सुविचार

    सुविचार मराठी

Marathi Suvichar –

याठिकाणी आपल्याला जवळपास 2000 पेक्षा अधिक सर्वोत्कृष्ट मराठी सुविचार संग्रह वाचण्यास मिळेल. हे मराठी सुविचार वाचून आपण आपले विचार समृद्ध करू शकता.

चांगले विचार व चांगले सुविचार आपल्याला नेहमीच प्रत्येक वेळी सकारात्मक राहण्याचा मोलाचा सल्ला देतात. ते आपल्या विचारांच्या जडणघडणीमध्ये महत्वाची भूमिका अदा करतात. ज्या व्यक्तीकडे विचारांचा भक्कम पाया असतो तो व्यक्ती नेहमीच सकारात्मक राहतो व अशा व्यक्तीच्या सानिध्यात राहण्यास इतर व्यक्तींनाही खूप आवडते.

            मनुष्याच्या आयुष्यात योग्य दिशा प्रदान करण्याचे काम चांगले सुविचार (Marathi Suvichar) करतात. निराशेच्या गर्तेत गेलेल्या व्यक्तीला पुन्हा विचारांची व सकारात्मकतेची उभारी देण्याचे काम चांगले सुविचार करतात. त्यामुळेच आमचा याठिकाणी प्रयत्न असणार आहे कि, आपल्यासाठी सर्वोत्तम व आयुष्याला योग्य दिशा दाखवणारे सुविचार उपलब्ध करून देणे. हे सुविचार आपण वाचूही शकता व आपल्या प्रियजनांना शेअर करून त्यांनाही प्रेरित करू शकता. https://marathiukhana.com

नेहमी उच्च ध्येय ठेवा,
व ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा.

समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी,
समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.

आयुष्यात कुठल्याही परीस्थितीत सुखी राहण्याचा प्रयत्न करा,
दुःखी राहिल्याने उद्याचे प्रॉब्लेम सुटणार नाहीयेत उलट आजचे सुख सुद्धा निघून जाईल.

जीवनात कितीही वाईट प्रसंग येउ द्या,
चांगलं वागणं कधीच सोडू नका, विजय हा नेहमी सत्याचाच होतो.

दोष लपवला की तो मोठा होतो
आणि कबूल केला की नाहीसा होतो.

काही गोष्टी मिळवायला वेळ लागतोच. संयम बाळगा…

आयुष्यातला खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो.

जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.

जो काळानुसार बदलतो,
तोच नेहमी प्रगती करतो.

काळानुसार बदला, नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल.

जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही
ते आयुष्यात काहीही करू शकत नाही.

वाया घालवलेला वेळ,
आपलं भविष्य बिघडवत असतं.

नेहमी तत्पर रहा,
बेसावध आयुष्य जगू नका.

वागण्यात खोटेपणा नसला की,
जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो.

कुणालाच कमी समजू नका,
ज्याला तुम्ही काच समजत असाल, तो हिरासुद्धा असू शकतो.

कष्ट ही एक अशी चावी आहे
जे नशीबात नसलेल्या गोष्टींचे सुध्दा दरवाजे उघडते.

प्रेम सर्वांवर करा पण
श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.

कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो,
तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.

लोकांना सुंदर विचार नाही, तर सुंदर चेहरे आवडतात..!!!

प्रेरणादायक सुविचार इन मराठी

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल
सांगता येत नाही.

भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि
वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून, दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती.

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं,
पण संकटाचा सामना करणं, त्याच्या हातात असतं.

तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला,
आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.

प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर म्हणजे शांत राहणे.

अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे,
किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !

केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही
तर बरीच नाती ही अहंकारानेसुद्धा तुटतात.

वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका
कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या संपतातच.

खरं जग हे वाईट लोकांमुळेच कळते.

सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटतात,
म्हणून बोलत चला.

टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ
स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.

स्वतः कमावलेल्या पैश्यानी एखादी वस्तू खरेदी करून बघा,
तुमचे शौक आपोआप कमी होतील.

जिथे प्रेम आहे तेथे जीवन आहे.

अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे
म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.

कोट्यवधी वर्षांनी एखादा सुर्य निर्माण होतो,
लक्षावधी हरीण शोधल्यावर कस्तुरीमृग सापडतो,
हजारो मोती उघडल्यावर एक मोती सापडतो,
शेकडो माणसे आयुष्यात भेटतात
पण तुमच्या सारखा एकदाच भेटतो.

प्रसिध्दी ही अशी बाब आहे,
जी कितीही मिळाली तरी,
माणसाची तहान भागत नाही.

कुठल्याच गोष्टीचा गर्व करू नका
कारण आज जे तुमच्याजवळ आहे
उद्या ते नसूही शकते.

खूप मोठा अडथळा आला की समजावं
आपण विजयाच्या जवळ आलो.

लोकं आपल्याला कॉपी करायला लागले
की समजावं तुम्ही यशस्वी झालात.

नातं तेव्हाच तोडा
जेव्हा समोरच्यासुद्धा ते नको असेल.

प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते
म्हणून सुख न शोधता समाधान शोधा,
आयुष्य खुप आनंदात जाईल.

इतरांठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका
आणि कुणीही गृहीत धरेल एवढे स्वस्त सुद्धा होऊ नका.

अश्या लोकांना शोधा,
जे तुमच्यासोबत वेळ घालावण्यासाठी नेहमी उत्सुक असतात.

suvichar

स्वप्न पाहतच असालं तर मोठीच पाहा. लहान कशाला?
कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात.

“मी आहे ना, नको काळजी करू”
असं म्हणणारी एक तरी व्यक्ती आयुष्यात असावी.

आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये;
परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे.

दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे
आणि एकटे बसण्यापेक्षा
सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे.

मैत्री अशी करा जी
दिसली नाही तरी चालेल
पण जाणवली पाहीजे..

स्वतःचा मोठेपणा सांगायचा नसतो,
सद्गुणांचा सुगंध मैलावरुन ही येतो.

अहंकारासारखा दूसरा भिकारी होणं नाही
आणि
विनम्रते सारखा अन्य सम्राट नाही.

यश प्राप्त करण्यासाठी,
यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा हि
अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा
जास्त प्रबळ असली पाहिजे.

प्रेमाने जे मिळते ते कायमचे टिकून राहते.

जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर
नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले
तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा.

नेहमीच लहान बनून राहा
प्रत्येकजण तुमच्याबरोबर बसू शकतो,
आणि इतके मोठे व्हा की
जेव्हा आपण उठाल तेव्हा कोणीही बसलेले नसेल.

विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही
केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ,
स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा
दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

थोडे दुःख सहन करुन,
दुसऱ्याला सुख मिळत असेल तर,
आपण थोडे दुःख सहन करायला
काय हरकत आहे.

कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही
हे जरी खरे असले तरी कोण
कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.

 मराठी सुविचार

नशिबात नसलेली गोष्टसुद्धा मिळवता येते
फक्त मनगटात ती मिळवण्यासाठी जिद्द असावी लागते.

मोठमोठ्या गोष्टी करणारे लोकं मोठे नसतात,
तर छोट्या-छोट्या गोष्टी समजून घेणारे मोठे असतात.

माणसानं राजहंसासारखं असावं.
आपल्याला जे पटेल तेच घ्यावं,
नाही ते सोडून द्यावं.

प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत रहा.
काय माहिती जीवनात कशाची गरज पडेल.

माणसाचं छोट दु:ख
जगाच्या मोठ्या दु:खात मिसळून गेलं
की त्याला सुखाची चव येते.

जगातील सर्वात सुदंर जोडी
तुम्हाला माहिती आहे का?
अश्रू आणि हास्य…!
कारण हे तुम्हाला फारसे एकत्र दिसत नाही,
पण ते जेव्हा दिसतात,
तो आयुष्यातला अत्यंत सूंदर क्षण असतो.

प्रसिध्दी ही अशी बाब आहे,
जी कितीही मिळाली तरी,
माणसाची तहान भागत नाही.

खूप मोठा अडथळा आला की समजावं
आपण विजयाच्या जवळ आलो.

आपली खरी स्वप्न तीच आहेत,
जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जागण्यास
आणि
सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.

जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा.
चुकाल तेव्हा माफी मागा,
अन कुणी चुकलं तर माफ करा.

नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे
कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात,
तर आयुष्यभर एकटे राहाल.

आयुष्यात तुम्ही किती माणसे जोडली
यावरुन तुमची खरी श्रीमंती कळते.
आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर
आणि
माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण पाहिजे.

आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका.
कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही,
ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच
विश्वास ठेवायला तयार होत नाही.

माझ्या खिशाला
होल काय पडला
पैशा पेक्षा जास्त तर
नाती गळून पडली…

संघर्षाच्या वाटेवर जो चालत असतो,
तोच जगाला बदलत असतो,
ज्यांनी रात्रीवे विजय मिळवला आहे,
सूर्य म्हणून तोच चमकला आहे.

ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !

समोर दिवस असो की रात्र काळजी करू नका.
फक्त एवढी काळजी घ्या की
तुमच्या मनात अंधार होऊ देऊ नका.

कुणी तरी फार छान म्हटलं आहे,
जीवनात घाबरून का जातो दुःखाने,
जीवनाची सुरुवातच होत असते रडण्याने.

दुःखातून येणारा आनंद सुखमय असतो.

घाबरटाला सारेच अशक्य असते.

शहाणा माणूस चुका विसरतो,
पण त्याची कारणे नाही विसरत.

विज्ञानाचं तंत्र शिका पण,
जगण्याचा मंत्र हरवू नका.

गरूडाइतके उडता येत नाही
म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.
केवळ योगायोग असे काहीही नाही.
जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.

भरलेला खिसा माणसाला दुनियी दाखवतो,
रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.

बिंदास हसावं दुःख काय आहे,
जीवनात कुणाला टेंशन कमी आहे.
चांगलं आणि वाईट हा फक्त एक भ्रम आहे
कारण जीवनाचं नावच कभी ख़ुशी कभी गम आहे.

प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे.
प्रेम नसताना जर कोणी सेवा केली असेल
तर ती सेवा नसते, तो व्यापार असतो.

जीवन हसत-हसत जगावं,
प्रेम आणि आनंद मिळत राहावं,
नवीन सकाळच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका;
आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.

वेळ तुमची आहे.
हवं त्याला सोनं बनवा किंवा
स्वप्न बघत झोपेत व्यर्थ करा.

जीवनात अडचणी त्यांनाच येतात
जे जबाबदारी स्वीकारायला तयार असतात
आणि
जबाबदारी स्वीकारणारे कधी हरत नसतात,
एकतर जिंकतात किंवा शिकतात.

शक्यतो कुणाचेही उपकार घेऊ नका
आणि जर का घेतले तर
त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा.

अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.

हसा आणि हसवत राहावं,
प्रत्येकाने आनंदात रहा,
माझी आठवण नाही काढली तरी चालेल
मात्र रोज तुमची आठवण काढणार.

पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले
पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात.

इतरांचा सल्ला घेऊन रस्ता सापडेल
मात्र मंजिल मिळवण्यासाठी प्रयत्न आपल्यालाच चालावं लागेल.

अंधारातच प्रकाशाची खरी किंमत कळते.

रोज सकाळी जीवनाची सुरुवात होते,
कुणा खास व्यक्तीसोबत प्रेमळ बोलणं व्ह्याव
म्हणून तुम्हाला शुभ सकाळ म्हणतोय.

सकाळी-सकाळी भरावी आनंदाची जत्रा.
ना इतरांची काळजी, ना दुनियाची पर्वा.
एक रम्य, आनंदादायी सकाळच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.

जी लोकं सरळ मनात उतरतात,
त्यांना सांभाळून ठेवा.
आणि
जी मनातून उतरतात,
त्यांच्यापासून सावध रहा.

समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी,
समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.

दृष्टीकोन हा मनाचा आरसा आहे.
तो नेहमी विचारच परावर्तीत करतो.

यशासाठी बनवलेले नियोजन अर्धवट सोडू नका,
त्यामधून काहीतरी चांगले मिळवाच.

तुम्हाला जर एखाद मोठा काम करायचं असेल
तर त्या कामावर मनापासून प्रेम करा
आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत रहा.

पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की,
ते पाप आहे असे माहीत असूनही
आपण त्याला कवटाळतो.

भेकड म्हणून जगण्यापेक्षा
शुराचे मरण कधीही चांगले.

अपयश मिळाल्यानंतर तुम्ही काय कृती करता
यावरून तुम्हाला यश मिळेल की नाही हे ठरत असते.

थेंब कितीही लहान असला तरी
त्याच्यात अथांग सागरात
तरंग निर्माण करण्याची क्षमता असते.
त्यामुळे स्वतः ला कधीही लहान समजू नका.

मोत्याच्या हारापेक्षा
घामाच्या धारांनी मनुष्य
अधिक शोभून दिसतो.

मरण जवळ आलं म्हणून
जगायचं कुणी थांबतं का !

आयुष्य पूर्ण शून्य झाल
तरी हार मानू नका
कारण त्या शून्या समोर किती
आकडे लिहायचे
ती ताकद तुमच्या हातात आहे.

जीवनाचा खरा अर्थ स्वतःला शोधण्यात नाही
तर स्वतःला घडवण्यात आहे.

सुविचार अनमोल वचन

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा
जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.

जीवनातील वाईट काळच दाखवून देते की कोण हसतं,
कोण दुर्लक्ष करत तर कोण सावरण्यासाठी येतं.

माणसाचे जगण्याचे उद्दिष्ट चांगले असले
की त्याची वृत्ती आपोआप चांगली होते.

एखाद्याला गुन्हेगार ठरविताना
त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.

काय चुकलं हे शोधाणारे आयुष्यात पुढे जातात,
कुणाचं चुकलं हे शोधणारे तिथेच राहतात.

जास्त विचार करत बसलं की
कृती करण्याची संभावना खूप कमी होऊन जाते.

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात.
एक म्हणजे वाचलेली पुस्तकं
आणि दुसरी भेटलेली माणसं.

उदात्त ध्येयासाठी केलेले बलिदान कधीही वाया जात नाही.

कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर
स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही.
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात उभे रहावे लागते.

 suvichar marathi

परीक्षा म्हणजे स्वत:च्या
आत डोकावून पाहण्याची संधी !

आपल्या प्रतिमेची काळजी घ्या,
कारण तुमच्या वयापेक्षा जास्त वय तुमच्या प्रतिमेचे आहे.

माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.

चिंतेऐवढे शरीराचे शोषण
दुसरे कोणीही करू शकत नाही.

कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.

कामात आनंद निर्माण केला की,
त्याचं ओझं वाटत नाही.

जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते
आणि
ते कोठे जमिनीवर नाही तर
आपल्या मनात रुजवावे लागते.

प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.

गुणांचं कौतुक उशीरा होतं;
पण होतं जरूर…

जीवनात कधीच कुणाला दोष देऊ नये,
कारण चांगले लोकं आनंद देतात
आणि वाईट लोकं अनुभव.

एकदा कर्तव्याच्या वाटेवरुन जायचं ठरवलं
की भावनांना विसरायचंच असतं.

अपयश मिळणं ही शोकांतिका नाही
तर यशासाठी प्रयत्नच न करणे
ही सर्वात मोठी शोकांतिका आहे.

खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची.

शांत राहणे केव्हाही चांगले कारण
जगात पाहिले तर जास्त बोलणारेच दुःखी असतात.

कोणतंही चांगल कार्य करणे सुरुवातीला अवघडच असते.

यशाच्या शिखरावर चढल्यानंतर लोकांना फक्त आपलं यश दिसतं,
आपण घेतलेले कष्ट नाही.

दृष्टिकोन खूप छोटी गोष्ट आहे
मात्र त्यामध्ये जीवन बदलावण्याचे सामर्थ्य आहे.

सुखापेक्षा दुःखामुळेच दोन ह्र्दये अधिक जवळ येतात:
म्हणुनच समदुःख हे समआनंदापेक्षा अधिक बलशाली असते.

या जगात
कुठलीच गोष्ट कायम स्वरुपी रहात नाही,
तुमचं दु:ख सुद्धा.

स्वभाव पेढ्यासारखा पाहिजे…
जो राजवाड्यात जेवढी चव देतो,
तेवढीच चव झोपडीत पण देतो.

सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो.

तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.

मुर्खांच्या चर्चेत शहाणपणाच्या गोष्टी करणे
म्हणजे मूर्खपणाच आहे.

सर्वात यशस्वी माणूस तोच
जो हसत हसत केव्हाही मरणासाठी तयार असतो.

तुमच्यावर किती लोकं विश्वास ठेवतात
किंवा ठेवत नाही हे महत्वाचं नाही
तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त महत्वाचं आहे.

वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं !
डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !

प्रयत्न करणे कधीच सोडू नका,
गुच्छातील शेवटही चावीसुद्धा कुलूप उघडू शकते.

कपडे नाही
माणसाचे विचार Branded असले पाहिजे.

प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.

माणसाला त्याचे श्रेष्ठत्त्व जातीने नव्हे
तर गुणांनी प्राप्त होते.

उठा, जागे व्हा
आणि उद्दीष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका.
हक्क आणि कर्तव्य
या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.

केवळ ज्ञान असून उपयोग नाही,
ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.

जीवन जगण्याचे दोन नियम.
पहिला फुलासारखं निखरावे
आणि दुसरा सुगंधासारखं पसरावे.

अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा.

marathiukhana.com

जिंकणारे वेगळ्या गोष्टी करत नाही
तर ते गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतात.

वेळेला व्यर्थ घालवणं म्हणजे,
वेळेची हत्या केल्यासारखं आहे.

जे प्रयत्न न करता मिळतं ते जीवनभर टिकत नाही
आणि
जे जीवनभर टिकतं ते प्रयत्न न करता मिळत नाही.

झाडावर प्रेम करणारा
माणूस सदैव प्रसन्नच असतो.

फक्त जिंकणाराच नाही तर कुठं हरावं
हे कळणारा सुद्धा महान असतो.

जो परिस्थितीनुसार बदलतो तोच समोर जातो.

सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि,
जी एकदाच खर्च करून
त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो,
पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे,
ज्यामुळे तत्काळ सुख मिळत,
परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.

या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते,
तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम
आणि तुमच्याजवळ सर्वकाही
असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.

स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका,
तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात.

चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो,
पण त्यातून यशाच्या दिशेने
जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.

प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे,
जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही
प्रेमानच वागल पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही,
तर तुम्ही चांगले आहात म्हणून.

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही.
शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.

