसंक्रांती सणासाठी खास उखाणे | Makar Sankranti Ukhane In Marathi |

   

उखाणे स्त्रियांकडून घेतली जाणारी नावे

 अंगणात होती तुळस तिला घालीत होते पाणी, आधी होते आईबापाची तान्ही, मग झाले…. साहेबांची राणी.

माऊलींच्या पालखीला झाली भक्तांची दाटी….. चे नाव घेते खास तुमच्यासाठी.

दह्याचे केले श्रीखंड, दुधाचा केला खवा… रावांच्या संसारात आशीर्वाद तुमचा हवा.

गोऱ्या हातावर खुलतो मेहंदीचा रंग…. चें नाव ऐकण्यात माझ्या सख्या झाल्या दंग.

पुरुष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता…. चे नाव घेते तुम्हा सर्वांकरिता.

सरस्वतीच्या दरबारात साहित्याची राशी…. चे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी.

चांदीच्या ताटात दहिभाताचा काला…. चे नाव घ्यायला आज आरंभ केला.

श्री विष्णूच्या मस्तकावर सदैव असतो शेष…. चे नाव घेऊन करते गृहप्रवेश.

संगमरवरी पहाडातून वाहते नदी नर्मदा…. रावांच्या सहवासात सुखी मी सर्वदा.

हिरा नको, पाचू नको, नको मला माणिक…. रावांच्या सुखापेक्षा मागणं नाही आणिक.

आनंदाच्या चांदण्यात संचारले मन…. रावांची प्रिती हेच माझे धन.

नाव घ्या, नाव घ्या हा तुमचा हट्टच नवा…. रावांचे नाव घ्यायला उखाणाच कशाला हवा.

रासक्रीडेमध्ये कृष्ण उडवितो रंग दाट…. रावांचे नाव घेते सोडा माझी वाट.

शिंपल्यात पडला स्वाती त्याचा झाला मोती…. नी लावली…. च्या जीवनात मंगलज्योती.

आधी पाहिले सूनमुख मग निघाली वरात…. चे नाव घेऊन प्रवेश करते…. च्या घरात.

राम लक्ष्मण सीता तीन मूर्ती साक्षात…. चे नाव घेते नीट ठेवा लक्षात.

कमळाच्या फुलाचा हार लक्ष्मीच्या गळ्यात…. चे नाव घेते सुवासीनीच्या मेळ्यात.

बाळाच्या हसऱ्या प्रवेशाने आनंदले घर…. रावांच्या संसारात पडली नवी भर.

शंकराला वाहतात बेल, मारुतीला करतात नवस…. चे नाव घेण्यास मला नाही आळस.

दारी होते कोनाडे त्यात होती पळी….. ची बायको आहे गुलाबाची कळी.

शंकराची केली पूजा गौरीची केली आराधना…. सुखी राहोत हीच माझी कामना.

बनारसचा शालू, पैठणची पैठणी…. नी दिली मला प्रेमाची खंडणी.

संसाररूपी सागरात पती-पत्नीची जोडी…. च नाव घेते लाभू दे प्रेमाची गोडी.

माहेरच्या मायेची घागर सासरच्या प्रेमाने भरली….च्या सहवासात प्रेमाची चाहूल लागली.

रामचंद्रासारखा पुत्र लाभला कौसल्यामातेला…. चे नाव घेते मानून सर्वांच्या आग्रहाला.

गणपतीला वाहतात दुर्वा, विठ्ठलाला वाहतात तुळशी….. चे नाव घेते आजच्या मंगल दिवशी.

विद्या मिळते विनयाने, विनय मिळतो नम्रतेने…. चे नाव घेते सर्वांच्या आग्रहाने.

मेहंदीच्या रंगाने रंगे दोन्ही हात…. रावांना देईन मी पदोपदी साथ.

सप्तपदीची पावलं पडली अग्नीच्या साक्षीनं,…. शी संसार करीन मोठ्यांच्या आशीर्वादानं.

हिरवा लगनी चुडा हातात, गौरीहर मी पूजते…. चे नाव घेऊन अखंड सौभाग्यवती मानते.

तांदळाचे माप लवंडले, नवगृहात आले…. च्या जीवनात सौभाग्यवती झाले.

