उखाणे | उखाणे पुरुषांकडून घेतली जाणारी नावे | marathi ukhane
उखाणे | उखाणे पुरुषांकडून घेतली जाणारी नावे | marathi ukhane
१) दारी होते अंगण अंगणात होता बदाम….च्या हाती संसाराचा लगाम.
२) भाजीत भाजी मेथीची…. आहे माझ्या प्रितीची.
३) बांबुची काठी त्याला लोखंडाचा भाला…. ने खूण केली फिरावयास चला.
४) चांदीचा पाट त्याला सोन्याचे ठसे…. ला पाहून चंद्र सूर्य हसे.
५) शोकेसच्या कपाटात ठेवला पैका…. चे नाव घेतो सर्वजण ऐका.
६) चांदीची सायकल सोन्याचे सीट…. चल जाऊ दोघेजण डबल सीट.
७) शंकराच्या पिंडीला नागाचा वेढा…. चे नाव घेतो माझी वाट सोडा.
८) पांडूरंगाच्या देवळाला सोन्याचा कळस….चे नाव घ्यायला मला नाही आळस.
९) चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण…. चे नाव घेवून सोडतो आता कंकण.
१०) गव्हात गहू बन्सी, तांदुळात आंबेमोहर…. चे नाव पटकन घेतो सांगितल्याबरोबर.
नावरदेवसाठी मराठी उखाणे
११) नाशिकची द्राक्षे नागपूरची संत्री…. आहे आजपासून माझी गृहमंत्री.
१२) काश्मीरच्या नंदनवनात गुलाबाचा गंध…. च्या जीवनात मला आहे आनंद.
१३) देवाच्या देवळात मखमली पडदा…. नाव घेतो, बोला पुंडलीक वरदा.
१४) आजचा शुभदिन उद्याची कशाला बात…. च्या बरोबर केली संसाराला सुरूवात.
१५) लग्नानिमित्त मला आली आहे ग्रीटींग तार…. चे नाव घेतो घाई आहे फार.
१६) आमच्या घरी आहे आज सत्यनारायणाची पूजा…. माझी राणी, मी तिचा राजा.
१७) संसार रूपी सागरात पती पत्निची नौका…. नाव घेतो सर्वजण ऐका.
१८) पिक्चरमध्ये पिक्चर जॉनी मेरा नाम…. चे नाव घेतो आता तुमचे काय काम.
१९) काश्मीरच्या नंदनवनात गुलाबाचा गंध…. च्या जीवनात मला आहे आनंद.
२०) खडीसाखरेचा खडा, खावा तेव्हा गोड…. च्या रुपात नाही कुठेच खोड.
लग्नासाठीचे उखाणे
२१) चंद्र आहे चांदणीच्या संगती…. आहे माझी जीवनसाथी.
२२) ताऱ्यांचं लुकलुकणं चंद्राला आवडलं….ला जीवनसाथी म्हणून निवडलं.
२३) देवाजवळ करतो मी दत्ताची आरती…. माझ्या जीवनाची सारथी.
२४) दही, चक्का, लोणी आणि तूप…. मला आवडते खूप खूप.
२५) आई-बाबांच्या शिरावर सेवेचं तोरण बांधीन…. बरोबर सुखाने मी संसार करीन.
२६) हिरवा चुडा, मंगळसूत्र गळ्यात, नेसलाय हिरवा शालू…. उभी आहे मैत्रिणींच्या मेळाव्यात, कसा मी तिच्याशी बोलू.
२७) भरल्या पंगतीत उदबत्तीचा वास…. ला देतो जिलबीचा घास.
२८) हत्तीच्या अंबारीला मखमली झूल, माझी…. नाजूक जसे गुलाबाचे फूल.
२९) संसाररूपी संसारात पती-पत्नीची नौका…. चे नाव घेतो सर्वजण ऐका.
३०) श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनूची रंगत न्यारी…. साठी केली लग्नाची तयारी.
ukhane marathi
३१) वाटीत वाटी सोन्याची…. माझ्या प्रीतीची
३२) काश्मीरच्या नंदनवनात फुलतो निशीगंध…. सोबत जीवनात मला आहे आनंद.
३३) भारत देश स्वतंत्र झाला, इंग्रज गेले पळून… चे नाव घेतो जरा पहा मागे वळून.
३४) ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल…. चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.
३५) आपल्या देशात करावा हिंदी भाषेचा मान… चे नाव घेतो, ऐका सर्व देऊन कान.
३६) नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री…. आजपासून माझी गृहमंत्री.
३७) शंकरासारखा पिता अन् पार्वतीसारखी माता.. राणी मिळाली, स्वर्ग आला हाता.
३८) इंद्राची इंद्राणी, दुष्यंताची शकुंतला…. नाव ठेवले माझ्या प्रिय पत्नीला.
३९) गुलाबाचे फूल गणपतीला वाहिले…. च्या प्रेमासाठी…. गाव पाहिले.
४०) हिऱ्याचा कंठा, मोत्याचा घाट…. च्या हौशीसाठी सगळा थाट.
marathi ukhane for male
४१) चाकणच्या किल्ल्यावर ठेवल्या फौजा,…. च्या जीवावर…. मारतो मौजा.
४२) टाळ-चिपळ्यांचा गजर, त्यामध्ये वाजे बीणा…. चे नाव घेतो सर्व जयहरी म्हणा.
४३) बांबूची काठी, त्याला लोखंडाचा भाला….. नी खूण केली फिरावयास चला.
४४) शृंगारलेला हत्ती मांडवामध्ये झुले…. वर प्रीतीची उधळितो फुले.
४५) भारतीय संस्कृतीचे प्रतीक अजिंठा-वेरूळ लेणी…. आहे माझ्या हृदयाची राणी.
४६) पुढे जाते वासरू, मागे जाते गाय…. ला आवडते दुधावरची साय.
४७) जिजाईसारखी माता, शिवाजीसारखा पुत्र…. गळ्यात बांधतो मंगळसूत्र.
४८) वीजनिर्मितीसाठी कोयनेला बांधले धरण….चे नाव घेतो आज आहे कारण.
४९) विजेचे नर्तन, ढग करती गडगड…. चे नाव घेताना, माझी होई गडबड.
५०) उगवला सूर्य, मावळती रजनी…. चे नाव सदैव माझ्या मनी.
ukhane
५१) सनई आणि चौघडा वाजतो ताल सुरांत…. चे नाव घेतो…. च्या घरात.
५२) मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा…. चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.
५३) पाण्यात भरला कलश, त्यावर आंब्याची पाने- फुले…. चे नाव घेताना चेहरा माझा खुले.
५४) आपले कल्याण आपल्याच आहे हातात…. चे नाव घेतो मित्रांच्या गोतावळ्यात.
५५) गृहिणीशिवाय घर म्हणजे अगदीच अरण्यासमान…. चे नाव घेऊन राखतो तुमचा मान.
५६) स्वप्नातल्या सुखामुळे कोणीही होत नाही राजा…. चे नाव घेतो, पहिला नंबर माझा.
५७) द्राक्षाच्या वेलीवर त्रिकोणी पान….. चे नाव घेऊन राखतो आपला मान.
५८) तूप, साखर, पोळी…. माझी अगदीच भोळी.
५९) नाव घे, नाव घे चा करू नका गजर…. चे नाव घ्यायला मी आहे हजर.
६०) ज्ञान आणि योग याच्या पेक्षा श्रेष्ठ आहे भक्ती आमच्या संसारात मी शिव तर…. माझी शक्ती.