जेव्हा तुम्ही कठीण परिश्रम करण्यास सुरुवात कराल,
तेव्हाच तुमचं आयुष्य सोपं होईल.

कामाचा खूप व्याप असतानाही
आवर्जून काढली जाणारी आठवण म्हणजेच
खरी मैत्री.

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही,
तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.

आपण स्वतःला हवी ती सवय लावू शकतो
फक्त लावायची कोणती हे आपण ठरवायचे असते.

सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि,
जी एकदाच खर्च करून
त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो,
पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे,
ज्यामुळे तत्काळ सुख मिळत,
परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.

जेवढ्या उंच शिखरावर पोहचाल
तेवढे सोबती कमी होतील.

लहान तळ्यासारखे गोड रहा,
जिथं सिंहसुद्धा खाली मान घालून पाणी पितात.

भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात;
त्याची खपली काढू नये.

प्रत्येक पाऊल योग्य नसते,
पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात
ते धेय्य नक्की गाठतात.

निंदा आणि टीका वाट्याला यायला हवी,
फक्त स्तुतीच ऐकू आली तर प्रगतीचे मार्ग बंद होत जातात.

जीवनात प्रत्येक व्यक्ती महत्वाचा असतो
कारण चांगले लोकं साथ देतात
तर वाईट लोकं अनुभव देतात.

कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही
कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.

सर्वात जास्त नाती ही
फक्त गैरसमजामुळे तुटतात.

फक्त संघर्षाच्या काळातच एकटं राहावं लागतं
बाकी चांगल्या काळात सर्वच सोबत असतात.

मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे.
ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे.

सुरुवात कशी झाली यावर
बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.

एखाद्या गोष्टीचा आरंभ केव्हा करावा
हे समजायला हवे आणि शेवट केव्हा करावा
हेही समजायला हवे.

कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही
हे जरी खरे असले तरी कोण
कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.

आपण कसे दिसतो यापेक्षा
कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.

आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते
पण
वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही.

धीर म्हणजे स्वतःचीच परिक्षा पहाणे.

यश मिळवायचं असेल तर
स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.

विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.

जर माणसाला गलिच्छ आणि
घाणेरडे कपडे घालायची लाज वाटते
तर गलिच्छ आणि घाणेरड्या
विचारांची लाज का वाटू नये ?

आपल्या नियतीचे मालक बना
पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.

मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका.

क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर
पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.

प्रत्येकाच्या मनात एक
आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.

कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच,
कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.
यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते
आणि
अपयशाने लोकांची ओळख आपल्याला होते!

ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.

स्वतःला प्रकाशमान करायचे असेल
तर सतत चमकत राहिले पाहिजे.

ज्यांना खर सांगितल्यावर राग येतो,
त्यांची मनधरणी करत बसायचे नाही.

जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा.
चुकाल तेव्हा माफी मागा,
अन कुणी चुकलं तर माफ करा.

मनासारखं यश त्यांनाच मिळत,
ज्यांच्या डोळ्यासमोर नेहमी त्यांच ध्येय असतं.

यश मिळवण्यासाठी
सगळ्यात मोठी शक्ती – आत्मविश्वास.

काही लोकं आनंद मिळेल ते काम करतात
तर काही लोकं मिळेल त्या कामात आनंद शोधतात.

अपयश मिळाल्यानंतर कोणाला काय वाटतं?
हे महत्त्वाचं नाही.
उठा पुन्हा तयारी करा आणि कधीही हार मानू नका.

आपल्या दोषांवरचे उपाय
नेहमी आपल्याकडेच असतात;
फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.

निश्चयी भिकारी हा अनिश्चयी
सम्राटापेक्षा कितीतरी श्रेष्ठ असतो.

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही,
भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

आयुष्यात पैसा हवा पण पैशात आयुष्य नको.

क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.

चांगल्या विचारांनी झालेली दिवसाची सुरुवात
तुमच्या पूर्ण दिवस आनंददायी बनवते.

भीती हे आपला मृत्यू थांबवत नाही
तर जीवन थांबवते.

यशासाठी आधी दिलेली कारणे परत कधी देऊ नका.

यश मिळवणे सोपे असते,
तर प्रत्येकानेच ते मिळविले असते.

ज्या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्ही मेहनत घ्यायला तयार आहात
ती गोष्ट नक्की तुम्हाला मिळेल.

जे कारणे देण्यात तरबेज असतात
ते क्वचितच जीवनात यशस्वी होतात.

माघार कधीच घेऊ नका
आणखी चांगलं करण्याचा प्रयत्न करा.

काही सोडायचच असेल तर
तुमच्यातील भीती सोडा, राग सोडा.

जीवनात यशस्वी होण्याचे अनेक मार्ग आहेत
मग स्वतःला मोजक्याच क्षेत्रात मर्यादित का ठेवावं.

विकास म्हणजे जुन्याला नव्यामध्ये बदलणं
आणि चांगल्याच अधिक चांगल्यात रूपांतर करणे होय.

काही व्यक्ती किंवा काही गोष्टी
तुम्हाला ध्येयापासून तात्पुरत्या दूर ठेवतीलही
पण ते ध्येय फक्त तुम्हीच मिळू शकता यावर विश्वास ठेवा.

दररोज स्वतःमध्ये छोटया-छोट्या सुधारणा करत गेल्यास,
मोठं यश लवकरच मिळते.

जीवनात शांतता हवी असेल
तर इतरांच्या गोष्टी मनावर घेऊ नका.

दुसऱ्याच्या दुःखात दुःख
आणि सुखात सुख वाटायला हवं.

रडल्याने जर दुःख टळलं असतं
तर या जगात कुणीच दुःखी नसतं.

तू बदलली, मी बदललो,
हसण्यामागील कारणे बदलली
पण रडण्यामागील कारण अजूनही तूच आहेस.

तू नसल्याची फक्त एकच खंत आहे,
कितीही हसलं तरी डोळ्यात अश्रू हे येतातच.

कुणीतरी विचारलं प्रेम केलं होतं का कधी,
मी म्हटलं अजूनही करत आहे.

अपयश मिळालं म्हणून बसून राहू नका
ते यशात बदलण्यासाठी पुन्हा प्रयत्न करा.

जर तुम्हाला माहिती आहे की काय मिळवायचं आहे
तर थांबू नका.
ते मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करत रहा.

अपयश मिळालं म्हणून काळजी करू नका
तर आजपर्यंत प्रयत्न न करता
गमावलेल्या संधींचा विचार करा.

लोक, आपण करत असलेल्या कामाला महत्त्व देत नसले
तरी तुम्ही करत असलेलं काम कधीच थांबू नका.

एखादं रोप लावल्यानंतर त्याला फुल,
फळ येण्यासाठी विशिष्ट वेळची गरज असते.
यश मिळण्यासाठी वेळ तर लागेलच,
प्रयत्न करत रहा.

तुम्ही हरला नाही तर तुम्ही शिकणार नाही
आणि तुम्ही शिकला नाही तर
तुम्ही यशस्वी होणार नाही.

आपण गुलाब असो किंवा कमळ किंवा मोगरा,
एवढं मात्र नक्की की आपलं एक वेगळं महत्त्व असतंच,
तेच शोधा.

यशस्वी लोकं ते नसतात
जे कधीच अपयशी झाले नाहीत
तर ज्यांनी कधीच प्रयत्न करणे सोडले नाही,
ते असतात.

तुमचा स्वतः विश्वास नसेल तर
लोकांच्या तरी तुमच्यावर कसा विश्वास बसेल?

आधी तुमचे विचार बदला
मग तुमचे विचार तुम्हाला बदलवतील.

आयुष्यात तुम्हांला जे हवं असेल
आणि
ते मिळवण्यासाठी तुम्ही ज्या प्रमाणात प्रयत्न करत आहात
त्यानुसारच तुम्हाला यश मिळते.

सुरुवात कशी झाली यावर
बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.

कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत;
ते मिळवावे लागतात.

अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा,
जी व्यक्ती आपल्या अंतकरणातील
3 गोष्टी ओळखेल.
हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम
आणि शांत रहाण्यामागील कारण.

मित्र परिसासारखे असावेत
म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.

माणूस कितीही महत्वाकांक्षी
असला तरी
त्याला परिस्थिति समोर
झुकाव लागत.

छंद आपल्याला आयुष्यावर
प्रेम करायला शिकवतात.

अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.

बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात
ते सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून
त्यांना वाचवतात ते असामान्य !

संकटं तुमच्यातली शक्ती,
जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच.

तलवार ही शौर्याची नव्हे;
भीतीची निशाणी आहे.

मनाची श्रीमंती ही कुठल्याही
श्रीमंतीपेक्षा मोठी असते.

जेंव्हा भविष्य धुक्यासारख अस्पष्ट दिसते,
तेव्हा आपला फोकस हा वर्तमानावर असायला हवा.

जगण्यात मौज आहेच पण
त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे.

आपल्याला मदत करणाऱ्या
माणसांशी नेहमीच कृतज्ञ राहावे.

चलबिचल करणाऱ्या शेळीपेक्षा
शांत राहणारा वाघ केव्हाही चांगला असतो.

आपल्या वयापेक्षा
आपले विचार कोणत्या वयातील आहेत
हे महत्वाचे असते.

एकत्र आलं की सुरुवात होते,
सोबत राहिलं की प्रगती होते
आणि
एकत्र काम केलं की लवकर यश मिळते.

गरूडाइतके उडता येत नाही,
म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.

दगडाला शेंदूर लावून त्याचा देव करता येईल
मात्र माणसाला कोणता रंग लावावा
म्हणजे त्याचा माणूस करता येईल.

विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही,
केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

जो मैदानात हरतो तो पुन्हा जिंकू शकतो,
परंतु मनातुन हरणारी व्यक्ती
कधीही जिंकू शकत नाही.

भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,
रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.

विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही
मात्र अशक्य गोष्टीलाही शक्य करतात.

जीवनात त्रास त्यांनाच होतो
जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि
जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही
एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.

आयुष्यात वेळेला महत्त्व द्या,
आणि
तुम्हाला महत्व नाही तिथं चुकूनही वेळ देऊ नका.

कडू असणं ही कडुलिंबाची चूक नाही,
चूक तर आपल्या जीभीची आहे
जिला फक्त गोडच आवडते.

कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही.
आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.

स्तुती ऐकायची असेल तर
संकटाला हरवाव लागेलच.

काहीतरी चांगलं करण्यासाठी
वाईट परीस्थितीमधून जावंच लागते.

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं,
पण संकटाचा सामना करणं,
त्याच्या हातात असतं.

अन्याय करणे हे पाप आणि
होणारा अन्याय सहन करणे,
किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !
कासवाच्या गतीने का होईना,
पण रोज थोडी थोडी प्रगती करा,
खूप ससे येतील आडवे,
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.

तुम्ही वाघासारखे बना
म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही.

भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो;
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो
पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.
मन ओळखणाऱ्यांपेक्षा
मन जपणारी माणस हवीत कारण,
ओळख ही क्षणभरासाठी असते
तर जपवणूक आयुष्यभरासाठी.

छत्री पावसाला थांबवू शकत नाही
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री
देऊ शकत नाही पण
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.

शत्रूने केलेले कौतुक
हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.

तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.

तुमचा आजचा संघर्ष
तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो
त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल.

प्रायश्चित्तासारखी दूसरी शिक्षा नाही.

शहाणा माणूस चुका विसरतो,
पण त्याची कारणे नाही.

उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा….?
कधी कधी वाईट विचारांचा ही करावा…

जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका.

मी माझ्यासाठी आहे त्यापेक्षा
मी कुणासाठीतरी आहे
ही भावनाच किती श्रेष्ठ !

मित्र परिसासारखे असावेत
म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.

तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली
यावरुन तुमची श्रीमंती कळते.

यशस्वी लोकांच्या चेहऱ्यावर दोन गोष्टी असतात.
एक शांतता आणि दुसरी Smile.

जूलूम सहन करणे म्हणजे सोशिकपणा नव्हे,
परमार्थही नव्हे, ती केवळ लाचारी आहे.

आपण व्यस्त राहिलं की सर्व काम सोपी होतात
तर आपण आळशी असलो की सर्वकाही कठीण असते.

माणूस नेहमी प्रगतीशील असला
तरच मोठा होण्यासाठी धडपडतो.
अल्पसंतूष्ट माणूस निष्क्रीय बनतो.

स्वतःला हे नका सांगू की संकट किती मोठं आहे
तर संकटांना सांगा की तुमची मेहनत किती जास्त आहे.

खिडकी म्हणजे आकाश नसतं.

जगाला समजून घेणं
आणि स्वतःला समजून घेणं
यात खूप मोठा फरक असतो.

वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.

जर आज तुम्ही कमाईपेक्षा जास्त मेहनत करत असाल
तर खूप लवकर तुम्ही मेहनतीपेक्षा जास्त कमाई करणार.

स्वप्न ज्यांचे मोठे असतात,
परीक्षा त्यांच्या खूप अवघड असतात.

भाकरी आपल्याला जगवते आणि
गुलाबाचं फुल कशासाठी जगायचं हे शिकवते.

तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.

कविता म्हणजे भावनांचं चित्र!

परीक्षा म्हणजे
स्वतःच्या आतमध्ये डोकावून पाहण्याची संधी.

जीभ जिंकणारा जग जिंकतो.

जिंकायची मजा तेव्हाच असते,
जेव्हा
अनेकजण तुमच्या पराभवाची वाट पाहत असतात.

गुलाब पाणी देणाऱ्या हातांना
त्याचा सुगंध चिकटल्याशिवाय राहत नाही.

जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका.

जो धोका पत्करण्यास कचरतो,
तो लढाई काय जिंकणार.

संयम नावाच्या कटू वृक्षाची फळे नेहमी गोड असतात.

संभ्रमाच्या वेळी नेहमी
आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.

दुःखातून येणारे सुख हे मधुर असते.

जीवनाला अखेरची रेषा नसते.
ते क्षितिजासारखे रुंदावणारे आहे.

अचूकता पाहिजे तर सराव महत्वाचा…
केवड्याला फळ येत नाही
पण त्याच्या सुगंधाने
तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.

तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच,
किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.

पाण्याचे थेंब फुलांना भिजवत आहेत,
वाऱ्याची थंड झूळूक मनाला मोहून टाकत आहे,
तुम्ही पण या, एक सुंदर सकाळ तुम्हाला जागी करत आहे.

स्वप्ने सत्यात आणायची असतील
तर आधी झोपेतून उठाव लागेल.
उठा मग.

 life सुविचार

 

परिस्थिती आहे तशी स्वीकारा
मात्र तुम्हाला जशी हवी तशी तयार करा.

तिरस्कार पापाचा करा;
पापी माणसाचा नको.

बरेच लोकांना जे हवे ते मिळत नाही
कारण त्यांना नेमकं काय हवं आहे
हेच त्यांना माहिती नसते.

जे स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही.
ते जीवनात काहीच करू शकत नाही.

माझं भविष्य ही माझ्या वर्तमानापेक्षा चांगल असेल
कारण ते बदलण्यासाठी मी खूप प्रयत्न करत आहे.

जर तुम्ही नेहमीच सार्वसाधारण जीवन जगण्याचा
प्रयत्न करीत असालं तर,
तुम्हाला कधीच हे उमजणार नाही कि,
तुम्ही किती असामान्य आहात.

जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका.

स्वप्न पूर्ण करण्यासाठी
स्वतःला त्याच्या बंधनात बांधा तरच ती पूर्ण होतील.

जेव्हा तुम्ही म्हणाल ‘मी हे करू शकतो’
आणि
‘हे मी नाही करू शकत’
तेव्हा तुम्ही स्वतःला ओळखलेलं असेल.

एखादं यश न मिळाल्यास बहुधा झोप लागत नाही
तर उठा आणि काहीतरी करा.

हाव सोडली की मोह संपतो
आणि मोह संपाला की दुःख संपते.

तुम्ही करत असलेल्या कामात
जर तुम्हाला आनंद मिळत नसेल
तर यश कधीच मिळणार नाही.

तुम्ही केलेल्या चूका फक्त तुम्हीच सुधारू शकता.

आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.

सोप्या मार्गाने गेले पेक्षा
ज्या मार्गाने यश मिळेल त्याच मार्गाने जावे.

अपयशाची कारणे असतात
तर यशाचे किस्से असतात.
तुम्हांला काय सांगायला आवडेल?

किती उंच उडू शकतो
हे पंख ठरवतात
तर कुठपर्यंत उंच उडायचे आहे
आपलं मन ठरवत असतो.

जर पाहिलेली स्वप्न पूर्ण होत
नसतील तर तुमचे तत्व बदलण्यापेक्षा
तुमच्या कामाची पद्धत बदला,
कारण झाडे नेहमी आपली पान
बदलतात मूळ नाही…

जे नजरेतून उतरलेत,
त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही.

मदत करण्यासाठी पुढे केलेला एक हात
हा प्राथेनेसाठी जोडलेल्या
दोन हातांपेक्षा आधिक उपयुक्त असतो.

मोत्याच्या हारापेक्षा
घामाच्या धारांनी
मनुष्य अधिक शोभून दिसतो.

तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे,
त्याविषयी कमी बोला,
आणि
ज्या विषयाची माहिती नाही, त्या विषयी मौन पाळा.

आनंद तुमच्या शहाणपणावर अवलंबून असतो
तर तुमच्याजवळ काय आहे यावर नाही.

सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.

विचार कराण्यासाठी वेळ द्या.
पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की
विचार करणे थाबंवा
आणि स्वतःला कार्यात झोकून द्या.

जीवनात अडचणी दररोज नव्या येतात,
जिंकतात तेच ज्यांचे विचार
आणि कृती मोठ्या असतात.

खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे
अपूर्ण राहतात तो म्हणजे,
लोक काय म्हणतील?

आशा हीच जीवनाची
सर्वात मोठी शक्ती असते !

असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात.
तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते,
त्याच्याकडे ठाम विचार असल्याने
त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि
तो शूर असल्याने त्याला कशाचीही पर्वा, भीती नसते.

नवीन विश्वासासोबत,
उमलणाऱ्या फुलांच्या सुगंधासोबत तुमचा दिवस सुरु व्हावा
एका चांगल्या हसऱ्या चेहऱ्यासोबत.

जगू शकलात तर चंदनासारखे जगा;
स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या.

अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.

आज आराम करून
आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा,
शैक्षणिक जीवनात कष्ट करून
आयुष्यभर आरामात जगणं
कधीही चांगलं…

आपल्या ज्ञानावर आवश्यकतेपेक्षा जास्त
विश्वास ठेवणे मूर्खपणाचे आहे.