चंदनाचा पाट, रुप्याचे ताट,….. राव भुकेले सोडा माझी वाट.

सासूबाई आहेत प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी…. चे नाव घेते लग्नाच्या दिवशी.

सोन्याचं मंगळसूत्र सोनारानं जडवलं…. चे नाव घेत नाही म्हणून मैत्रिणींनी अडवलं.

आकाशीच्या अंगणात ब्रह्मा, विष्णू, महेश…. चे नाव घेऊन करते गृहप्रवेश.

श्री विष्णूच्या मस्तकावर सदैव असतो शेष…. रावांचे नाव घेऊन करते गृहप्रवेश.

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने…. रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने.

राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न दशरथाला पुत्र चार…. रावांनी घातला मला मंगळसूत्राचा हार

गुलाबाचे फूल दिसायला ताजे,…. रावांचे नाव घेते सौभाग्य माझे.

दीन-दुबळ्यांचे गाऱ्हाणे, परमेश्वराने ऐकावे…. रावांसारखे पती मिळाले आणखी काय मागावे.

चंदेरी सागरात रुपेरी लाटा…. रावांच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा.

हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोडी…. च्या जीवनात मला आहे गोडी.

सागराला आली भरती, नदीला आला पूर…. च्या प्राप्तीसाठी आई-वडिलांना केले दूर.

चंद्राचा झाला उदय, सागराला आली भरती…. पंतांच्या हृदयात…. देवाची मूर्ती.

आपले राष्ट्रगीत आहे जनगणमन… रावांना अर्पण केले तन-मन-धन.

इंग्रजी भाषेत पाण्याला म्हणतात वॉटर…. रावांचे नाव घेते…. ची डॉटर.

इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मून…. रावांचे नाव घेते… ची सून.

गुलाबाचे फुल मधोमध पिवळे…. राव दिसतात कृष्णासारखे सावळे.

कपाळाचे कुंकू जसा चांदण्याचा ठसा…. रावांचे नाव घेते सारेजण बसा.

marathi ukhane

रातराणीचा सुगंध त्यात मंद वारा…. रावांच्या नावाचा भरला हिरवा चुडा.

खडीसाखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध…. रावांच्या संसारात स्वर्गाचा आनंद.

मंदिराचे वैभव, परमेश्वराची मूर्ती…. रावांचे नाव घेऊन करते इच्छापूर्ती.

शंकराची पूजा करते पार्वती पुढे वाकून…. रावांचे नाव घेते, सर्वांचा मान राखून.

स्वातंत्र्याच्या होमकुंडात वीरांनी घेतली उडी…. रावांच्या नावाने घातले गळ्यात मंगळसूत्राची जोडी.

इंद्रधनुष्यात असतात सप्तरंग…. रावांच्या संसारात मी आहे दंग.

पिवळा पितांबर श्रीकृष्णाच्या अंगावर घातला…. रावांच्या जीवनासाठी मी स्त्री जन्म घेतला.

पेरूची फोड दिली पिंजऱ्यातल्या पोपटाला…. रावांचे नाव घेते चंद्र – तारे साक्षीला.

नयनरम्य बागेत नाचत होता मोर…. रावांसारखे पती मिळाले, भाग्य माझे थोर.

पौर्णिमेच्या दिवशी चंद्र उगवला बरवा…. राव बसले पूजेला, मी निवडते दुर्वा.

चांदीच्या निरंजनात लावते फुलवात…. रावांच्या सोबत करते सुखी जीवनाला सुरुवात.

महादेवाच्या पिंडीवर संत्र्याची फोड…. रावांचे बोलणे साखरेहून गोड.

राजहंस पक्षी खातो मोत्याचा चारा…. रावांच्या संसारात नाही दुःखाचा वारा.

जिथे घराची स्वच्छता, तिथे घराची शोभा…. रावांच्या पाठीमागे परमेश्वर उभा.

चांदीचे पंचपाळ, त्याला सोन्याचा वेढा…. रावांचा आणि माझा सात जन्माचा जोडा.

रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास…. रावांचे नाव घेते आज दिवस आहे खास.