काळ हे दु:खावरील सर्वात मोठे औषध आहे.
अश्रुंनी भरलेले डोळेही काळ पुसून टाकतो.

कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर
स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही.
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात उभे रहावे लागते.

समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.

अहंकारात सर्वात वाईट गोष्ट
हि आहे कि, अहंकार तुम्हाला
हे कधीच जाणवू देत नाही कि
तुम्ही चुकीचे आहात…

आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात
की तुमचा उद्याचा दिवस
त्याने चोरलाच म्हणून समजा.

प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी
आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरी
एका क्षेत्रात सतत उगळावा लगतो.
मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.

बाह्यशत्रूपेक्षा बऱ्याच वेळी
अंतःशत्रूचीच अधीक भीती असते.

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.

चुका, अपयश आणि नकार
हा प्रगतीचा भाग असतो.

परिस्थितिला शरण न जाता
परिस्थितीवर मात करा.

जिंकणे निश्चित असेल तर कायर सुद्धा लढू शकतात.
बहादूर तर ते असतात जे
हार समोर दिसत असतानासुद्धा मैदान सोडत नसतात.

सकाळी उठल्यावर सर्वांजवळ दोन पर्याय असतात.
(एक) उठा आणि आपले स्वप्न पूर्ण करा.
(दोन) झोपत रहा आणि स्वप्न बघत रहा.

कुठलीही अशक्य गोष्ट
ती मिळेपर्यंतच कठीण असते.

फ़ळाची अपेक्षा करुन
सत्कर्म कधीच करु नये.

आनंद हा आपण कोण आहोत?
आणि आपल्याकडे काय आहे?
यावर अवलंबून नसून आपल्या विचारानुसार
तो आपल्याला हळूहळू कळत असतो.

उशीरा दिलेला न्याय हा
न दिलेल्या न्यायासारखा असतो.

आयुष्यात कितीही दुःख असू द्या,
ते किती कठीण असू द्या,
कधी हार मानू नका
या जगात कोणतीही गोष्ट कायमची राहत नाही,
दुःखही हळूहळू कमी होईल.

हिंसा हे दुर्बलांचे शस्त्र आहे,
अहिंसा हे सबलांचे.

तुमच्या मनातील भीतीवर कधीच विश्वास ठेवू नका,
कारण तिला तुमच्यातील क्षमता माहिती नाही.

तुम्ही कोण आहात
यापेक्षा तुमचं ध्येय काय आहे
महत्वाचं आहे.

चांगला माणूस घडवणे
हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.

खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे
अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?

वाईट निर्णयामुळे अनुभव येतात
आणि अनुभवामुळे चांगले निर्णय घेता येतात.

आनंदी राहण्याचे कारण लवकर शोधा,
नाहीतर जीवन दुःखाच्या संधी लवकर तयार करते.

एखादं स्वप्नं खूप प्रयत्न केल्यानंतर सुद्धा पूर्ण नाही झालं
तेव्हा दुसरं स्वप्न पाहून ते पूर्ण करण्यासाठी
जेव्हा माणूस पुन्हा पाय रोवून उभा राहतो
त्याला जीवन म्हणतात.

एखाद्याला गुन्हेगार ठरविताना
त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.

आपण चंदन असल्याची घोषणा
चंदनाला कधीच करावी लागत नाही.
त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.

प्रामाणिकणा पेक्षा कोणताही मोठा वारसा नाही.

चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.

क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर
पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.

ज्यांना स्वप्न पाहायची असतात
त्यांना रात्र मोठी हवी असते
ज्यांना स्वप्न साकार करायची असतात
त्यांना दिवस मोठा हवा असतो.

तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा
कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो.

जगा मधील सर्वात महागडे
Gift म्हणजे वेळ…
कारण तुम्ही जेव्हा समोरच्या व्यक्तीला
तुमची अशी वेळ देता जी पुन्हा तुमच्या आयुष्यात
येणारी नसते.
अश्रु येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.

राजाला फक्त राज्य मानते,
तर बुध्दीवंताला संपूर्ण विश्व.

आयुष्यात प्रेम करा ;
पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.

पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.

काही लोक हे
आगीसारखे असतात…
विनाकारण जळत राहतात.

रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय – मौन !

यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते,
पण समाधान हे महाकाठीन,
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा
दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते.
यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग
अजून तयार व्हायचा आहे.

मनुष्याचे मोठेपण हे त्याच्या वयावर नव्हे,
तर कर्तृत्त्वावर अवलंबून असते.

तुमच्या उपस्थितीची जाणीव
आणि अनुपस्थितीची उणीव
भासणे म्हणजे तुमचे अस्तित्व होय.

विद्या विनयेन शोभते ॥

चेहरा सुंदर असला म्हणजे माणूस चांगलाच
असेल असं होत नाही, त्यासाठी मन
सुंदर असावं लागतं.

हात उगारण्यासाठी नसतात;
उभारण्यासाठी असतात.

आपल्यासाठी कुणीही नसले तरी
आपण सर्वांसाठी आहोत,
ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी.

जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.

स्वतःची चूक स्वतःला
कळली की बरेच प्रश्न सुटतात.

कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.
आयुष्यात प्रेम करा ;
पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.

जीवनातील काही पराभव हे
विजयाहूनही अधिक श्रेष्ठ असतात.

चुकतो तो माणूस
आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !

जीवन जगण्याची कला
ही सर्व कलांमधे श्रेष्ठ आहे.

योग्य गोष्टी करण्यासाठी वेळ
नेहमीच योग्य असते.

सौंदर्य हे वस्तूत नसते;
पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.

आपला एक RULE आहे
जिथे माझं चुकत नाही
तिथे मी झुकत नाही.
प्रत्येकाच्या मनात एक
आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.

जीवन खूप अडचणीत व्यस्त आहे,
तरी पण ते मस्त आहे.

अयशस्वी होतात ते सर्व प्रयत्न,
जे मनापासून केल्या जात नाहीत.

जगात तेच लोकं काहीतरी विशेष करतात,
ज्यांना लोकं म्हणतात तू काहीच करू शकत नाही.

तुमच्या ध्येयावरून
जग तुम्हाला ओळखत
असत.

“मी”पणा आला कि
कमीपणा घ्यायला कोणी
तयार होत नाही.

स्वतःच अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय
आपल्या उपस्थितिची दखल घेतली जात नाही.

कासवाच्या गतीने का होईना,
पण रोज थोडी थोडी प्रगती करा,
खूप ससे येतील आडवे,
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.

माझे तर डोळे पण त्यानेच उघडले,
ज्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला होता.

विज्ञानाचं तंत्र शिका
पण जगण्याचा मंत्र हरवू नका.

कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे
धावलात तर हक्क दुर पळतात.

फ़ळाची अपेक्षा करुन
सत्कर्म कधीच करु नये.

आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फ़ार दूर्मिळ असते.

जो स्वतःला ओळखत नाही,
तो नष्ट होतो.

कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.

मूर्खांना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच !

उशीरा दिलेला न्याय हा
न दिलेल्या न्यायासारखा असतो.

शारीरिक सौदर्य कालांतराने नष्ट होते
पण आत्मिक सौदर्य कधीच नष्ट होत नाही.

धैर्यहीन मनुष्य
तेलहीन दिव्यासारखा असतो.

आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते,
फक्त आपले विचार सकारात्मक पाहिजेत.

उद्याचं काम आज करा
आणि आजचं काम आत्ताच करा.

यशाची गुरुकिल्ली म्हणजे
स्वतः ला ओळखणे.

नेतृत्व आणि कर्तुत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही,
ते स्वतः लाच निर्माण करावे लागते.

जीवनात पुढे जायचे असेल तर
आपल्या अनावश्यक गरजा
वाढणार नाहीत याची काळजी घ्या.

तुमच्या स्वप्नांवर मेहनत घ्या…
मग
आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही.

स्वतःला कमजोर समजणे
हि मोठी चूक आहे.

प्रत्येक लहान गोष्टीमध्ये केलेली सुधारणा
ही मोठ्या यशाच्या जवळ घेऊन जाते.

केवळ योगायोग असे काहीही नाही.
जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.

जर हरायचीच भीती वाटत असेल
तर जिंकण्याची आशा पण सोडून द्या.

कधी कधी आयुष्य आपल्याला हवं ते देत नाही
मात्र ते काम नक्की देतो जे आपण करू शकतो.

सर्वात सुंदर आश्रयस्थान म्हणजे ईश्वर.

जगात प्रत्येकाकडे 24 तास असतात,
ज्यांना यशस्वी व्हायचे असेल,
ते त्याचा योग्य प्रकारे वापर करतात.
भविष्याचा अंदाज घेण्याचा
उत्तम मार्ग म्हणजे
तो तयार करणे.

नवं काहीतरी शिकण्यासाठी
मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.

कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही,
त्यासाठी मेहनतिचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो.

ज्यांच्याकडे एकट्याने चालण्याचे धैर्य आहे
त्यांच्या मागे एक दिवस काफिला असतो.

आपण जोवर काही करत नाही
तोवर सर्व अशक्य दिसते.

वैराने वैर वाढेल,
परंतु प्रेमाने वैर कमी होईल म्हणून
आपल्या शत्रुवरही प्रेम करायला शिका.

जर वाईट सवयी वेळेत बदलल्या नाहीत,
तर त्या सवयी आपला वेळ बदलतात.

स्वतःची वाट स्वताच बनवा,
कारण
इथे लोक वाट दाखवायला नाही तर
वाट लावायला बसलेत.

आयुष्यात काही शिकायचे असेल
तर कठीण परिस्थितीतही शांत राहणं शिका.

माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.

विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.

शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे.

कुणीही चोरू शकत नाही
अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.

आवड असली की सवड आपोआप मिळते.

समुद्रात कितीही मोठे वादळ आले
तरी
समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.

आपण जे पेरतो तेच उगवतं.

सत्याने मिळतं तेच टिकतं.

सरावानेच अचूकता निर्माण करता येते.

गरज ही शोधाची जननी आहे.

जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.

जिथं आपली कदर नाही,
तिथं कधीही जायचं नाही.

जीवन सोपं नसते तर त्याला सोपं बनवावं लागते.
कधी लक्ष देऊन तर कधी दुर्लक्ष करून.

अंथरूण बघून पाय पसरावेत.

त्यांच्यासाठी आवर्जून आनंदी राहायचं
जे आपल्याला आनंदात पाहू शकत नाही.

काही गोष्टी ह्या फक्त प्रयत्न करून मिळत नाही
तर वेळेनुसार आपसूकच मिळतात.

aaj ka suvichar

आपली बाग सजवताना दुसऱ्यांची
फुले विस्कटणार नाहीत याची काळजी घ्या.

माझ्या चुकीच्या गोष्टी मला सांगा
कारण त्या मला सुधारायच्या आहेत इतरांना नाही.

जीवन हे मोबाईल मधील गेम सारखं झालं आहे
एक लेवल पूर्ण केल्यावर पुढे त्यापेक्षा आणखी कठीण लेवल असते.

हाव सोडली की मोह संपतो
आणि मोह संपाला की दुःख संपते.

न्यायाची मागणी करणाऱ्याने
स्वतः न्यायी असले पाहिजे.

कुणाला आपलंस करायच असेल तर
वरवरुन करण्यापेक्षा
हृदयाने आपलंस करावं…
आणि
कुणावर रागवुन बसत राहायच असेल तर
हृदयापासुन रागवण्यापेक्षा
वरवरुन रागवत राहावं.

जो मूळ सोडून फाद्यांचा शोध घेतो तो भरकटतो.

जर पळून पळून थकला असेल
तर चालत राहा.
पण थांबा तेव्हाच जेव्हा तुम्ही तुमचे लक्ष्य गाठाल.

एखादी गोष्ट मिळवण्यासाठी एखादा दिवस किंवा वर्षही लागेल.
मात्र जे मिळवायचे आहे त्याचा मार्ग नक्कीच मिळेल.

दु:ख कवटाळत बसू नका;
ते विसरा आणि सदैव हसत रहा.

जीवनाची खरी सुरुवात तेव्हाच होते
जेव्हा आपण आपला कम्फर्ट झोन सॊडतो.

दररोज सकाळी उठल्यानंतर स्वतःला ही आठवण करून द्या,
की मला जे मिळवायचे आहे, ते मी मिळवू शकतो.

ज्याच्या डोळ्यात आत्मविश्वासाचे अंजन असते;
तो कूठल्याही काळोखातून सहज मार्ग कढतो.

भूतकाळातील अनुभव आणि भविष्यातील प्रेरणा
घेऊन आपण वर्तमानात हवं ते मिळू शकतो.

सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत;
काही सोडून दिले की आपोआप सुटतात.

कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही,
आणि
यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.

थोडे दुःख सहन करुन,
दुसऱ्याला सुख मिळत असेल तर,
आपण थोडे दुःख सहन करायला
काय हरकत आहे.

संकटं तुमच्यातली
शक्ती, जिद्द
पाहण्यासाठीच येत असतात.
सौंदर्य हे वस्तूत नसते,
पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.

जे उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघतात
व ती पूर्ण करण्यासाठी धडपडतात
त्यांचे जीवन यश मिळेपर्यंत कधीच सोपं नसतं.

तुझ्या बोलण्यावरून एवढं तरी समजलं की,
तू आता कुणा दुसऱ्याची भाषा बोलत आहेस.

भावनेने मनाला जिंकता येते,
प्रेमाने रागाला जिंकता येते,
आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते,
धीराने अपयशाला जिंकता येते
तर माणुसकीने माणसाला जिंकता येते.

बचत म्हणजे काय
आणि ती कशी करावी
हे मधमाश्यांकडून शिकावं.

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही,
ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

यश मिळवण्यासाठी
सगळ्यात मोठी शक्ती – आत्मविश्वास.

स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता !

चुकीचा व्यवहार माणसं तोडतो
म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.

कितीही मोठा पाठिंबा असला
तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या
रक्तातच जिंकण्याची हिंमत
आणि लढण्याची धमक असते…

रागावून तूमची शक्ती वाया घालवू नका .
शहाणपणाने काम करा.

जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही,
तो जगावर काय प्रेम करणार !

आधी विचार करा;
मग कृती करा.

जो स्वत: कुणाचातरी गुलाम असतो
त्यालाच दुसऱ्यावर हुकुमत गाजवाविशी वाटते.

अपयशाने खचू नका;
अधिक जिद्दी व्हा.

क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.
आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल
असे कधीही वागू नका.

निघून गेलेला क्षण
कधीच परत आणता येत नाही.

स्तुतीने चांगली माणसे सुधारतात,
तर वाईट माणसे बिघडतात.

ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहे
त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे.

जशी दृष्टी तशी सृष्टी.

परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय
कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.

उद्याचं काम आज करा
आणि आजचं काम आत्ताच करा.

प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.

हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे;
मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची !

जीवनातील सर्वात मोठा आनंद म्हणजे ते मिळवणे,
जे तुम्ही मिळू शकत नाही, असं लोकं म्हणतात.

ज्या व्यक्तीजवळ समाधान, सहनशीलता
आणि
संयम असतो तो व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकतो.

टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही.

मोठी स्वप्ने पाहणारेच,
मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.

स्वतः कमावलेल्या पैश्यांनी फक्त गरजा पूर्ण होतात
शौक नाही.

जो गुरुला वंदन करतो;
त्याला आभाळाची उंची लाभते.

गुलाबाला काटे असतात असे म्हणून
रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो
असे म्हणत हसणे उतम !

सुंदर सुविचार मराठी

यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.

लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते.
तोंडावर ओढुन घ्यावी तर
लगेच खाली पाय उघडे पडतात.

क्षमा चूक करणाऱ्याला दिली जाते…
धोका देणाऱ्याला नाही…
गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.

क्रांती हळूहळू घडते;
एका क्षणात नाही.

हिंसा हे दुर्बलांचे शस्त्र आहे,
अहिंसा हे सबलांचे.

सदगुणांसाठी दुसऱ्याकडे बघा
व दुर्गूणांसाठी स्वतःवर नजर ठेवा.

कर्तव्याची दोरी नसली की,
मनाचा पतंग कुठेही फडफडत राहतो.

जगी सर्व सुखी असा कोन आहे;
विचारी मना तुच शोधूनी पाहे.

स्वातंत्र्य म्हणजे संयम; स्वैराचार नव्हे.

मनाची श्रीमंती ही कुठल्याही
श्रीमंतीपेक्षा मोठी असते.

पिंजऱ्यात कोंडून पाखरं
कधीच आपली होत नाहीत.

जग तेच लोक बदलतात जे तसा विचार करतात
आणि त्यावर कृती सुद्धा करतात.

भित्री माणसे मरण्यापुर्वी अनेकदा मरतात
पण शूर माणसे एकदाच जन्मतात
आणि एकदाच मरतात.

कामात आनंद निर्माण केला की
त्याचं ओझं वाटत नाही.

मी अजून मला हवं ते मिळवलं नाही
पण कालच्यापेक्षा ‘आज’ थोडा ध्येयाच्या जवळ नक्की गेलो आहे.

जर तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण नाही केले
तर समोरचा तुम्हाला त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल.

जो गुरुला वंदन करतो;
त्याला आभाळाची उंची लाभते.

आयुष्यात अपयशी झालेल्या बहुतांशी लोकांनी
त्या वेळी माघार घेतलेली असते,
ज्यावेळी ते यशाच्या अगदी जवळ असतात.

जेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात
तेंव्हा समजून घ्यावं की,
तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात.

आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला
रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि
सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.

कधीच कुणाला बेकाम समजू नये
कारण बंद घड्याळसुद्धा दिवसातून
दोन वेळा बरोबर वेळ दाखवते.

अनेकवेळा आलेले अपयश
हे एका यशाने संपून जाते.

न हरता, न थकता न थाबंता
प्रयत्न करणाऱ्यांसमोर
कधी कधी नशीब सुध्दा हरत.

जिथे तुमची हिम्मत संपते,
तिथून तुमच्या पराभवाची सुरुवात होते.
कडू घोट प्रेमळ
माणसाच्या हातून दिल्यास
तो कमी कडू लागतो.

कावळ्याच्या मरणाचे वाईट वाटत नाही;
मात्र मोर मेला तर आपण हळहळतो.
कारण सौंदर्य नष्ट होते.

संयम म्हणजे काय?
एक युद्ध….. स्वतः विरूद्ध !

आपले सत्यस्वरुप सिध्द करण्यास सोन्याला
अग्नीत शिरुन दिव्य करावे लागते
व हिऱ्याला घणाचे घाव सोसावे लागते.

एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो
म्हणून
नेहमी नवे विचार मिळवत रहा.

आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो,
माशाप्रमाणे, समुद्रात पोहायला शिकलो
पण जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो का?

यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग
अजून तयार व्हायचा आहे.

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात.
एक म्हणजे वाचलेली पुस्तकं
आणि दुसरी भेटलेली माणसं.

सिंह हे शिकार करण्याचे स्वप्न पाहत बसत नाही
तर ते जातात आणि शिकार करतात.

तुम्ही हरला म्हणजे सर्व संपले असे नाही
तर संपेल तेव्हा,
जेव्हा तुम्ही माघार घ्याल.

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही,
भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

स्वतःला ओळखणे म्हणजे
स्वतःला स्वतःमधील माहित नसलेले सामर्थ्य माहिती होणं.

कोणत्याही कामाला सुरुवात आजच करा.
कधी कधी उद्याचा अर्थ ‘केव्हाच नाही’ असा पण होतो.

मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे.
ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे.

प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी
आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरी
एका क्षेत्रात सतत उगळावा लगतो.

जेव्हा तुम्हाला थकल्यासारखे वाटेल
तेव्हा प्रेरणा देणाऱ्या गोष्टी आठवा
आणि
जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास वाटणार नाही
तेव्हा तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना आठवा.

यशस्वी लोक काम करत राहतात
ते चूकाही करतात
पण ते कुठलेही काम अर्ध्यावर सोडत नाही.

आपल्या नियतीचे मालक बना
पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.

जे तारुण्यातील दिवस झोपेत घालवतात
त्यांचे म्हातारपनातील दिवस खूप वाईट असतात.

पुस्तकामधील धड्यापेक्षा
आयुष्याने दिलेलं धडे जास्त लवकर समजतात.

आपलाही कोणाला कंटाळा येऊ शकतो
ही जाणीव फार भयप्रद आहे.

मन ओळखणाऱ्यांपेक्षा
मन जपणारी माणस हवीत कारण,
ओळख ही क्षणभरासाठी असते
तर जपवणूक आयुष्यभरासाठी.

दुसऱ्यांना अडचणीत आणून
तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकत नाही.

या जगात सर्वात सोपी
आणि
निरुपयोगी गोष्ट म्हणजे विनाकारण चिंता करणे.

जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते
त्याचा तिरस्कार कधीच करू नका.
कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला
उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.

कधी कधी प्रयत्न करत असताना तुम्हाला
अपयशाची भीती वाटेल
पण घाबरू नका तुम्ही जिंकाल किंवा शिकाल.

भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो;
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो
पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.

तुमच्यात असणाऱ्या क्षमतेपेक्षा
तुमची ध्येय कधीच कमी असायला नको.

हरीणच्या मतानुसार सिंह कधीच झोपत नाही
म्हणून हरीण सदैव सतर्क असते.

तुम्ही जिथे असाल तिथून सुरुवात करा.
तुमच्या जवळ जे असेल त्याचा वापर करा
आणि ते करा जे तुम्हाला जमतं.

कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच,
कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.

आपण किती समोर आलो आहोत
फक्त यासाठीच मागे वळून पहा.

संकटांना घाबरून मागे फिरायचे
की धैर्याने त्यांना सामोरे जायचे?
निर्णय तुमचा आहे.

साधी सरळ दिसणारी माणसं मूर्ख नसतात
ते फक्त हाच विचार करतात
की
समोर दिसणारी माणसं चांगल्या मनाची आहेत.

आपल्या दोषांवरचे उपाय
नेहमी आपल्याकडेच असतात;
फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.

जे तुमचे क्षमतांवर टीका करतात.
ते चुकीचे आहेत हे तुम्ही सिद्ध करा.

अयशस्वी झाल्यानंतर एखादच स्वप्न अपूर्ण राहते.
मात्र मनात येणाऱ्या शंका
तुमची खूप सारी स्वप्न कायमची नष्ट करतात.

यश मिळवण्यासाठी मार्ग शोधा.
ते न मिळवण्यासाठी कारणे नाही

सर्वात चांगला नजारा एखादे
शिखर चढल्यानंतरच दिसतो.

सकाळच्या शुद्ध हवेसोबत,
सूर्याच्या कोवळ्या किरणासोबत,
फुलांच्या मधुर सुगंधेसोबत सकाळच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

फुलासारखे उमलत रहा,
सूर्या सारखे चमकत रहा
आणि दिवसभर आनंदी रहा.

गरिबी असूनही दान करतो तो खरा दानशूर.

सकाळ त्यांच्यासाठी नसते,
ज्यांनी अपयशामुळे जीवनात प्रयत्न करणे सोडले आहे.
सूर्याची किरणे तर त्याच्यासाठी आहेत,
जो अपयशी होऊन सुद्धा पुन्हा लढायला तयार आहे.

सुरुवात करण्यासाठी महान असण्याची गरज नाही,
मात्र महान बनण्यासाठी सुरुवात करणे आवश्यक असते.

एका क्षणासाठी का होई ना,
दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद आणून बघा,
मनाला काहीतरी कमावल्या सारखं वाटेल.

गैरसमज कधीही मनात ठेवू नये.
त्याचे निराकरण करावे.

रात्र संपली,
पुन्हा आनंददायी सकाळ आली,
मनाला पुन्हा तुमची आठवण आली.

जर कालचा दिवस चांगला होता तर थांबू नका,
होऊ शकते तुमच्या यशाची ही सुरुवात असेल.

आयुष्य जगून समजते; केवळ ऐकून,
वाचून, बघून समजत नाही.

स्वप्नातील जगातून आता बाहेर या,
सकाळ झाली आहे आता जागे व्हा,
चंद्र-ताऱ्याना सोडून परत या
आणि आजच्या दिवसाचा आनंद घ्या.

उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या
त्यागातून निर्माण होत असतो.

रात्र येते तारे घेऊन,
झोप येते स्वप्न घेऊन.
ईच्छा आहे माझी आज सकाळ तुमच्यासाठी येवो आनंद घेऊन.

रात्र सकाळची वाट पाहत नाही,
सुगंध हवामानाची वाट पाहत नाही.
जे मिळेल त्याचा आनंद घ्या,
कारण जीवन वेळेची वाट पाहत नाही.

पापी माणसाला पाप
कधीही शांतपणे झोपू देत नाही.

प्रत्येक नवीन सकाळ
आपल्यासाठी नवीन संधी आणि विचार घेऊन येते.

क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.

जीवनात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे
जोपर्यंत आपण चालणं थांबवत नाही
तोपर्यंत आपण किती हळू वेगाने चालत आहोत
यामुळे काही फरक पडत नाही.

संधी मिळत नसतात
तर त्या तुम्हाला निर्माण कराव्या लागतात.

तुमच्या स्वप्न खूप मोठे ठेवा,
ते पूर्ण करण्यासाठी मेहनत भरपूर करा
मात्र ते पूर्ण न करण्यासाठी कोणतीही कारणे देऊ नका.

आपल्याला त्याच गोष्टी मिळतात,
ज्यावर आपण लक्ष केंद्रित करतो.
म्हणून तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत,
त्यावरच लक्ष केंद्रित करा.

आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते
तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच
विश्वास ठेवायला तयार होत नाही.

तुमच्यासारखे फक्त तुम्हीच आहात
विनाकारण कुणाशी तुलना करत बसू नका.

तुमच्याजवळ नसलेलं,
तुम्हाला मिळवायचं असेल तर
त्यासाठी असे प्रयत्न करा
जे तुम्ही याआधी कधीच केलेले नसतील.

जोपर्यंत तुम्ही प्राप्त करत नाहीत
तोपर्यंत ते कुणालाच सांगू नका.

मौन हे सर्वात शक्तिशाली भाषण आहे.

जे अवास्तव अपेक्षा करीत नाहीत ते खरे भाग्यवान !
कारण त्यांच्यावर निराश होण्याची पाळीच येत नाही.

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही,
ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

कोण जाणे यमाचा निरोप कधी येईल,
मी मात्र याच विचारात असतो की
कधी तुमचा मॅसेज येणार आहे.

कधीकधी अपमान सहन केल्याने
कमीपणा येत नाही;
उलट आपले सामर्थ्य वाढते.

सकाळी उठल्यापासून चेहऱ्यावर आनंद हवा,
प्रत्येक दुःखापासून तुमच्यापासून दूर असावं,
सुगंधित व्ह्याव तुमचं आयुष्य असा तुमचा दिवस असो.

स्वत:चे ध्येय हेच स्वत:चे जीवनकार्य समजा.
प्रत्येक क्षणी त्या ध्येयाचे चिंतन करा.

दुःखाच रूपांतर सुखात करून बघा,
एका ठिकाणी थांबल्यापेक्षा हळूहळू का होईना चालत रहा.

माणसानं राजहंसासारखं असावं.
आपल्याला जे पटेल तेच घ्यावं,
नाही ते सोडून द्यावं.

आज्ञा करण्यापूर्वी आज्ञा पाळायला शिका.

चमच्यांपासून कायम सावध रहा!

लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं.

दुःख त्याच व्यक्तीला भेटते
जी व्यक्ति प्रत्येक नात मनापासून
निभावत असते…

शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही;
तो स्वतःहून शिकतो.

माफी मागून लहान व्हा,
पण खोटं बोलून मोठं कधीच होऊ नका!

जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.

भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात;
त्याची खपली काढू नये.

मोठ्या लोकांचा मत्सर करु नका;
कारण त्यामुळे तुमचा क्षुद्रपणा प्रकट होतो.

मन मोकळे असणे कधीही चांगले.
परंतू जीभ कधी मोकळी सोडू नका.

अंधारच नसता तर चमकणाऱ्या
ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती.

फुलांच्या पाकळ्या तोडणाऱ्याला
फुलांचे सौंदर्य कधीच आस्वादता येत नाही.

बोलावे की बोलू नये,
असा संभ्रम निर्माण झाला असता
मौनाने बोलण्याची जागा घ्यावी.

शाळेत मैत्री करा पण मैत्रीत
शाळा करू नका.

तुमच्या यशाची उंची
ही तुमच्या प्रामाणिकपणा
आणि मेहनतीवर अवलंबून असते.

विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.

मराठी सुविचार संग्रह
लोक वाईट नसतात…
फक्त ती तुम्हाला हवं तसं
वागत नसतात म्हणून
तुम्हाला वाईट वाटतात…

काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.

आयुष्यात पैसा हवा पण पैशात आयुष्य नको.

आयुष्यात प्रेम करा ;
पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.

सगळेच निर्णय मनाने घेऊ नका;
काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.

चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो,
पण त्यातून यशाच्या दिशेने
जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.

काही गोष्टी आपल्याला प्रिय नसतानाही
कराव्या लागतात कर्तव्य म्हणून.

ध्येयप्राप्तीसाठी अशी लढाई लढा,
कि
तुम्ही हरला तरी
जिंकणाऱ्यापेक्षा तुमची चर्चा जास्त झाली पाहिजे.

या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते,
तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम
आणि तुमच्याजवळ सर्वकाही
असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.

न हरता, न थकता न थांबता
प्रयत्न करणाऱ्यांसमोर
कधी कधी नशीब सुध्दा हरत.

तुमचं प्रत्येक यश हे
तुम्ही घेतलेल्या एका छोट्याशा निर्णयाने सुरू होते.

यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते,
पण समाधान हे महाकाठीन,
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.

जुन्या किल्ल्यांनी नवीन कुलूप उघडत नाही.
बदल स्वीकारा त्यानुसार स्वतःमध्ये बदल करा.

आपलं जे असतं ते आपलं असतं
आणि आपलं जे नसतं ते आपलं नसतं.

संधीच एक दार बंद झालं तर दुसरं उघडतं,
फक्त ते शोधा…

माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे अस नाही,
पण जो मी काल होतो त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा.

तुमचं सर्वात मोठे यश,
हे तुमच्या सर्वात मोठ्या अपयशाच्या
अगदी पलीकडे असू शकते.

थांबू नका वेळ कधी बदलेल,
काहीच सांगता येत नाही.

नियोजनाशिवाय एखाद ध्येय म्हणजे फक्त इच्छा असते.

आपण एवढं समजदार तर असायलाच हवं
की
कोणत्या गोष्टी आपल्याला यशापासून दूर ठेवत आहेत हे कळावं.

जो धोका पत्करण्यास कचरतो,
तो लढाई काय जिंकणार !

सर्व जग बदलण्याचा विचार करतील
तर स्वतःला कोण बदलणार?

मनाने तुम्हाला नियंत्रणात ठेवण्याआधी
तुम्ही तुमच्या मनाला नियंत्रणात ठेवा.

हसा, खेळा पण शिस्त पाळा.

माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे.

ध्येय तीच व्यक्ती गाठू शकते
ज्यांच्या स्वप्नामध्ये उमेद असते.

माणसाचा सगळ्यात मोठा
सद्गुण म्हणजे त्याची माणुसकी.

जग भित्र्याला घाबरवते
आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.

आपल्याला केवळ एकाच संधीची गरज आहे.

पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते.

सुखापेक्षा दुःखामुळे होणारे ज्ञान
श्रेष्ठ दर्जाचे असते.


शांततेच्या काळात जास्त घाम गाळला
तर
युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावे लागते.

तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.

अशक्य हा शब्दच आपल्या
शब्दकोशातून काढून टाका.

खोटी टीका करू नका,
नाहीतर प्रतिटीका ऐकावी लागेल.

क्रांती हळूहळू घडते;
एका क्षणात नाही.

जितका मोठा संघर्ष असतो,
तितकेच मोठे यश मिळत असते.

मी झुकतो कारण मला नाती
निभवायला आवडतात…
नायतर चुकीचा मी
कालही नव्हतो आणि आजही नाहीये…

निघून गेलेला क्षण
कधीच परत आणता येत नाही.

जोड़ीदार सुंदर नाही,
काळजी करणारा पाहिजे…

तुमची सर्व स्वप्न सत्यात उतरतील
फक्त तुमच्यात ती पूर्ण करण्याची हिंमत आहे.

ज्ञानेंद्रियांवर संपूर्ण ताबा हाच खरा विजय होय.

तुम्हाला जे हवं आहे
ते फक्त तुम्हाला एकच व्यक्ती मिळवून देऊ शकतो.
फक्त तुम्ही.

गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं !

तुम्हाला हवे होते पण मिळाले नाही
म्हणून निराश होऊ नका ;
कदाचित त्याने तूमचे चांगले होणार नसेल.

प्रश्न फक्त संस्कार आणि आदर या
दोन गोष्टींचा आहे नायतर जो माणूस
ऐकून घेऊ शकतो तो चार गोष्टी
ऐकवू पण शकतो…

स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.

टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही.

तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.

प्रेमाची मादकता मनुष्याला व्याकुळ बनवते
तर प्रेमाची पवित्रता त्याला शांती देते.

फ़ळाची अपेक्षा करुन
सत्कर्म कधीच करु नये.

फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास
आणि
स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !

काम करणे हे जर अटळ आहे तर
ते काम हसत हसत का करू नये?

अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.

आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी
क्रोधाचे गुलाम बनू नका.

अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.

यशाचे मधुर चांदणे हवे असेल तर
प्रयत्नांची चंद्रमा अखंड तेवत ठेवली पाहिजे.

जो मूळ सोडून फाद्यांचा शोध घेतो तो भरकटतो.
दु:ख कवटाळत बसू नका;
ते विसरा आणि सदैव हसत रहा.

व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका;
आहे तो परिणाम स्वीकारा.

marathi suvichar

स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या.

भविष्याचा अंदाज लावण्याचा सर्वोत्तम मार्ग
म्हणजे ते भविष्य स्वतः तयार करणे.

जेव्हा तुम्ही स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचे ठरवता.
तेव्हा रिकाम्या गोष्टीसाठी वेळ देऊ नका.

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा;
ज्ञानाचा प्रकाश कुठुन
कधी येईल सांगता येत नाही.

वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे
हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.

झाडासारखे जगा, खूप उंच व्हा
पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका.

क्रोध माणसाला पशू बनवतो.

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही ,
तोपर्यंत सर्व काही शक्य आहे.

कमजोर लोकं बदला घेतात,
शक्तिशाली लोकं माफ करतात तर
बुद्धिमान लोकं दुर्लक्ष करतात.

बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत
सौंदर्य जास्त मोलाचं असतं.

एकाच विनोदावर आपण परत हसत नाही
तर एकाच दुःखावर तरी परत परत का रडायच.

बुद्धीने विचार करा मनावर विश्वास ठेवा
आणि
तुम्हाला हवं असेल ते सध्या करा.

विचार असे मांडा कि तुमच्या
विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.

हवं असलेलं मिळवण्यासाठी स्वतःमध्ये बदल करा
किंवा आहात तसेच रहा.

आपल्याला मदत करणाऱ्या
माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.

स्वप्न बघून चालत नाही
तर ते पूर्ण करण्यासाठी झोप पण उडाली पाहिजे.

अपयश मिळेल म्हणून घाबरू नका
प्रयत्नांवर विश्वास ठेवा.

येणाऱ्या आव्हानांवर मर्यादा घालू नका
तर स्वतःला असणाऱ्या मर्यादांना आव्हान द्या.

आपण तेव्हाच हरणार जेव्हा
आपण प्रयत्न करणे सोडणार.

यशस्वी लोक जन्माला येत नसतात,
तर ते स्वतःला यशस्वी बनवतात.

एक दिवस मी नक्की म्हणेल,
मला जे हवं होतं ते मी मिळवलं आहे.

स्वतःचा रस्ता स्वतःच तयार करा.

कोणतेही काम मनापासून करा
किंवा करूच नका.

जोपर्यंत तुमचे प्रयत्न सुरू आहेत,
तोपर्यंत काही संपत नाही.

तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.

अत्तर सुगंधी व्हायला
फुले सुगंधी असावी लागतात.

कडू घोट प्रेमळ माणसाच्या
हातून दिल्यास तो कमी कडू लागतो.

दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका;
वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.

सर्वात जास्त एकटेपणा तेव्हा वाटतो
जेव्हा एकांतात बसल्यावर एकटे का बसलोय ?
हे विचारणार सुद्धा कोणी नसत…

सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते
ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात
एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.

शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही;
तो स्वतःहून शिकतो.
चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही.

आताच्या परिस्थितीनुसार तुमचे भविष्य ठरत नसते
तर तुम्ही आता घेतलेल्या निर्णयाने तुमचे भविष्य घडत असते.

एखादं काम अर्ध्यावर सोडायच्या आधी
एकदा हा विचार करा की मी हे काम सुरू का केलं होतं?

बोलावे की बोलू नये,
असा संभ्रम निर्माण झाला असता
मौनाने बोलण्याची जागा घ्यावी.

चुका होणं हा तुम्ही
ते काम करताय याचा पुरावा आहे.

तुमचा आजचा संघर्ष
तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो
त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल.

छोटी विचार करू नका
तुमच्या मनाला पटवून द्या की
तुमची स्वप्ने खूप मोठी आहेत.

इच्छा दांडगी असली की मदत
आपणहून तुमच्याकडे चालत येते.

कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला
तरी मनावर संयम ठेवणे,
शांत राहणे हेच खरे शौर्याचे लक्षण आहे.

थोडी वाट पाहायची असती तू,
वेळ वाईट होती माझी, मी नव्हतो.

काही नाती खूपच वेगळी असतात,
जोडता पण येत नाही आणि तोडता पण येत नाही.

फक्त कपडेच नाही
तर विचार पण ब्रँडेडच ठेवा.

नुसती चष्मे लावून दृष्टी नका बदलू
तर दृष्टिकोन पण बदला.

समजावून सांगतांना
थोडीफार साथ पण द्या.

पाहून न पाहिल्यासारखं कुणी करत असेल
तर शांत राहून त्याच्या आयुष्यातून दूर जा.

जेवढी मोठी स्वप्ने असतात,
परीक्षा पण तेवढ्याच कठीण असतात.

तुम्ही ठरवाल तेवढ्याच मर्यादा तुम्हाला आहेत.

कधी चालले नसाल तर चाला,
चालले असाल तर पळा,
फक्त एका ठिकाणी उभे राहू नका.

चांगल्या चालकांची तपासणी ही खड्ड्यांच्या,
वळणाच्या आणि घाटाच्या रस्त्यावरच होते.

चुकीचेही आभार माना,
कारण तीच आपल्याला शिकवते.

मोठे होण्यासाठी स्वतः जबाबदारी असून खूप गरजेचे आहे.

जे सुरू केलंय त्याला पूर्ण करा अर्ध्यावर सोडू नका.

प्रत्येक दिवशी तुमच्या शिकण्यात,
ज्ञानात,
आणि मेहनतीत सुधारणा व्हायला हवी तरच यश मिळेल.

तुमचे सातत्यपूर्ण प्रयत्न टिकून राहिले
तर ते तुम्हाला हवं ते मिळवून देईल.

बऱ्याच वेळा यशआधी,
स्पष्टपणे अपयश आणि निराशा येते.

काहीतरी सोपं मिळवण्यापेक्षा थोडंसं चांगलं मिळवा.

उन्हात उभं राहिल्याशिवाय तर सावली सुद्धा दिसत नाही.
मग मेहनतीशिवाय यश तरी कसं मिळणार.

आलेल्या अडचणी पासून दूर पळत असाल
तर तुम्ही कितीही वेगाने पळा,
तुम्ही कधीच जिंकणार नाही.

जीवन हे चालणारऱ्या सायकल सारखं आहे.
व्यवस्थित बॅलन्स ठेवा
आणि प्रवासाचा आनंद घेत रहा.

यश आपल्याला शोधत येत नसते
तर त्याला आपल्या प्रयत्नांनी खेचून आणावे लागते.

ज्यांना जास्त गोष्टींची हाव असते
त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता असते.

या जगात तुम्ही ज्याच्यावर
सर्वात जास्त प्रेम कराल
तीच व्यक्ती तुम्हाला सर्वात जास्त
रडवेल…

अपमानाच्या पायऱ्यावरुनच
ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.

अपयश म्हणजे संकट नव्हे;
आपल्याला योग्य मार्गावर आणणारे
ते मार्गस्थ दगड आहेत.

आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे
वात्सल्याचे सागर उचंबळत असतात.

शरीराला आकार देणारा
कुंभार म्हणजे व्यायाम.

कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही.
आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.

गरीबी आणि श्रीमंती यावर
अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे…
तर यावर अवलंबून असते की
तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही
किती समाधानी आहात…

न मागता देतो तोच खरा दानी.

वेळ बदलायला, वेळ लागत नाही…

स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.

नवं काहीतरी शिकण्यासाठी
मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.

माणसाची खरी ओळख
त्याच्या अंतःकरणाच्या नम्रतेने होते.

कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल
आणि
प्राणाशिवाय शरीर !

प्रेरणादायक सुविचार इन हिंदी


शिक्षण हे साधन आहे; साध्य नव्हे.

जगण्यात मौज आहेच पण
त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे.

ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !

जो स्वतःला ओळखत नाही,
तो नष्ट होतो.

डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर
असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.

तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा
कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे.
व्यायामामुळे बुध्दी आणि 
मन दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते.

चुकीचा व्यवहार माणसं तोडतो
म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.

जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे,
समुद्र गाठायचा असेल,
तर खाचखळगे पार करावेच लागतील.

झाडासारखे जगा, खूप उंच व्हा
पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका.

त्याज्य वस्तू फूकट मिळाली तरी स्वीकारू नये.

संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.

ऐकावे जनाचे करावे मनाचे.

दोष लपवला की तो मोठा होतो
आणि
कबूल केला की नाहीसा होतो.

कोणतही कार्य करण्यापूर्वी क्षणभर थाबा.
त्याच्या परिप्णामाबद्दल विचार करा.
त्या नंतर सुरुवात करा.
सुविचार ही
माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे.

केवळ ज्ञान असून उपयोग नाही,
ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.

चिंता ही कुठल्याच दुःखावरचा
उपाय होऊ शकत नाही.

तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली
यावरुन तुमची श्रीमंती कळते.

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.

संशय अन लोभात गुंतलेलं प्रेम नसते.
मीराच्या प्रेमासारखं ते निस्वार्थ असते.

खूप त्रास होते त्या शिक्षेचा,
जी गुन्हा न करताही मिळालेली असते.

माणसाने कसं समुद्रासारखं रहावं,
भरतीचा माज नाही
अन ओहोटीची लाज नाही!

तिरस्कार पापाचा करा;
पापी माणसाचा नको.

सौंदर्य हे वस्तूत नसते;
पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.

जगाला ना प्रेम समजत,
ना मैत्री समजते.
जगाला फक्त स्वार्थ समजते.

भाग्य आणि इतरांना उगाचच दोष देऊ नये,
जे स्वप्न आपलं असेल तर
त्यासाठी लागणारी मेहनत आपली स्वतःचीच असावी.

स्वतःला कधीच वाईट समजू नये,
कारण त्याचा ठेका लोकांना घेतलेला असतो.

कुठलाही माणूस जन्मापासून वाईट नसतो,
त्याची परिस्थिती आणि जबाबदारी त्याला वाईट बनवत असते.

सोबत त्यांची असावी
ज्यांना आपण यशस्वी व्हावं असं मनापासून वाटतं.

जे परिश्रम तुम्ही आज करत असाल,
त्यानुसारच तुमचं भविष्य असेल.

माणसाकडून बोलले जाणारे शब्दच
त्याला त्याच्या उन्नतीकडे नेतात.

इतरांविषयी तेच बोलावं
जे तुम्ही स्वतःसाठी ऐकू शकता.

जीवनात शांतता हवी असेल
तर इतरांच्या निरर्थक बोलण्याला महत्व देऊ नका.

यश मिळवायचं असेल तर आपले कान बंद ठेवा
आणि
आपलं लक्ष ध्येयावर केंद्रित करा.

यशाकडे जाणारे रस्ते कधीच सरळ नसतात
मात्र यश मिळाल्यावर सर्व रस्ते सरळ होतात.

महान गोष्टी ह्या ताकदीने नाही
तर सातत्यपूर्ण प्रयत्न केल्याने पूर्ण होतात.

चुकाकडूनही तेव्हाच शिकाल
जेव्हा त्यांचा स्विकार कराल.

‘मी सर्वोत्तम आहे’
हे बोलायचे नसते तर सिद्ध करावं लागते.

परिश्रमाशिवाय काहीच मिळत नाही
पक्ष्यांनाही अन्न घरट्यात मिळत नाही.

व्यस्त असणं महत्वाचे नसते
तर कश्यामध्ये व्यस्त आहे हे जास्त महत्वाचे असते.

गेलेला दिवस नाही बदलू शकत
मात्र येणारा दिवस नक्की बदलू शकतो.

प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला सावरुन
प्रयत्न करणारेच यशस्वी होतात.

जेव्हा एखाद्याला यश मिळते,
तेव्हा आनंदच होतो असं नाही,
कुणाला तर पराकोटिच दुःख पण होतं.

जबाबदारी सुद्धा एक परीक्षाच असते,
जो जबाबदारी स्वीकारते,
त्यालाच ती जास्त त्रास देते.

जगात कधी काहीच संपणार नाही.
सुरुवात करणं हेच चांगल.

माहीत नाही कसं प्रेम करतो आहे,
जी माझी कधी होणारच नाही,
मी तीचा होऊन बसलो आहे.

जी आपली काळजी करतात,
तेच आपल्यावर खरं प्रेम करत असतात.

राग येणारे लोकं खूप हुशार असतात,
ते राग नेहमी आपल्यापेक्षा लहानांवरच काढतात.

रडल्याशिवाय तर कांदा सुद्धा कापता येत नाही,
ही तर जिंदगी आहे सहज थोडी कापता येईल.

खऱ्या जीवनाची सुरुवात
तुम्ही स्वतःसाठी बांधलेल्या भिंतीना तोडूनच होते.

आपण चांगले आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करा,
दुसरे वाईट आहेत हे दाखवत बसू नका.

सरळ सोपं आहे,
ज्यागोष्टीत मन लागत नाही ते काम करूच नाही.

पाप ही अशी गोष्ट आहे
जी लपवली की वाढत जाते.

यश मिळाल्यावर सर्वच येतील
फक्त अपयश आल्यावर स्वतःलाच सांभाळाव लागेल.

ध्येय ठरवणे ही पहिली पायरी
तर
ते मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे ही दुसरी पायरी.

संधी आता दार ठोठावत नाही
तर तुम्ही दार तोडून केव्हा बाहेर येता
याची वाट बघत असते.

अपयशाची भीती ही सर्वात मोठी भीती होय.

अज्ञानाची फळे नश्वर असतात.
ती सकाळी जन्माला येतात
आणि सायंकाळी नष्ट होतात.

यशस्वी तो असतो जो आपल्या दुश्मनावर नाही तर
आपल्या ईच्छावर विजय मिळवतो.

कोणतेही ध्येय पूर्ण करण्यासाठी
फक्त 1% प्रेरणेची
आणि
99% मेहनत करण्याची गरज असते.

हृदये परस्परांना द्यावीत,
ती परस्परांच्या अधीन करू नयेत.

student school suvichar

एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून
नाराज होऊ नका
कारण जगात एखाद्यालाच सर्व काही कधीच मिळत नसतं.

सुरुवात करण्यासाठी महान असणे गरजेचे नाही
मात्र महान बनण्यासाठी सुरुवात करण्याची गरज असतेच.

कोणतीही गोष्ट ती मिळेपर्यंतच अशक्य असते.

तुम्ही निवडलेल्या ध्येयाने तुम्हाला प्रेरणा द्यायला हवी.
ते नाही मिळणार म्हणून त्याची भीती वाटायला नको.

कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे
धावलात तर हक्क दुर पळतात.

क्वचितच असं होतं की मिळवलेले
यश हे अपयश न येता मिळालेलं असतं.

स्वतःला हा प्रश्न नका विचारू की माझ्या जवळ काय नाही आहे.
तर हा विचारांची माझ्याजवळ काय आहे.

माणसाला आयुष्यात कुठली एक गोष्ट करावी लागते.
आहे ती परिस्थिती स्वीकारून किंवा
आहे ती परिस्थिती बदलण्याची जबाबदारी स्वीकारा.

विचार असे मांडा कि,
तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.

अपमानाच्या पायऱ्यावरुनच
ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.

जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.

केवळ योगायोग असे काहीही नाही.
जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.

एकदा तुटलेलं पान झाडाला
परत कधीच जोडता येत नाही.

न मागता देतो तोच खरा दानी.

तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य
तलवार असेतोवरच टिकतं.

जशी दृष्टी तशी सृष्टी.

जगण्यात दोन बाजू असतात,
सुख आणि दुःख त्या मधील
आपण कुठली पाहतो हे महत्त्वाचे असते.

यशाकडे जाणाऱ्या जिन्याकडे न पाहता
येणाऱ्या प्रत्येक पायरीवर लक्ष केंद्रित करा.

सत्तेशिवाय शहाणपन काय कामाचे!

येणारं प्रत्येक संकट,
अपयश तुम्हाला यशाकडे जाण्यासाठी प्रेरणा देते
फक्त तुम्ही खचून न जाता त्याचा आधार घ्या.

तुमच्यात असणाऱ्या गुणांनुसार तुम्हाला संधी मिळतील असं नाही
तर संधी नुसार स्वतःमध्ये गुण अवगत करायला शिका.

निःस्वार्थी मन हाच सर्वोच्च आदर्श आहे.

तुम्ही जर तेव्हा परत प्रयत्न करण्यासाठी साठी उभे राहता
जेव्हा सर्व संपलेलं असते
तर निश्चितच तुम्ही आयुष्यात काहीही करू शकता.

हसण्याला तेव्हा जास्त अर्थ असतो
जेव्हा तुम्ही संकटांनी घेरलेले असता.

माणसाची खरी ओळख
त्याच्या अंतःकरणाच्या नम्रतेने होते.

जोपर्यंत तुम्ही अपयशी पचवू शकत नाही
तोपर्यंत तुम्ही यश मिळवू शकत नाही.

कोणतेही महान व्यक्ती संधी मिळत नाहीत
म्हणून तक्रार करत नाही
तर संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात.

ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत
त्या नष्ट करण्याचा आधिकार आपल्याला नाही.

एखाद्या व्यक्तीची ईच्छाशक्ती, दृढनिश्चय
आणि सातत्यपूर्ण प्रयत्न त्याला
आपल्या ध्येयाकडे खात्रीपूर्वक घेऊन जातात.

कृतीपेक्षा वृत्ती महत्त्वाची असते.

सुविचार

आपण आज,
आत्ता काय करत आहे
यावरून आपले भविष्य ठरत असते.

आयुष्य प्रकाशित करण्यासाठी
अंधाराचा सामना करावाच लागतो.

माझी सर्वात चांगली गोष्ट ही नाही,
की मी कधी हरलोच नाही
तर हरल्यानंतर मी पुन्हा उभा राहिलो आहे.

चुकतो तो माणूस
आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !

मनापासून एखादी गोष्ट न केल्यास
ती कधीच मिळत नाही.

अपराध्याला पुन्हाः पुन्हा क्षमा करणं
हे अपराध करण्याइतकंच धोक्याचं आहे.

प्रत्येक रस्ता अवघड नसावा,
त्यावर आनंदाचा वर्षाव असावा,
प्रत्येक दिवस खास असावा अन दिवसासारखं जीवनही खास असावं.

तुलना करावी पण अवहेलना करू नये.

विश्वास स्वतःवर ठेवला तर ताकद बनतो
अन इतरांवर ठेवला तर कमजोरी बनते.

समुद्राचा तळ शोधल्याशिवाय
मोती मिळत नाहीत.

हा फक्त एक दिवस नाही तर
आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मिळालेली एक संधी आहे.

फांदीला फुलांचं ओझं कधीच वाटत नाही.

स्वतःमध्ये काही करून दाखवण्याची हिम्मत असेल
तर स्वतःवर विश्वास ठेवा,
इतरांवर ठेवलेला विश्वास कधीही तुटू शकतो.

पराभवानेच माणसाला स्वतःची खरी ओळख पटते.

समाधानी राहण्यातच
आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.

जीवनात हवं ते मिळवा
मात्र एवढं जरूर लक्षात ठेवा
की तुमच्या यशाचा रस्ता हा कुणाच्या मनाला तोडून जाणारा नको.

आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी
क्रोधाचे गुलाम बनू नका.

असो कोण आहे ज्याच्या काहीच कमी नाही आहे,
आभाळाजवळ सुद्धा कजमीन नाही आहे.

आवड असली की सवड आपोआप मिळते.

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही.
शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते.

मनात आणलं तर या जगात
अश्यक्य असं काहीच नाही.

चिंतेऐवढे शरीराचे शोषण
दुसरे कोणीही करू शकत नाही.

यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग
अजून तयार व्हायचा आहे.

दुसऱ्याला सावली देण्यासाठी
झाडाला स्वतः उन्हात उभं राहावं लागतं.

एकदा कर्तव्याच्या वाटेवरुन जायचं ठरवलं,
की भावनांना विसरायचंच असतं.

ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात,
तो कधीही एकटा नसतो.

सूड घेण्यापेक्षा क्षमा करणे अधिक चांगले.

जो इतरांना संपविण्याची तयारी करतो
तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो.
आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा
प्रामाणिक प्रयत्न करतो
तो स्वतः कधीच संपत नाही.

जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर
नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले
तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा.
यश प्राप्त करण्यासाठी,
यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा हि
अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा
जास्त प्रबळ असली पाहिजे.

हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका;
त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा.

चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.

जीवनात त्रास त्यांनाच होतो
जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि
जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही
एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.

जर हरण्याची भीती वाटत असेल तर
जिंकण्याची ईच्छा पण बाळगू नये.

समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे
अधिक भयानक असतात.
ती निर्माण होऊ देऊ नका.

जे लोकं तुम्हाला जवळून ओळखत नाही
त्यांच्या मतांना तुमच्या मनाच्या जवळ नका जाऊ देऊ.

संसारातल्या तारा मोठ्या नाजूक असतात.
तालाची एक मात्रा चुकली तरी
त्या नाराज होतात, सूर बेसूर होतात.
म्हणूनच संसाराचं गाणं गाताना फार जपावं लागतं
स्वत:लाही आणि इतरांनाही !

पागल आणि हुशार यांच्यात एकच फरक आहे
हुशारांना काही मर्यादा असतात
तर पागल लोकांना कुठलीच मर्यादा नसते.

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.

इतरांविषयी तेच बोला
जे स्वतःविषयी ऐकू शकता.

ज्यांना तुमची किंमत नसते
त्यांच्यासोबत राहिल्यापेक्षा एकटं राहणे कधीही चांगले.

तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय
ते आजच ठरवा आत्ताच !

तारीफ करणाऱ्यापेक्षा
टीका करणाऱ्यावर जास्त लक्ष द्या

चूक ती असते
जिच्याकडून तुम्ही काहीच शिकत नाही.