शिवरायांनी राज्य केले शक्तिपेक्षा युक्तीने…. रावांचे नाव घेते प्रेमभाव भक्तीने.

देवाजवळ करते मी दत्ताची आरती…. राव आहेत माझ्या जीवनाचे सारथी.

भोळ्या शंकराला बिल्वपत्रांची आवड…. ची पती म्हणून केली मी निवड.

संगीताला वाद्यवृंद चढवितो साज…. चे नाव घेते, सत्यनारायण आहे आज.

मानस सरोवरात विहार करते राजहंसाची जोडी…. च्या नावात आहे साखरेची गोडी.

तोरणा किल्ल्यावर शिवाजीने बांधले स्वराज्याचे तोरण…. चे नाव घेण्यास आपल्या आग्रहाचे कारण.

सत्यनारायण पूजीला सहस्त्र तुलसीपत्राने…. चे नाव घेते पूजेच्या निमित्ताने.

मन असावे स्वच्छ, प्रेमळ आणि पवित्र…. रावांच्या जीवनात राहावा आनंद सर्वत्र.

यमुनेच्या काठी श्रीकृष्ण वाजवितो बासरी…. च्या सहवासात मी सुखी आहे सासरी.

चैत्र, वैशाखात मोगरा फुलतो छान…. चे नाव घेऊन राखते तुमचा मान.

क्रांतिवीर होऊन गेले लोकमान्य टिळक…. च्या नावाने कुंकू लावते ठळक.

सासरची माणसं जणू दुधावरची साय…. ना जन्म देणारी, धन्य त्यांची माय.

पोथी-पुराणे वाचून बोध होतो मनाला…. रावांचे ना घेते, वटसावित्री सणाला.

श्रीस्वामी समर्थांच्या मंदिराला सोन्याचा कळस…. चे नाव घ्यायला मला नाही आळस.

साजूक तुपात नाजूक चमचा…. चे नाव घेते आशीर्वाद असू दे तुमचा.

पिवळी साडी, हिरवा चुडा, हळद कुंकू हाच सौभाग्याचा अर्थ…. चे नाव घेते सगळ्यांच्या आग्रहाप्रीत्यर्थ

बागडती फुलपाखरे, रंगीबेरंगी त्यांचे रंग…. चा व माझा संसार व्हावा अभंग.

केशरी सुपारी, कात, चुना, रंगला गोविंद विडा…. च्या बरोबर शोभतो माझा जोडा.

भरलेलं माप पायानं लवंडलं दारा…. च्या लक्ष्मीचं पाऊल पडलं घरात.

मंदिराच्या गाभाऱ्यात विठ्ठलाची मूर्ती…. रावांची होवो सगळीकडे कीर्ती.

बारश्यासाठी उखाणे | Marathi Ukhane For Baby Naming Ceremony

गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं…. रावांचं नाव माझ्या हृदयात कोरलं.

कृष्णाप्राप्तीसाठी रुक्मिणीने लिहिले पत्र…. रावांसाठी घातले मी मंगळसूत्र.

पेटी वाजे, वीणा वाजे, सतार वाजे छान…. रावांचे नाव घेते राखून सर्वांचा मान.

कुलदेवतेला स्मरून वंदन करते देवाला…. रावांचे सौभाग्य अखंड दे मला.

कपाळाला कुंकू, गळ्यात मोत्याचा हार…. रावांचे नाव घेताना आनंद होतो फार.

हंड्यावर हंडे सात, त्यावर ठेवली परात…. चे घेत… च्या घरात.

कोजागिरीच्या रात्री उमाशंकर खेळती सारीपाट…. चे नाव घेतले आता सोडा माझी वाट.

सासरच्या मंदिरात दिवा तेवतो मंद…. मुळे जीवनात फुलला सुगंध.

सुख येतं बाहेरून, समाधान येतं आतून…. च्या प्रेमाचा झरा वाहतो हृदयातून.

MARATHI UKHANE FOR FEMALES | नवरी साठी उखाणे | BEST FEMALE UKHANE

          लग्न म्हणजे वधुवारांच्या जीवनातील महत्वाचा प्रसंग, आणि या क्षणाला घेतला जाणारा उखाणा आपण आयुष्यात शेवटपर्यंत कधीच विसरू शकत नाही. म्हणूनच आज मी तुच्यासाठी घेऊन आलो आहे एकापेक्षा एक जबरदस्त उखाणे.