प्रयत्न करून चुकलात
तरी चालेल पण
प्रयत्न करण्यास
चुकू नये…

लहानांना मोठं करण्यासाठी
मोठ्यांना लहान व्हावं लागतं.

नेहमी उच्च ध्येय ठेवा,

ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा.

ज्याने आयुष्यात काहीच चूक केली नाही,
याचा अर्थ त्याने आपल्या जीवनात काहीच केले नाही.
रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय म्हणजे
मौन.

आधी विचार करा; मग कृती करा.

आयुष्यात जर यशस्वी व्ह्यायचं असेल
तर बोलण्यापेक्षा ऐकण्यावर जास्त भर द्या.

आयुष्याचा हाच उद्देश आहे की
आपल्या आयुष्याला काही उद्देश असावा.

जेंव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते,
नवीन काहीतरी सुरु होण्याची..!

ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे
कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते;
ज्ञान तुमचेच रक्षण करते.

आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.

जीभ जिंकणारा जग जिंकतो.

तुलना करावी पण अवहेलना करू नये.
समाधानी राहण्यातच
आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.

आयुष्यात आई आणि
वडील यांना कधीच विसरु नका.

आवडतं तेच करू नका;
जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.

आपण फक्त आनंदात रहावे,
कारण
आपल्याला दुःख देण्यासाठी
अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात.

काट्यावरून चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहचते,
कारण पायात रूतणारे काटे पायांचा वेग वाढवतात.

फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास
आणि स्वत:साठी जगून
दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !

मैत्री हि वर्तुळासारखी असते,
ज्याला कधीच शेवट नसतो.

हुशारी तर सर्वांकडे असते,
कुणाची लपून राहते तर कुणाची नजरेस पडते.

साधेपणात फार मोठे सौंदर्य असते.

जीवनात शांती हवी असेल तर
लोकांच्या ऐकण्याकडे दुर्लक्ष करा.

सर्वश्रेष्ठ सुविचार


आपल्या स्वप्नांना नेहमी जिवंत ठेवा.
स्वप्नांमधील चिंगारी जर विझली तर
तर तुमच्या स्वप्नांनी आत्महत्या केली असं वाटेल.

अपयशाने खचू नका;
अधिक जिद्दी व्हा.

सगळ्याच गोष्टीमध्ये तुम्ही तरबेज नसाल
मात्र अश्या बऱ्याच गोष्टी आहेत
ज्यात तुम्ही तरबेज असाल त्या शोधा.

दुर्बल मनाचा मनुष्य
कधीच महात्मा होऊ शकत नाही.

डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर
असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.

सत्याने मिळतं तेच टिकतं.

कृतीपेक्षा वृत्ती महत्त्वाची असते.

प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.
हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

अन्न हे पूर्णब्रह्म आहे;
त्याचा अनादर करू नका.

मनुष्याचे मोठेपण हे त्याच्या वयावर नव्हे,
तर कर्तृत्त्वावर अवलंबून असते.

माणूस हा आपल्या विचारांनी तयार झालेला प्राणी आहे.
तो जसा विचार करतो तसा बनतो.

आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल
असे कधीही वागू नका.

प्रामाणिकपणा हि खूपच बहुमुल्य वस्तू आहे,
कुठल्याही फालतू माणसाकडून
त्याची अपेक्षा धरू नका.

काही गोष्टी आपल्याला प्रिय नसतानाही
कराव्या लागतात कर्तव्य म्हणून.

मनुष्याची आर्थिक स्थिती
कितीही चांगली असली
तरीही
जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी
त्याची मनस्थिती चांगली असावी लागते.

स्वतःला सोन्याच्या नाण्यासारखे बनवा,
जे गटारीत पडले तरी
त्याचे मोल कमी होत नाही.
परीक्षा म्हणजे
स्वतः च्या आत
डोकावून पाहण्याची संधी.

आपण कसे दिसतो यापेक्षा
कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.
जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका.

विश्वास हा एका खोडरबरसारखा असतो,
तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

आवड आणि आत्मविश्वास असेल तर
जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही.

आपला चेहरा हा आपल्या मनाचा आरसा असतो.

प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करू नका,
स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करा.

आपण जे पेरतो तेच उगवतं.

ज्या व्यक्तीकडून काहीच अपॆक्षा नसतात,
तेच कधी कधी चमत्कार घडवून दाखवतात.

मोठी स्वप्ने पाहणारीच
मोठी स्वप्ने प्रत्यक्षात उतरवतात.

एक चांगला शिक्षक यशाचे दार उघडून देऊ शकतो.

मात्र त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी
स्वतःलाच चालावे लागते.

बुध्दीला पटल्याशिवाय
कोणताही विचार स्वीकारू नका.

ज्यांच्या जवळ सुंदर सुंदर विचार
असतात
ते कधीही एकटे नसतात…

संकटात उडी घेऊन जे कार्य करतात
त्यांनाच विजयश्री हार घालते.

लोकं असं जरूर म्हणतात की
तुम्ही चांगलं करा
मात्र हे कधीच म्हणत नाही की
माझ्या पेक्षा चांगलं करा.

विश्वासाच्या पायावर उभे असलेले स्वप्न
अपयशाला घाबरत नाहीत.

कर्तव्याची दोरी नसली की
मनाचा पतंग कुठेही फडफडत राहतो.

जगू शकलात तर चंदनासारखे जगा;
स्वत: झीजा
आणि
इतरांना गंध द्या.

चांगले काम करायचे मनात
आले की ते लगेच करून टाका.

आयुष्य जगून समजते;
केवळ ऎकून, वाचून, बघून समजत नाही.
गरिबी असूनही दान करतो तो ख्ररा दानशूर.

जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका.

सदगुणांना कधीच वार्धक्य येत नाही.

जूनी खपली काढून बुजलेल्या जखमा
ताज्या करण्यात शहाणपणा नसतो.

केवड्याला फळ येत नाही पण
त्याच्या सुगंधाने तो
अवघ्या जगाला मोहवून टाकतो.

प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.

खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची.

खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे.
आपण कानांनी ऐकतो ते खोटं
आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.

भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा
शांततामय, मानाचे गरीब जीवन चांगले.

तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार !

सदगुणांसाठी दुसऱ्याकडे बघा
व दुर्गूणांसाठी स्वतःवर नजर ठेवा.
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.

अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा.

सुखापेक्षा दुःखामुळे होणारे ज्ञान
श्रेष्ठ दर्जाचे असते.

आशा ही उत्साहाची जननी आहे.

दुःखी व्हा
किंवा स्वतःला प्रेरित करा
कारण तुमचे ध्येय तुम्हीच निवडलेल आहे.

तक्रारी आता तुझ्यासोबत नाही,
स्वतःसोबत आहेत.
खोटं तू बोललीस
मात्र त्यावर विश्वास तर मी ठेवला होता.

सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो.

अंधार असणं अडचण नाही तर
आपल्याला दिवा लावायला वेळ नाही
किंवा तसं सुचत नाही.

ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही
तो दिवस फुकट गेला असं समजा.

एवढं आनंदी रहा की दुःख आलं
तर त्याने म्हणायला हवं ‘इथं कशाला आलो’

खरच जीवनात जर काही मिळावयाचं असेल
आणि मिळत नसेल तर
ते मिळवण्यासाठीचे तुमचे रस्ते बदलत रहा
ध्येय नाही.

मोठा माणूस तो असतो,
ज्याला भेटल्यावर स्वतःला कुणी लहान समजत नाही.

घडून गेलेल्या गोष्टींकडे ढुंकूनही न पाहता
पुढे घडणाऱ्या गोष्टींकडे पाहत रहा.

छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधत रहा
कारणं माणूस मोठ्या संकटापेक्षा छोट्या समस्यांनी जास्त त्रस्त असतो.

भविष्याची जास्त चिंता करू नका,
इथं मरणार सगळेच आहेत.

मित्रांमध्ये श्रीमंती नका पाहू,
काळजी घेणारे मित्र नेहमी गरीबच असतात.

कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो.

शत्रू बनवण्यासाठी आता भांडण करणे गरजेचे नाही.
तुम्ही फक्त यशस्वी व्हा, ते आपोआपच तयार होतील.

यश एका दिवसात नाही मिळत
पण मनापासून प्रामाणिक करत राहिलात,
तर एक दिवस नक्की मिळते.

त्यांच्यासाठी एक वेळ हरलं तरी चालेल
ज्यांना दुसऱ्यासाठी जिंकायचं असते.

कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला
तरी संयम राखणे हेच शौर्याचे लक्षण आहे.

स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका;
आणि
स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.
लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे.

कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते.
माणूस आपल्या पराक्रमाने
एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो.

इतिहास घोकण्यापेक्षा
इतिहास निर्माण करणे महत्त्वाचे.

प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे,
जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही
प्रेमानच वागल पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही,
तर तुम्ही चांगले आहात म्हणून.

बरेच लोक त्यांचे स्वप्नाप्रमाणे जगत सुद्धा नाहीत
फक्त त्यांना वाटत असलेल्या भीतीमुळे.

प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो
तोच खरा माणूस !

हिंदी छोटे सुविचार


विनाकारण काळजी करणे म्हणजे
आपण कधीही न घेतलेल्या
कर्जावर व्याज भरण्यासारखं आहे.

जोपर्यंत आपण एखाद्या कामाला सुरुवात करत नाही,
तोपर्यंत ती गोष्ट अशक्य वाटते.

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा,
ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही.

आळसात आरंभी सुख वाटते,
पण त्याचा शेवट दु:खात होतो.

नेहमीच तत्पर रहा,
बेसावध आयुष्य जगू नका.

चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो
तर बुध्दीचा विकास एकांतात होतो.

कधीच हिम्मत हरू नका,
जीवनात संपण्यासारखं असं काहीच नाही.
प्रत्येक नवा दिवस हा तुमचा वाट पाहत असतो.

ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत
त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.

प्रत्येक सकाळी आपण त्यांचीच आठवण काढतो,
जे आपल्या मनात असतात.

राग आणि असहिष्णुता हे समजूतदारपणाचे शत्रू आहेत.

प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल,
पण शत्रू निर्माण करू नका.

भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,
भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती
आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून
दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती !

भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,
रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.

जीवन ही एक जबाबदारी आहे.
क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं.

पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की,
ते पाप आहे असे माहीत असूनही,
आपण त्याला कवटाळतो.

गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले !

खिडकी म्हणजे आकाश नसतं.
भाकरी आपल्याला जगवते
आणि
गुलाबाचं फ़ूल कशासाठी जगायचं हे शिकवते.

या जगात माणसाची नाही
त्याच्या पैशांची किंमत असते…

संभ्रमाच्या वेळी
नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.

आपली नरकात जायची सुद्धा तयारी असली पाहिजे,
फक्त
त्याला कारण मात्र स्वर्गीय असले पाहिजे.

माणसे जन्मतात आणि मरतात,
पण विचार जन्मतात आणि कधीच मरत नाही.

क्षमतेपेक्षा जास्त धावल की दम लागतो
आणि
क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो.

शत्रूने केलेले कौतुक
हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.

त्यावर लक्ष्य ठेवा जे तुमच्याजवळ आहे,
जे नाही त्यावर नाही.

यशस्वी तो असतो,
जो इतरांच्या आधी स्वतःला घडवत असतो.

काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.

यशस्वी तो होतो,
जो इतरांशी तुलना करत नाही.

गरज आणि ईच्छा यामधील फरक समजला
म्हणजे माणूस यशस्वी होतो.

चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो.

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते.

निंदेला घाबरून आपले ध्येय सोडू नका,
कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मत बदलतात.
माणसाला स्वतः चा फोटो काढायला वेळ लागत नाही,
पण स्वतः ची इमेज बनवायला मात्र वेळ लागतो.

तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.

ज्ञानातील एक गुंतवणूक सर्वोत्तम व्याज देते.

परिस्थितीच्या हातातली कधीच कठपुतळी बनू नका,
कारण परिस्थिती बदलण्याची ताकद तुमच्यात आहे.

शिक्षण हे साधन आहे; साध्य नव्हे.

आपले ध्येय उच्च ठेवा
आणि आपण ते प्राप्त करेपर्यंत थांबु नका.

यश तुमच्याकडे येणार नाही,
त्याऐवजी आपण स्वतः त्याकडे जावे लागेल.

तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.

दुसऱ्याचे ओझे उतरवण्यासाठी जेव्हा तुम्ही पुढे होता,
तेव्हा तुमचे ओझे पूर्वीपेक्षा हलके होते हे लक्षात ठेवा.

अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे
स्वतःवरचा विश्वास…
जो मंद हास्य करत तुमच्या कानात
प्रेमाने सांगत असतो
सगळं व्यवस्थित होईल.

दुर्बल व्यक्ती एखादे उच्च ध्येय समोर ठेवून
समाजात वावरु लागते तेव्हा धाडस व साहस
हे गुण तिच्यात आपोआप येतात.

आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते;
ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते
आणि हृदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.

टाकीचे घाव सोसल्याशिवाय
दगडाला देवपण येत नाही.

अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे,
म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.

मनाला उचित विचारांची सवय लागली कि
उचित कृती आपोआप घडते.

तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच,
किंबहुना त्याच्या कित्येकपटीने अधिक
देव तुम्हाला देईल.

समारोप तर मित्रांनो कसे वाटले तुम्हाला यांचे सुविचार, आवडले असेल तर आपल्या मित्रांना आणि आपल्या नातेबाईकांना  पण पाठवा. तसेच तुम्हाला अजून काही सुविचार अजून पाठवायचे असल्यास कमेन्ट बॉक्स मध्ये आम्हाला पाठवा आम्ही ते साइड वर टाकण्याचा प्रयत्न करू, धन्यवाद

तर मित्रांनो, आम्हाला खात्री आहे कि, आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले 1000+ मराठी सुविचार संग्रह आपल्या नक्की उपयोगी येईल. या सुविचारांच्या माध्यमातून आपण आपले विचार अधिक समृध्द बनवाल अशी आम्हाला खात्री आहे. हे सुविचार आपण आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. याच प्रकारचे अजून काही सुविचार असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहा, आम्ही त्यांनाही नक्कीच Add करू.

अशाच प्रकारच्या दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी  https://marathiukhana.com या माझ्या ब्लॉगला नक्की भेट द्या.

वाईट व्यक्ती जेव्हा आपण संत आहोत असे ढोंग करते तेव्हा ती सर्वात वाईट ठरते.

क्लिष्ट ग्रंथ हि एक मोठी डोकेदुखी असते.

भांडखोर माणसांजवळ शब्दांचा तुटवडा नसतो.

दृष्टीहिनाला आरसा भेट दिला तर तो आभार मानणार नाही.

ज्या देशावर जुलमी राज्यकर्त्यांची सत्ता असते तो देश उलट्या शंकूसारखा असतो.

माफक विरोध व्यक्तीस फायदेशीर ठरू शकतो.

सच्चाई सुविचार


टीकाकार हा स्वतःपेक्षा महान व्यक्तींची स्तुती करण्याकरिता असतो, परंतु त्याला त्या व्यक्ती सापडत नाहीत.

लोकशाही समाज हाच खरोखरी मोठा आणि स्वतंत्र समाज असतो.

जो व्यक्ती स्वतःचा वाढदिवस लक्षात ठेवतो पण स्वतःचे वय लक्षात ठेवत नाही त्यालाच मुत्सद्दी म्हणावे.

एखाद्या लढाई इतके एखादे पुस्तक महान असू शकते.

कधी कधी अनावधानाने म्हटलेले गाणे राजाचा राजेपण कमी करत नाही.

खोटारडा शपथा घेण्यात तरबेज असतो.

शिक्षण हीच यशाची गुरुकिल्ली.

असत्य कधीही लपत नाही.

विनोद हा फारच गंभीर गोष्ट आहे.

शिक्षित मूर्ख हा अज्ञानी मूर्खापेक्षा जास्तच मूर्ख असतो.

माफक मितभाषित्व शिकणे कठीण असते, परंतु आयुष्यात शिकल्या जाणाऱ्या धड्यांपैकी हा एक मोठा धडा असतो.

मत्सरी बाई संपूर्ण घराला आग लावते.

निष्कलंक हृदयाला सहजपणे घाबरविता येत नाही.

मनाची शांतता म्हणजे सुखी जीवन होय.

जो महान चित्रकार आहे तो चित्रात चेहरा आणि मन दोन्ही चितारतो.

सज्जन व्यक्ती वाद टाळते. वाद घालणारी व्यक्ती सज्जन असू शकत नाही.

खूप बुद्धी असली तरी थोड्याश्या धैर्याच्या अभावामुळे ती वाया गेल्याची उदाहरणे या जगात भरपूर सापडतात.

हसून जो आयुष्य जगतो तो दांभिक असतो.

नावलौकिक म्हणजे गाजावाजा. जेवढा जास्त गाजावाजा करावा तेवढा तो दूरवर ऐकू जातो.

अपयश हि यशाची पहिली पायरी आहे.

मूर्ख माणूस शांत बसू शकत नाही.

ऐश्वर्याला सर्व दरवाजे खुले असतात.

ज्याप्रमाणे हिऱ्याला घालसल्याशिवाय चकाकी येत नाही, त्याचप्रमाणे जीवनात येणाऱ्या संकटांशिवाय माणूस परिपक्क होत नाही.

मित्राने आपल्या मित्राच्या दुर्बलतेकडे डोळेझाक केली पाहिजी.

जे कठीण आहे ते सोपे आहे असे मूर्ख माणूस समजतो आणि अपयशी होतो.

खुशामत करणारा चित्रकार व्यक्ती दिसते त्याच्यापेक्षा निराळी चितारण्याची काळजी घेतो.

हळवे मन सुंदर स्त्रीस जिंकू शकत नाही.

महान माणसाची खुशामत करताना ती करणारा कोणताही धोका पत्करू शकते.

चांगली ऊब देणारी शेकोटी असली कि खोलीत आनंद पसरतो.

ज्या चेहऱ्यावर हसू फुटत नाही तो चेहरा बेसूर दिसतो.

धनसंपन्न माणूस गुणसंपन्न मानला जातो.

अनुभवाने माणसाची प्रगती होते.

पुरुषाचे वय त्याच्या भावनांवर ठरते, तर स्त्रीचे तिच्या दिसण्यावर ठरते.

माणूस हजारो एकर जमिनीचा मालक असला तरी त्याच्या चिरनिद्रेसाठी पाच फूटच जागा लागते .

अनुभवाचे बोल ज्याने ऐकले नाहीत अशी कोणीही व्यक्ती असू शकत नाही.