नवरी साठी मराठी उखाणे | marathi ukhane for female

गुळाची गोडी अन् फुलांचा सुगंध,…. रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद.

उमराच्या झाडाखाली दत्ताची साउली .…रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली.

रातराणीचा सुगंध, त्यात मंद वारा,.… रावांचे नांवाचा, भरला हिरवा चुडा.

यामिनीच्या अंगावर चांदण्याचा शेला.…रावांनी माझ्या हाती सौभाग्यकलश दिला.

मुलगा माझा कंठमणी, मुलगी माझी तन्मणी .…रावांच्या हृदयाची मी आहे स्वामिनी.

टाळ वाजे वीणा वाजे वाजे पखवाज गं,….मैत्रेयीच्या सहवासांत गाजला याज्ञ वाक्यांचा  गं.

सर्व कार्याचा पाठीराखा विघ्नहर्ता गणेश.…राव आहेत आजपासून माझ्या जीवनाचे परमेश.

पूजिला गौरीहार दिला आशीर्वाद .…च्या प्रवेशते संसारात निर्विवाद.

सप्तपदीच्या सात पावलांनी मार्ग आक्रमिते नवजीवनाचा.…च्या संसारात आशा करते आनंदाच्या.

 वृक्षवेलींच्या सान्निध्यात देहभान हरपते,.…चे नाव घेऊन आशीर्वाद मागते.

मंगलदिनी दिला सर्वांनी प्रेमाचा आहेर, .…च्या करिता सोडते आज माहेर.

संसाराच्या वेलीवर येतो मोहोर प्रीतीचा .…चे नाव घेऊन निरोप घेते सर्वांचा.

राधेच्या मनात कृष्णाचे चिंतन .…चे नाव घेऊन सोडते मी कंकण.

सत्यनारायणाची केली पूजा, घेतला भक्तीने प्रसाद .…च्या साठी मागितला आशीर्वाद.

संध्याराणीने रेखिली चंद्राची कोर.…च्या साठी मी पूजिली मंगळागौर.

अश्विनीच्या तेजाने फुलली वसुंधरा .…चे नाव घेते आज आहे दसरा.

विजयाचे तोरण उभारले चैत्रप्रतिपदेच्या दिनी .…नी घातले मंगळसूत्र अन् झाले मी सुवासिनी.

चांदण्याच्या फुलांनी सजले आकाशाचे ताट.…नाव घेते सोडा माझी पाठ.

मांगल्याच्या तेजाने अजळतो देव्हारा देवाचा.…च्या संसारात फुलो फुलोरा सौख्याचा.

 शब्द सुमने गुंफून तयार होते काव्यमाला.…चे नाव घेते ….ची बाला.

प्रीतीवीणा छेडिता होतो अनुरागाचा झंकार, .…चा करिते सुखाने संसार.

मुला साठी व मुली साठी मराठी उखाणे

प्रीतीवीणा छेडिता होतो अनुरागाचा झंकार, …चा करिते सुखाने संसार.

मेघाचा वाजे मृदुंग, विजेच्या चाले नाच,.…राव म्हणतात गुपचूप ‘दासबोध ‘वाच.

वसंताच्या आगमनाला कोकीळेची साद,.… च्या संसारात यावा सौख्याचा नाद.

वसुंधरा सजते येताच श्रावणाच्या सरी,…. नाव घेते …च्या घरी

अंबरठ्याचे माप ओलांडून,.…च्या घरची झाले सून,…. ची गृहलक्ष्मी झाले भाग्य कोणते याहून.

सौख्य प्राप्तीसाठी धरावी उद्योगाची कांस, साऱ्यांच्या आग्रहास्तव घालते …. ना जिलबीचा घास.

शांतता आणि समता हेच नेहरूंचे धोरण, ….चे नाव घेते हळदीकुंकू हेच कारण.

१९४७ साली भारताचा झाला स्वातंत्र्यसोहळा,.…रावांनी लावला मला सौभाग्य टिळा.

अंदमान बेटात सावरकरांना झाली शिक्षा .…नी घातली मला सौभाग्याची भिक्षा.

परस्पर सौख्यासाठी असते पती-पत्नीचे सर्वस्व अर्पण, देव ब्राह्मणांच्या साक्षीने ….ना केले मी जीवन अर्पण.

कर्तव्याच्या तारका चमकतात आपत्तीच्या ढगात .…ची गृहलक्ष्मी होऊन आले नव्या घरात.

प्रीत देई पाणी जीवनाच्या वल्लरीला, …ची पत्नी झाले, भाग्य आले फळाला.

सद्गुणाच्या कोंदणात सौंदर्याची शोभा .…च्या जीवनावर पसरे चैतन्याची प्रभा.

सुखसमृद्धी मंदिराला समाधानाचं सोपान.…च्या दीर्घायुष्याचे मला मिळो वरदान.

हळदीकुंकू उखाणे | Ukhane In Marathi For Haldi Kunku.

वस्त्र शृंगारी शरीर, आरोग्य शृंगारी अंतर .…च्या चरणाची सेवा घडो निरंतर.

पुष्प तेथे गंध, भाव तेथे कविता.…च्या जीवनाशी एक झाली, जशी सागराची सरिता.

भावनेत जन्मली कल्पना, फुले गुंफिली शब्दांत.…च्या पत्नीला लाभो अखंड सौभाग्य जन्मजात.

 संसाराच्या नौकेवरती पती असावे पत्नीचे साथी.… चे नाव घेता मी होई त्यांची जन्मोजन्मीची सोबती.

वाणीत असावा खडीसाखरेचा गोडवा .…चे नाव घेते आहे आज पाडवा.

चैत्रगौरीला वंदन करून मागते सौभाग्यदान.…चे नाव घेऊन राखते तुमचा मान.

सती सावित्रीचे पूजन करून वडाची करते पूजा….च्या दीर्घायुष्याशिवाय आशीर्वाद नको दुजा.

आनंदाच्या अर्मी घेऊन दसऱ्याचा आला सण.…च्या सौख्यासाठी अखंड तेजो जीवन.

व्हाल निःशंक मन, पाहून कन्येचा थाट .…ची भार्या सोडे, दादा वहिनी गाठ.

हृदय मंदिरात दिवा तेवो प्रीतीचा,.…चा संसार होवो सुखाचा.

हृदय मंदिरात दिवा तेवो प्रीतीचा.…चा संसार होवो सुखाचा.

माहेरचे संस्कार अन् सासरचे वातावरण.…च्या संसाराचे करीन मी नंदनवन.

संसारवृक्षाला येवो बहर प्रीतीचा .…च्या मुळे ठेवा लाभला सौख्याचा.

विवाह मांगल्यामुळे दोन जीवांचे घडते मीलन .…चे नाव घेऊन सोडते मी कंकण.

प्राजक्तांच्या कळ्यांना सुगंधी वास.…ना घालते करंजीचा घास.

नाशिकच्या गंगेचा चिरेबंदी घाट .…चे नाव घेते, सोडा माझी गाठ.

स्त्रियांच्या जातीने काम करावे शक्तीपेक्षा युक्तीने .…चे नाव घेते प्रेमभावे भक्तीने.

स्वच्छता नी टापटीप आरोग्याचे मूळ .…च्या जीवनासाठी सोडले चे कूळ.

देवाची मूर्ती घडविताना आनंदीत होतो शिल्पकार .…ची सेवा हाच माझा अलंकार.

सुशील सद्गुणी घरात लक्ष्मी करते वास,.…ना घालते फेणीचा घास.

औरंगाबादला प्रसिद्ध आहे वेरूळ अजिंठा लेणी, .…ना घालते घास दूधफेणी

कवीच्या परिचयात भावनांची उपरती .…चे प्रेम हीच माझी संपत्ती.

जमीन दुभंगून सीता झाली गुप्त .…ना वरून आईवडिलांना केले मुक्त.

महिलेणसाठी मराठी विनोदी उखाणे

चतुर्थीच्या दिवशी निवडते दुर्वा.…चे नाव घेते आशीर्वाद द्यावा.