दुसऱ्याचे चारित्र्याचे जितक्या सहजपणे माणूस चित्रण करतो तितके स्वतःच्या चारित्र्याचे करत नाही.

मनुष्य फक्त भाकरीवर जगू शकत नाही, त्याला थोडे मायेचे बळ लागते.

अनुभवातून माणुस अनेक गोष्टी शिकतो.

एखादी व्यक्ती बोलत नसली तरी आत्मपरीक्षण करत असते.

खोट्यातला सर्वात काळाकुट्ट खोटेपणा म्हणजेच आर्धाखोटेपणा.

शत्रू निवडताना माणसाला फार काळजी घेता येत नाही.

मनुष्याचे स्वतःचे घर हा त्याचा किल्ला असतो.

ठिणगी चटकन विझवता येते; पण तिचे उग्र स्वरूप झाले कि बनदीसुद्धा अपुरी पडते.

भीतीची खोटेपणाशी जवळीक असते.

आपल्या मुलांना जो उद्योगशीलतेची सवय लावतो तो संपत्तीपेक्षाही जास्त देतो.

सत्याला कशाचीही भीती नसते.

जी व्यक्ती प्रत्येक गोष्टीत सत्याची अपेक्षा करते तिला रस्त्यात शत्रूंखेरीज कोणीही भेटत नाही.

माणसाकडे फट्कट ज्ञान असेल अन कार्यशक्ती नसेल तर माणसे नसलेल्या सुसज्ज घरासारखा तो असतो.

चेहऱ्याच्या सुंदरतेपेक्षा मनाची सुंदरता पहावी.

आपले मन आपल्याला खाणार नाही याची माणसाने आधी काळजी घ्यावी.

जो मनाचे सांत्वन करतो तो खरा डॉक्टर.

गरीब माणुस कर्जबाजारी झाला कि खूप आकांताण्डव करतो.

श्रीमंत व्यक्तीला खरोखरच उत्तम भूक लागवयास हवी.

गवताची काडी वाऱ्याची दिशा दाखवते.

निराशावादी कोण समजावा? जो आपल्यासारखाच चिडखोर दुसऱ्याला समजतो व त्याबद्दल त्यांचा तिरस्कार करतो.

रिकामे डोके सैतानाचे घर असते.

पूर्वग्रह झालेली व्यक्ती ठामपणे दावा करेल की, तिच्या मतांना पाठिंबा द्यायला पुरेसा पुरावा आहे.

शहाण्याला शब्दांचा मार.

छोटी रक्कम व्यक्तीला तुमचा ऋणी बनवते तर मोठी रक्कम तुमचा शत्रू बनवते.

एखादा विचार शंभर वेळा केला तरी त्याची अभिनवता कमी होत नाही.

नैतिक गोष्टीत आणि भूमितीत सुद्धा सरळ रेषा हे सर्वात कमी अंतर असते.

खूप कष्टातून कमी साध्य होणे.

माणसाचा पोकळ गर्व त्याला सन्मानाचा विचार करायला लावतो.

राष्ट्र म्हणजे लोकांची एकी.

काटकसरी माणुस गरिबी दाखवत श्रीमंत होतो, तर उधळा माणुस श्रीमंती दाखवत गरीब होतो.

एखादा ग्रंथ वारंवार वाचण्यापेक्षा त्याचे एक पण वाचून आत्मसात करणे चांगले.

हेकट आणि चिडखोर स्वभाव जीवनाच्या कोणत्याही टप्प्यात असमाधान निर्माण करतो.

प्रचंड आगीत प्रचंड उष्णतेप्रमाणे कणखर मनामध्ये तीव्र भावना सतत उफाळत असतात.

ज्यांना हरण्याची भीती आहेत्यांचा पराभव निश्चित आहे.

काळ आणि वेळ कोणासाठीही थांबत नाही.

प्रत्येक नवीन दिवस ही तुम्हाला मिळालेली नवीन संधी असते.

दुसऱ्याबद्दल तेवढेच बोला जेवढे स्वतःबद्दल ऐकू शकाल.

गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.

शपथ ही महाभयंकर गोष्ट पापकरिता जाळेच असते.

हुशार व्यक्ती ही आपल्या मनाची मालक असते; तर मूर्ख व्यक्ती गुलाम असते.

शपथ लालसेची ढाल असते.

शहाणी व्यक्ती आपल्या बुद्धीच्या व उत्पन्नाच्या सीमेतच जगते.

अपशब्दांकडे तुम्ही दुर्लक्ष केले तर ते बंद होतात; पण जर तुम्ही रागावलात तर तितकीच तुमची लायकी आहे असे समजले जाते.

शहाणा माणूस बोलण्यापूर्वी विचार करतो; तर मूर्ख माणूस बोलल्यानंतर विचार करतो.

रिकामा खिसा माणसाला खूप काही शिकवतो.

संकट कितीही मोठे असले तरी न डगमगता त्याशी दोन हात करा.

शहाणा माणूस जेव्हा एकटा असतो तेव्हा तो कार्यरत नाही म्हणून एकटा असतो.

समंजस संशयखोरी वृत्ती असणे हा चांगल्या टीकाकारांचा गुण समजला जातो.

शहाणा माणूस क्षमा करायची त्वरा करतो, कारण त्याला वेळेचे खरे मूल्य माहित असते.

संकटांमुळे माणूसकाई निर्माण होते, परंतु भरभराट माणसाला राक्षस करते.

घटना घडल्यानंतर मूर्खासुद्धा शहाणा ठरतो.

कृती आपल्या हातात असते, परिणाम ईश्वराच्या हाती असतात..

कृती केवळ विचारांतून निर्माण होत नाही तर जबाबदारीतून निर्माण होते.

नशीबवान माणसाला विरोध करायला देवाजवळ सुद्धा कमी ताकद असते.

मनुष्य सवयीप्रमाणे, जाणतेपणे जे सत्य आचरण करतो टोकंग त्याचा धर्म असतो.

या जगात माणसांपेक्षा पैश्याला जास्त किंमत आहे.

संयम ठेवा, वेळ प्रत्येकाची येते.

वेळेचा नेहमी सदुपयोग करावा.

गेलेली वेळ परत येत नाही.

सर्वच खरे प्रेम प्रशंसेवर अवलंबून असते.

सर्वांना ज्ञानाची इच्छा असते, पण मोबदला देण्याची तयारी नसते.

खेळाशिवाय नुसते काम दिल्याने मुले मंद होतात.

सर्व सर्वसाधारणपणे दिलेली मते स्वैर आणि अपूर्ण असतात.

कष्टाचे फळ जास्तकाळ टिकते.

चांगले सुविचार


आळीपाळीची विश्रांती आणि श्रम चिरकाल टिकतात.

बहाणा म्हणजे काळजीपूर्वक केलेला खोटेपणा होय.

गाढवावर सोने जरी लादले तरी ते गाढवच.

सुखी जीवनाची एक अत्यावश्यकता म्हणजे काळजीपासून मुक्तता.

आशावादी व्यक्ती प्रत्येक अडचणीत व संकटात संधी शोधते.

चांगले कर्म करण्यातच खरा धर्म असतो.

सर्व मानवी आनंद क्षणभंगुर असतात. 

श्रीमंत माणूस बनण्याआधी एक चांगला माणूस बना.

आपले संपूर्ण ज्ञान आपल्याला आपले अज्ञान किती आहे याची जाणीव करून देते.  

गरजवंताला सारा ध्येयवाद खोटा वाटत असतो.

आयुष्य थोडच असाव, पण आपल्या माणसाला ओढ लावणार असाव.

आपला सर्व चांगुलपणा हा फाटक्या चिंध्यांप्रमाणे असतो.

चांगले व्यवस्थापक बुद्धिमत्तेमुळे हाती जे आहे त्यातूनच विकास घडवून आणतात.

चांगल्या भोजनानंतर कोणालाही क्षमा केली जाते अगदी नातेवाइकांना सुद्धा.

तुमचे तुटलेले नखच वेगाने वाढते बाकीची नखे सोयीस्कररीत्या वाढतात.

आपल्याजवळील सर्वात पवित्र गोष्ट आपले चरित्र असते.

अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते.

माणसाला हुशार बनविणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे वाचलेली पुस्तके आणि भेटलेली माणसे.

घुबड हा रात्रीचाच राजा असू शकतो.

थोडेसे दूरदर्शित्व खूप चातुर्याच्या बरोबर असते.

कोणत्याही बाबतीत अतिशयोक्ती करण्यापेक्षा आपली योग्यता कमी दाखवणे जास्त चांगले.

दुःखावर उतारा म्हणजे चलबिचल न होणारे मन होय.

जो फुलांच्या शय्येवर झोपतो त्याला काट्यांवर पडून पश्चाताप करण्याची वेळ येते.

काळाबरोबर जे जुने होत जाते तो म्हणजे धर्म होय.

https://marathiukhana.com

देवदूत उडतात, कारण ते स्वतः हलके आहोत असे समजतात.

चिंतेमुळे आजपर्यंत कुठलेही मतभेद मिटले नाहीत.

संभाषणाचा सर्वात वाईट प्रकार म्हणजे वादविवाद.

आपण स्वतःसाठी बनविलेले कायदे सोडून बाकीचे हास्यास्पद असतात.

ज्या ठिकाणी साहसाची जाण असते तेथे कलेची भरभराट होते.

कुरूप जगात उनाड सौंदर्य पकडण्याचा प्रयत्न केला जातो.

कला अनंतकाळ असते आणि वेळ तर सारखा पुढे जात असतो.

श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत व्हा.

मनुष्य हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो.

ढीगभर अस्वसांपेक्षा टीचभर मदत बरी.

मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा.

सर्वात मोठे वरदान म्हणजे खरा मित्र लाभणे.

कला, प्रतिष्ठा, स्वातंत्र्य नाहीसे होईल; पण तरीही निसर्ग सुंदर राहील.

नियमांपेक्षा जीवनाचा खेळ खेळणे जरूर असते, पण त्याचे बक्षीस म्हणजे संघर्ष.

प्रतिकूल परिस्थितीत प्रतिभा पुढे येते, भरभराट प्रतिभा लपवते असा नियम आहे.

संस्कृतीच्या प्रगतीबरोबर काव्याचा ऱ्हास होतो.

सूक्ष्म छिद्रांतून जसा सूर्यप्रकाश दिसतो तसा सामान्य गोष्टींतून माणसाचा स्वभाव दिसून येतो.

संपत्ती वाढू लागली की काळजी आणि संपत्तीची हावही वाढते.

वेळेचा सदुपयोग न करणे म्हणजे वेळ न मिळाल्यासारखेच आहे.

चैन वाढली की, मनःशांती ढळते.

जसे फुलातून फळ निर्माण होते तशी श्रद्धेतून कामाची सिद्धता होते.

जसे जीवन असते तसा त्याचा आंत असतो.

उपयुक्ततेची किंमत सुराणा असते, म्हणून धन म्हणजे शूरांच्या हातातील मौल्यवान ठेव होय.

अधिकाराची माणसाला धुंदी चढते.

नास्तिकपणा हा माणसाच्या फक्त ओठावर असतो, मनात नसतो.

लोभ आणि सुख कधीच एकत्र येत नाहीत.

आळस हा माणसाचा शत्रू आहे.

दुसऱ्याचे नुकसान होईल असा विनोद टाळला पाहिजे.

बँक अकॉउंट टूथपेस्टसारखा असतो, ज्याप्रमाणे पेस्ट बाहेर काढायला सोपी जाते परंतु पुन्हा आत ठेवण्यास कठीण असते.

तत्वज्ञ बना पण तत्वज्ञानात आपले माणूसपण विसरू नका.

सर्वांच्या बाबतीत उदार असा; परंतु स्वतःच्या बाबतीत ही उदारता नको.

आधी न्यायी होऊन मगच औदार्य दाखवा.

सर्वांशी सौजन्याने वागा, थोड्यांशी घनिष्ठ संबंध ठेवा, मित्र एकाच करा; पण शत्रुत्व कोणाशीही नको.

दुःखातून येणार आनंद सुखमय असतो.

दया हा मानवाचा धर्म आहे.

सत्याने मिळते तेच टिकते.

परिवर्तन हे काळाचे लक्षण आहे.

कार्य करत राहा, परिणामाचा विचार करू नका.

आधी विचार करा; मग कृती करा.

क्षमा वृत्ती ठेवून क्रोध जिंकावा.

सद्गुणांवाचून सौंदर्य म्हणजे गंधाशिवाय सुमन होय.

असा शिकायचा प्रयत्न करा, की जर तुम्हाला एखादे काम जमले नाही तरीही तुम्ही दुसऱ्याच्या  कामातील अडथळा होणार नाही.

नैसर्गिक श्रेष्ठत्व म्हणजे सौंदर्य.

समाधान हे घराचे सुख आहे.

निघून गेलेला क्षण कधीही परत आणता येत नाही.

सहन करा मनाला आवरा.

मृत्यूला सामोरे जाण्यास नेहमी तयार असा, त्यामुळेच जीवन आणि मृत्यू दोन्ही गोष्टी सुसह्य वाटतील.

शांत राहा आणि एखाद्या गोष्टीवर चटकन विश्वास ठेऊ नका.

मित्राची निवड सावकाश करा. अन मित्र बदलताना घाई करू नका.

शांत आणि विचारी राहिल्यास तुमचे आरोग्य नीट राहील.

चाचणीत पहिले नसावे, जुन्यातले शेवटचे नसावे.

उसनवार पैश्यावर सण साजरा करून भिकारी बनू नका.

सद्गुनीपणा माणसाला विक्षिप्त बनवतो.

सौंदर्य म्हणजे इंद्रियगोचर अनंत परमेश्वराचे प्रतिबिंब असते.

बघणाऱ्याच्या दृष्टीत सौंदर्य असते.

सौंदर्याची निर्मिती करता येत नाही, ते जन्मजात असते.

मदिरेपेक्षाही सौंदर्य वाईट असते, सुंदर असणाऱ्यालाही व  सौंदर्य बघणाऱ्यालाही ते धुंदी चढविते.

सौंदर्य शरीरापुरतेच मर्यादित असते.

सौंदर्यवतीचे आश्रू तिच्या स्मितापेक्षा सुंदर असतात.

सौंदर्य म्हणजेच सत्य आणि सत्य म्हणजेच सौंदर्य.

दुसऱ्याला आनंद देण्यापूर्वी आपण स्वतः आनंदी असावे.

भिकारीसुद्धा दुसऱ्या भिकाऱ्याच्या द्वेष करतो.

गरिबीची कधीही लाज बाळगू नये व श्रीमंतीचा कधीही माज करू नये.

विश्वास ठेवा, चुकीतूनही चांगले निष्पन्न होते.

प्रत्येकाची प्रतिमा त्याच्या वर्तणूकरूपी आरश्यात दिसते.

प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेऊ नका.

प्रत्येक घटनेतून काहीतरी चांगलेच घडत असते, अशा निष्कर्षावर विश्वास ठेवणे चांगले.

मन डागाळण्यापेक्षा शरमेने चेहरा गोरामोरा होणे चांगले.

साध्या दगडापेक्षा पैलू न पाडलेला हिरा चांगला.

अंधश्रद्धेपेक्षा मौन कधीही चांगले.

तरुण माणसाचे दास्य पत्करण्यापेक्षा वृद्ध माणसाचे लाडके होणे चांगले.

एक मिनिट उशिरा येण्यापेक्षा तीन तास लवकर येणे चांगले.

उदारतेशिवाय जगणे व्यर्थच होय.

जर तुम्ही नवनिर्मितीत तुमचे सहकार्य देत नसाल तर तुमच्या अडचणीत तुम्हाला कोणाचेही सहकार्य लाभणार नाही.

चरित्र हाच खरा इतिहास असतो.

सुविचार मराठी


न बघता श्रद्धा ठेवणारे परमेश्वरी कृपा लाभलेलेलच म्हटले पाहिजे.

वर्तमानपत्र न वाचलेले खरे भाग्यवान असतात.

लहान बालकाच्या हास्याचा तिरस्कार करणाऱ्यांपासून सावध रहा.

ज्याला आवडीचे कार्य करायला मिळते तोच खरा भगवान होय.

रोटीपेक्षा रक्ताचे नाते श्रेष्ठ.

गरीब माणसेच भाग्यवान असतात, कारण त्यांच्याजवळ ईश्वराचे राज्य असते.

ज्यांना काहीच म्हणायचे नसते ते सुदैवी असतात आणि सांगण्याकरिता त्यांचे मनही वळविता येत नाही.

मृत सम्राटांपेक्षा भिकारी राहून जिवंत असणे चांगले.

ज्यांना आपले कार्य गवसले आहे, त्यांना ते वरदानच आहे.

शब्दांपेक्षा कृतीचा आवाज मोठा असतो.

कृती हीच व्यावहारिक गोष्ट आहे.

एका नाण्याच्या दोन बाजू असतात सत्य आणि असत्य.

पुस्तके तारुण्यात मार्गदर्शक असतात आणि वृद्धत्वात करमणूक असतात.

पुस्तके क्षुद्र असतात-फक्त जीवनच महान असते.

शहाणपण अंगी असावे लागते, ते पुस्तकातून प्राप्त होत नाही.

उसनवारी करणे हि गोष्ट भीक मागण्यापेक्षा जास्त चांगली नाही.

मेंदूमुळे आपण असा विचार करतो, की आपण विचार करीत आहोत.

प्रकाशित नावे गीताला पावित्र्य प्राप्त करून देतात.

अंतिम उद्दिष्ट गाठण्यासाठी जी साधने आवश्यक आहेत त्यांचे समर्थन करणे भगवान बुद्धानेही बहुदा मान्य केले असते.

सैतानाची पुस्तके म्हणजेच पत्ते होय.

सामर्थ्याने शत्रूला पूर्णपणे जिंकता येत नाही.

श्रद्धेच्या सामर्थ्याने कोणतेही चिरकाल टिकणारे कार्य साध्य करता येते.

उद्योग हा तेलाप्रमाणे असतो. जसे तेल तेलातच एकरूप होते त्याप्रमाणे उद्योग उद्योगाशीच एकरूप होतो.

मोकळेपणा आणि औदार्य अमर्याद असेल तर नाश निश्चित ओढवतो.

प्रत्येक चुकीतून काहीतरी शिका.

जिद्द चिकाटी, मेहनत यावरच यश प्राप्ती होते.

प्रेमाने जग जिंकता येते.

मुलगा, मुलगी एकसमान दोघांनाही शिकवा छान.

गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र.

कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा खूप महत्त्वाची आहे.

चरित्र हाच खरा इतिहास असतो.

कला म्हणजे एखादी वस्तू नाही, तो एक मार्ग आहे.

प्रयत्नांती परमेश्वर.