पौर्णिमेच्या दिवशी चंद्र असतो आकाशात.…ची कीर्ती पसरो जगात.

 निसर्गाच्या अंतरंगात पावित्र्याचा सुवास .…च्या जोडीने करिते आयुष्यभराचा प्रवास.

हिंदमातेच्या हातात रत्न जडावाचे तोडे.…चे नाव घेते वडील माणसांपुढे,

माहेरच्या परिसरात वेचले मी ज्ञानकण, ….चे नाव घेते लक्षात असू द्या सर्वजण.

दिल्लीचे सिंहासन, पेशव्यांनी फोडले .…च्या जीवासाठी माहेर मी सोडले.

 नंदनवनात करिते कोकीळा कूजन .…चे नाव घेते झाले लक्ष्मीपूजन.

द्वारकेचा राजा पाठीराखा द्रौपदीचा .…ना घास घालते साखर – भाताचा.

ताजमहाल बांधण्यासाठी कारागीर होते कुशल .…चे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल.

वसंतऋतुमध्ये जशी येते कोकीळेची चाहूल, तसेच मी टाकते …च्या घरांत पाऊल.

लक्ष्मी शोभते दानाने, विद्या शोभते विनयाने,.… च्या संसारात मी राहते मानाने.

लक्ष्मी शोभते दानाने, विद्या शोभते विनयाने.… च्या संसारात मी राहते मानाने.

हिमालय पर्वतावर बर्फाचे खडे.…चे नाव घेते सर्वांच्या पुढे.

फुलांची वेणी गुंफितो माळी.…चे नाव घेते संध्याकाळच्या वेळी.

रातराणीच्या सुगंधाने निशिगंध झाला मोहित.…ना आयुष्य मागते प्रेमासहित.

कन्या होते माहेरी, सून म्हणून आले सास….पती मिळाले भाग्यवान ठरले मी खरी.

मानपानासाठी खोटेपणा नसावा.…च्या पत्नीने हाच नियम पाळावा.

रामचंद्रागत पुत्र जन्मला कौसल्येच्या कुशी.…चे नाव घेते आनंदाच्या दिवशी.

पहिल्याच दृष्टिभेटीत पटली जन्मोजन्मीची खूण .…चे नाव घेते सर्वांचा मान राखून.

प्रेमळ माहेर सोडताना पाऊल झाले कष्टी .…च्या जीवनात होवो सुखाची वृष्टी.

निर्मळ प्रेमाखेरीज नाही कशाची हाव .…आजच्या शुभदिनी चे घेते नाव.

जिलेबीचा गोड घास सर्वांच्या मुखी .…च्या शीतल छायेत मी आहे सुखी.

शुक्राची चांदणी गुप्त झाली ढगात …. चे नाव घेऊन सांगते मी आहे सुखात.

शेषाच्या फणीवर श्रीविष्णू झोपले सुखात.…च्या जीवनात प्रीतीची ज्योत प्रशांत.

वामन पंडितांची कविता, मोरोपंतांची आर्या .…ची आज मी झाले भार्या.

प्रेममय सहजीवनात मुटु भावनेचा बंध.…च्या मुळे संसाराला बकुल फुलांचा सुगंध.

अखंड नंदादीप देवापुढे तेवतो, .…चे नाव घेणे सुखाचा क्षण वाटतो.

चंदनाच्या झाडावर लक्ष्मी घेते विसावा.…चे नाव घेते थोरांचा आशीर्वाद असावा.

घरात असावे अंगण, त्यात असावी तुळस.…च्या जीवनावर चढवीन आनंदाचा कळस.

संसाररूपी सागराला सुखदुःखाची सावली .…ना जन्म देणारी धन्य ती माऊली.

पुण्याच्या गणपतीपुढे पसरले केवड्याचे पान .…चे नाव घेऊन राखते तुमचा मान.

सहस्त्रदल कमळात लक्ष्मीचा वास .…चा लाभो प्रेमळ सहवास.

नेत्रांच्या निरंजनात प्रीतीची लावते वात,.…च्या बरोबर संसाराला करते सुरूवात.

नेत्रांच्या निरंजनात प्रीतीची लावते वात,.…च्या बरोबर संसाराला करते सुरूवात.

जाईजुईचा वेल मांडवावर चढे .…चे नाव घेते लक्ष द्या इकडे.

संसाररूपी दिव्याची प्रीती हीच वात ….ची आहे मला जन्मोजन्मी साथ.

जिजामातेच्या पोटी शिवाजीसारखा पुत्र ….च्या करिता घालते मंगळसूत्र.

दीनदुबळ्यांची करावी सेवा आंधळ्यांना वाढावी भाकरी आजपासून मी करणार .…रावांची चाकरी

जशी आकाशात चंद्राची कोर……. पती मिळायला माझे नशीब थोर.

महिलेणसाठी उखाणे

एक दिवा दोन वाती एक शिपला दोन मोती अशीच राहु दे माझी व…रावांची प्रेम ज्योती.

सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले. …रावाचे नाव घेऊन मी सौभाग्यवति झाले

जिवनाच्या वाटेवर पाऊल नवीन ठेवते सगळ्यांचा मान राखून नाव …चे घेते.

निळ्या निळ्या आकाशात शोभुन दिसतात चंद्र-तारे;….रावांच्या संगतिने उजलेल माझे जिवन सारे.

काचेच्या बशित् आम्बे ठेवले कापुन.…रावांच नाव घेते सर्वान्चा मान राखून.

ताजमहाल बान्धायला कारागिर होते कुशल …रावान्च नाव घेते तुमच्यासाथि स्पेशल.

सांजवात लावताना येते माहेरची आठवण— रावांसाठी झाली सासरी पाठवण.

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने….चे नाव घेते पत्नि या नात्याने.

राजहंस पक्षी मोति पोवल भक्षि …चे नाव घेते सर्व आहेत साक्षि.

सूपभर सुपारी निवडू कशी, गळ्यात माळ वाकु कशी, पायात पैंजण चालू कशी…….. बसले मित्रपाशी, कपाटाची चावी मागू कशी?

साडीत साडी परागची साडी… अमुकरावांना बाबानी दिली मारुतीची गाडी.

कलीयुगात घडलाय यांच्या रुपाने चमत्कार… आमुकरावांचे नाव घेऊन सर्वांना करते नमस्कार.

मंगळसुत्राचे २ डोरले, एक सासर अन दुसरे माहेर, …रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर.

सुखद वाटते हिवाळ्यातले ऊन…. रावाचे नाव घेते.… ची सुन.

श्रावणात पडतात सरीवर सरी ….रावांचे नाव घेते हि बावरी.

रातराणीच्या सुगंधाने नीशिगंध झाला मोहित, मागते आयुष्य .…च्या सहीत.

भाऊबहिणीच्या प्रेमाचे प्रतिक आहे रक्षाबंधन, ….ना करीते मी रोजच वंदन.

भारतीय नारी पतिला देते उच्च स्थान .…चे ठेवीन पदोपदी मान.

आईच्या वेलीला आलाय बहार, .…ना घातला २७ फेब्रुवारीला हार.

नवरीसाठी मराठी उखाणे:

मुर्तीकाराने घडवली सुंदर मुर्ती, विलासरावांची वाढो सर्वदूर किर्ती.

ओम या शब्दात आहे दिव्य शक्ती….. रावांवर करते मी अमर प्रीती.

दैंन्दिन जीवनात सुद्धा भगवतगीतेला आहे महत्त्व, रामरावांसह मी करीन काहीतरी दिव्यत्त्व.

सौभाग्याचे काळे मणी घातले गळा….च्या नावाने लावीते कपाळी लाल टीळा.

अंगावरच्या शेलारीला बांधुनी त्यांचा शेला….चे नाव घेण्यास आज शुभारंभ केला.

एक तीळ सातजण खाई …ना जन्म देणारी धन्य ती आई.

चिमुकल्या ओढ्याची झाली विशाल नदी…च्या बरोबर केली सप्तपदी.

संसाराच्या सारीपटावर पडले सौभाग्याचे पान…..चा राहो चोहीकडे मान.

नव्या घरी उधळीत राहीन मराठमोळी संस्कृती ….ची झाले आज मी सौभाग्यवती.

फुल आहे गंध भाव आहे अंतरी …सह चालले सातपावलांवरी.