चिंता पाहुणी म्हणून येते आणि मालक बनून राहते.

मांजरे आपली नखे लपवितात.

भविष्यात आपल्या नशिबात काय आहे याचा विचार करू नका, आज जे तुमच्या हातात आहे त्याचा बक्षीस म्हणून स्वीकार करा.

स्वच्छता पाळणे हे पाप नसून ईश्वरानंतरचे दुसरे कर्तव्य आहे.

दिलेले ज्ञान केव्हाच निरर्थक ठरत नाही.

ज्ञान वाटल्याने वाढते.

चरित्र म्हणजे नियती.

ताकदीपेक्षा संपत्तीची जखडणं मजबूत असते.

योगायोग हा शब्द निरर्थक आहे, करणावाचून काहीच घडत नसते.

चारित्र्याची घडण बालवयातच सुरु होऊन मृत्यूपर्यंत सुरु असते.

ज्याला काही किंमत आहे अशा यशाचा पाया चारित्र्य हाच असतो.

थोर आहेत म्हणून तुम्हाला जननींदारूपी कर समाजाला द्यावा लागतो.

चरित्र हे वृक्षासारखे आहे, कीर्ती ही त्याची छाया आहे.

पवित्र्यामुळे अस्वच्छ जागेत सुद्धा आत्म्यास श्वसनासाठी स्वच्छ हवा मिळते.

मुले गरीब लोकांची संपत्ती असते.

प्रसन्न दृष्टी कुठल्याही जेवणाचे मिष्टान्न बनवते.

प्रसन्नता आणि समाधान दोन्हींमुळे सौंदर्य वाढते आणि दोन्ही सौंदर्य टिकविण्याच्या बाबतीत प्रसिद्ध आहेत.

बालपणाला भविष्याची कल्पना नसते.

परिस्थिती माणसांवर राज्य करते, माणसे परिस्थितीवर राज्य करू शकत नाहीत.

मुले स्वतःबरोबर खूप काळज्या आणतात.

सौजन्याकरिता किंमत द्यावी लागत नाही आणि तरीही त्यापासून प्रत्येक गोष्टीची प्राप्ती होत असते.

संस्कृती थोड्या लोकांना पुढे आणण्यासाठी अनेकांना खाली खेचते.

संस्कृती ही चळवळ आहे स्थिती नव्हे, तो एक प्रवास आहे मुक्कामाची जागा नव्हे.

सदाचार हा माणसाचा खरा अलंकार आहे.

अहिंसा हे भूतलावरचे प्रबळ सामर्थ्य आहे.

पुस्तके म्हणजे मन निर्मल करणारा अविश्रांत झरा आहे.

भेदावर अभेद हेच औषध आहे.  

धार्मिकता हाच घराचा कळस आहे.

चुका आणि अपयश हा प्रगतीचा भाग आहे.

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.

निसर्गावर क्रमशः मिळवलेले विजय म्हणजेच संस्कृती होय.

दुसरी व्यक्ती कदाचित बरोबर असेल अशी कावेबाजपणाने घेतलेली शंका म्हणजे संस्कृती होय.

गरज नसलेल्या गोष्टी गरजेच्या बनून त्या अमर्याद प्रमाणात वाढविणे म्हणजे संस्कृती.

जबरदस्तीपेक्षा मन वाळवून जिंकणे म्हणजे संस्कृती.

सामान्य माणसे प्रार्थना करीत नाहीत, तर याचना करतात.

सामाईक द्येय व सामाईक करणे एकच असतील तर मोठे यश साधते.

व्यवहारज्ञान ही वाटते तितकी सर्वसाधारण गोष्ट नाही.

सहवासाने आपल्या स्वभावाचे कंगोरे व कठीणपणा कमी होऊन स्वभाव नरम होतो.

व्यापाराने संस्कृतीचा प्रसार होतो.

रंग फिके पडतात, देवळे नाश्ता होतात, साम्राज्यांचे पतन होते; पण शहाणपणाचे शब्द चिरकाल राहतात.

दृष्टपणावरील उतारा म्हणजे दया.

गंभीरपणा आणि बालकाचा निरागसपणा एकत्र असू द्यात.

सर्वांशी मिळून मिसळून वागा.

गर्विष्ठपणाच्या कल्पनेचा त्याग करा.

तुमची वागणूक योग्य तेव्हा म्हटली जाते, हेच ती खऱ्या आदर्शाकडे वाटचाल करीत असते.

मृत्यूपूर्वी व्यक्तीची महान व्यक्तींत गणना करू नका.

तडजोड स्वातंत्र्याची ताबेदार असते आणि प्रगतीची शत्रू असते.

सद्सद्विवेकबुद्धी आणि शौर्य यांचा संबंध नसून राजकारणाशी त्याचा संबंध असतो.

नेहमीच संकटाला सामोरे जाण्याने त्याच्याविषयी घृणा निर्माण होते.

निर्मितीपेक्षा टीका करणे जास्त सोपे असते.

रूढी मानवी जीवनातील एक मोठी मार्गदर्शक गोष्ट असते.

ज्या गोष्टींमुळे तुम्हाला राग येते ते भोगावे लागते त्यापेक्षा त्या रंगाचे व दुःखाचे वाईट परिणाम किती प्रमाणात भोगावे लागतील याचा विचार करा.

बालकामध्ये जे कुतूहल असते ती ज्ञानाची भूक असते.

घडून गेलेल्या गोष्टींबद्दल मृतांची शिकवण लक्षात घ्या, पण चालू घटनांबाबत जिवंत व्यक्तींचा सल्ला घ्या.

भित्यापाठी ब्रह्मराक्षस .

काळ आपल्याला सर्व ऋणांतून मुक्त करतो.

दक्षतेमुळे आणि योग्य आधाराने घेतलेल्या संशयामुळे अनेक अनर्थ टळतात.

माणसाच्या प्रगतीसाठी जीवनाइतकेच मृत्यूचे महत्व असते.

दयाळू निसर्गाचा माघारी फिरण्याचा संकेत म्हणजे मृत्यू.

पराभवाच्या शाळेत सत्य नेहमी सामर्थ्यवान असते.

लोकशाही म्हणजे चर्चा करून चालवलेले सरकार, पण हे तेव्हाच परिणामकारक होते जेव्हा लोकांची व्यर्थ बडबड थांबवली जाते.

परावलंबित्व मानवाचे नित्याचे लक्षण आहे.

निराशा ही कृतघ्नता आणि आशा म्हणजे ईश्वराची उपासना होय.

यश मिळवण्यासाठी निर्धार महत्वाचा व अत्यावश्यक असतो.

अपयशाची भीती ही लाखो लायक लोकांना अपयश देते.

युद्धभूमीवर जे मिळते क्वचित टेबलावर चर्चा करून मुत्सद्दीपणामुळे प्राप्त होते.

दाक्षायतेमुळे आणि योग्य आधाराने घेतलेला संशयामुळे अनेक अनर्थ टळतात.

तुमच्या योग्यतेप्रमाणे चांगले काम करा नाही तर तुमचे कल्याण होणार नाही.

दीर्घायुषी होण्यासाठी किती अल्प खर्च येति व निसर्गाला किती कमी गोष्टींची अपेक्षा असते हे समजून घ्या.

पटकन कोणाशीही मैत्री करू नका व एकदा केलेली मैत्री टिकवून धरा.

त्रासदायक होऊ नका, सदाचरणी रहा.

जेवढे तुम्हाला शक्य असेल तितके सर्वांशी शांततेने रहा.

स्वतःचे कार्य करीत राहणे सर्वात चांगले, बाकी सर्व ईश्वरावर सोपवावे.

जे तुम्हाला आज करता येण्यासारखे आहे ते उद्यावर टाकू नका, कारण जर त्याने तुम्हाला आज आनंद वाटलं तर तो उद्याही लुटता येईल.

दुसऱ्यांच्या निर्दयीपणाविषयी बोलू नका, याउलट स्वतःच्या गुणांविषयी बोला.

एकाच कामातून अधिक मोबदल्याची अपेक्षा करू नका.

काटकसर म्हणजे कमी खर्च करणे नव्हे तर शहाणपणाने खर्च करणे होय.

शिक्षण समृद्धीच्या काळात दागिन्यासारखे असते आणि अधोगतीच्या काळात आधार देणारे असते.

फुर्सतीचा वेळ हवा असेल तर तुमच्या वेळेचा सदुपयोग करा.

चुका गवताप्रमाणे पृष्टभागावर तरंगतात.

पडताळून पाहण्यापेक्षा प्रत्येक व्यक्ती विश्वास ठेवणे पसंत करते.

मानवी जीवनाचा प्रत्येक टप्पा अद्भुतरम्य असतो.

व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक महान व्यक्तीत आदर्शाचा अंश असतो.

कोंडून ठेवल्यास हिंस्त्र प्राणी सुद्धा त्यांचे शौर्य विसरतात.

प्रत्येक आनंदाच्या क्षणाबरोबर त्रासाचे अनेक क्षण असतात.

प्रत्येक व्यक्तीस जितक्या सामंजसपणाची गरज असते तितकाच गर्व असतो.

चीड आणणारी प्रत्येक कृती ही मदतीसाठी दिलेली हाक असते.

प्रत्येक व्यक्तीला आपले ओझे वाहावेच लागते.

स्कूल सुविचार

आपण सैनिक झालो नाही म्हणून प्रत्येक माणूस स्वतःला कमी लेखात असतो.

प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यातील उत्तम क्षणांवरून त्याची किंमत ठरते.

प्रत्येक व्यक्ती आपल्या देशावर प्रेम करते आणि त्याची प्रशंसा करते, कारण त्या देशाने तिला निर्माण केले असते.

आनंदाने उद्या मारणारा प्रत्येकजण सुखी असतोच असे नाही.

प्रत्येक सर्वोचम गोष्ट स्वतःत लपलेली असते.

जर आपण बघू शकलो तर सर्वदूर यशाकडे नेणाऱ्या पायऱ्या दिसतात.

चांगल्या वार्तापेक्षा वाईट वार्ता द्रुत गतीने पसरतात.

नेहमी दृष्टपणाची सरशी होते, पण विजय होत नाही.

प्रत्यक्ष उदाहरण हा सर्व लोक गिरवू शकतील असा धडा आहे.

पुन्हा केलेली चूक तुम्हाला अनुभवामुळे ओळखता येते.

नैतिकदृष्या अनुभवाला किंमत नसते. माणसाने त्याच्या केलेल्या चुकांना अनुभव हे नाव दिलेले असते.

अपयश भांडवल कमी पडते म्हणून येत नाही तर मेहनत कमी पडल्याने येते.

श्रद्धा ही जीवनाची शक्ती आहे.

श्रद्धेमुळे वर्तमानकाळातील विसंगती भविष्यकाळातील सुसंगती होतात.

खोटा विनय हा मुळीच नसण्यापेक्षा बरा असतो.

कीर्ती ही लोक भोळे असल्याचा पुरावा होय.

कौशल्याच्या ठिकाणी ताकदीचे काम नसते.

ताकदीने सर्व काही जिंकता येते, पण हे विजय फार अल्पकाळ टिणारे असतात.

जीवन बदललत असते, पण दैव अचानक बदलते.

मित्र तापमापकाप्रमाणे असतात , त्यांचा आपल्या नशिबाचे तापमान पाहायला उपयोग होतो.

मैत्री जत्रेत विकत घेता येत नाहीत.

अशी अनेक फुले उमलतात, कि ज्यांच्यावर कोणाचीही दृष्टी पडत नाही व त्यांचा सुगंध वाऱ्यावर उडून जातो.

सामान्य मते नेहमी चुकीची असतात.

जुगार हा मत्सरी बुद्धीची उपज आहे, घोर अन्यायाचा भाऊ आहे व खोडसाळपणाचा जनक आहे.

सातत्याने बाळगलेली सावधानता म्हणजे प्रतिभा.

गुंतागुंतीचा प्रश्न सोपा करण्याची क्षमा म्हणजे प्रतिभा.

खरे पाहता अलौकिक बुद्धिमत्ता म्हणजे धोपटमार्गाने  आकलन करण्याच्या क्षमतेपेक्षा उच्च दर्जाची नैसर्गिक शक्ती होय.

सत्कृत्य करणारा कुलीन असतो.

आपल्या हेतूंविषयीचा निश्चितपणा हा चारित्र्य घडविणारा अतिशय आवश्यक असा बंध आहे.

दैव हा शासनकर्ता नसून ईश्वराचा चाकर आहे.

भीती अंधश्रद्धेचा प्रमुख स्रोत आहे आणि कौर्याच्या अनेक स्रोतांपैकी एक आहे.

सहजीवन म्हणजे स्वर्ग आणि सहजीवनाचा अभाव म्हणजे नरक.

मुर्खांच्या चेहऱ्यांप्रमाणेच त्यांची नावेही सार्वजनिक ठिकाणी नेहमी सापडतात.

विकसनशील आत्म्यांच्या संदर्भात मोठे मोठे वादविवाद म्हणजे मन मोकळे करणाऱ्याचे साधन होय.

ईश्वराने निर्माण केलेली सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे फुले; पण त्यात तो आत्मा फुंकायला विसरला.

प्रतिष्ठा मिळविण्याचे इतर मार्ग खुंटले तरच चांगली वस्त्रे वापरण्याचे तंत्र वाईट म्हणता येणार नाही.

वीरकृत्यांचा सुगंध म्हणजे कीर्ती होय.

प्रवासी पाच तास झोपतात, विद्वान सात तास, व्यापारी आठ तास आणि प्रत्येक आळशी अकरा तास.

ईश्वराच्या रचनेनुसार मानव कार्य करतो.

सौजन्यता दुर्बलता आणि अकार्यक्षम व्यक्तींची मक्तेदारी नाही.

तुमचे मन निराश होऊ देऊ नका.

तुमचे शिंग फुंकण्यासाठी दुसरा कोणी शोध म्हणजे आवाज दुप्पट लांब जाईल.

देव बरा करतो, पण श्रेय जाते डॉक्टरला.

चांगले मित्र आणि चांगला सल्ला या गोष्टींमुळे सद्गुण जोडले जातात.

कायद्याचा आश्रय घेणे म्हणजे मांजर मिळवण्यासाठी गाय गमावणे.

जो भावनेचा गुलाम नाही असा माणूस मला दाखवा. मी त्याला हृदयात स्थान देईल.

कीर्ती दुरून काजव्यासारखी प्रकाशमान दिसते, पण जवळून पाहिल्यास त्यात प्रकाश नसती आणि उष्णताही नसते.

स्वार्थाच्या तत्वावर मिळविलेली प्रतिष्ठा लाजिरवाणी आणि गुन्हेगारी असते.

ईश्वराने माणसाला पृथ्वी प्रेम करण्यासाठी दिली आहे, परंतु आपली हृदये छोटी असल्याने एकच ठिकाण आपले सर्वात प्रिय असावे.

चांगल्या योजनांतून चांगले निर्णय आकार घेतात.

चांगुणपणाचा प्रसार केल्याने तो खूप वाढतो.

अफवा पिणाऱ्या आणि बडबडणाऱ्या बेडकासारख्या असतात.

चांगुलपणाला ज्ञानाची जोड हवी. नुसता चांगुलपणा काही उपयोगाचा नसतो.

बहुतेक माणसांत कृतज्ञता फक्त अधिक फायदा मिळविण्याची प्रबळ आणि सुप्त इच्छा असते.

मोठेपणा व चांगुलपणा एक व्यक्तित क्वचितच एकत्र दिसतात.

महान माणसांची माने साधी असतात.

थोर माणसे निखळत्या तार्यांसारखी असतात. पृथ्वी प्रकाशित करण्यासाठी ते स्वतः जाळतात.

महान व्यक्तींच्या दुर्गुणांची सुद्धा वाहवा होते.

ऐहिक शक्तीपेक्षा आध्यत्मिक शक्ती जास्त प्रबळ असते अशा विचारांची माणसेच महान असतात.

सामर्थ्याच्या म्हणता नसते, परंतु सामर्थ्याचा योग्य उपयोग करण्यात म्हणता असते.

तीव्र भावनावेग बरा न होणार आजार आहे व त्यावर जे उपचार केले जातात त्या उपचारानेंच ते वाढत असतात.

अति श्रीमंती आणि समाधान एकत्र आढळत नाही.

प्रतिभासंपन्न माणसात विक्षिप्तपणा आढळतोच.

सवयीला वेळीच मोडता घातला नाही तर ती गरज होते.

सवयी सुरुवातीला कोळ्याच्या झाल्याप्रमाणे नाजूक असतात, कालांतराने मजबूर दोर होतात.

जीवनाचा अंतिम टप्पा सुख नसून चारित्र्य आहे.

धर्मासारखीच सुख ही एक गूढ गोष्ट आहे, कधीच त्याला कार्यकारणभाव सांगता येत नाही.

जीवनाचा हेतू सुख मिळवणे असतो.

सुख हे संसर्गजन्य आहे. आपले सुख शेजाऱ्याबरोबर आणि जगासमोर प्रकट केल्याशिवाय आपण सुखी होऊ शकत नाही.

वाईट गोष्टींना वेळीच आवर घाला म्हणजे उत्तर वयात त्याची पुनरावृत्ती होणार नाही.

मानवजातीची अर्धी दुःखे ही अज्ञानातूनच जन्म घेत असतात आणि अर्ध्या गोष्टी माणसाच्या अहंकारातून निर्माण होतात.

स्वभाव वाहत्या प्रवाहाप्रमाणे आहे, साचलेल्या डबक्याप्रमाणे नाही.

ज्या माणसाचा व्यवसाय मोठा आहे आणि ज्याची वृत्ती नम्र आहे तो खरा सुखी असतो.

शेजाऱ्यांकरिता कष्ट करण्यातच सुख असते.

जे डोळ्यांनी पहिले जात नाही त्याचा चटकन विसर पडतो.

जन्म ठिकाणामुळे मोत्याची शुभ्रता कमी होते काय?

कोणाचाही द्वेष करू नका. त्यांचा द्वेष करू नका त्यांच्या दुर्गुणांचा द्वेष करा.

सर्व धर्म समान.

काही सांगण्यासारखे असावे, ते सांगावे, सांगितल्यावर गप्पा बसावे.

कोणाबद्दल कधीही वाईट चिंतू नये.

मरणे सोपे असते, जगण्यासाठी मात्र धैर्य लागते.

जो समोरून वार करतो तो तुमचा खरा मित्र असतो.

ज्याला स्वतःचे विस्मरण होते तो एक मूर्ख.

राजा असो व शेतकरी तो सर्वात सुखी ठरतो जेव्हा त्याच्या घरात शांतता असते.

ज्याला कोणाची स्तुती करावी लागत नाही व कुणाकडून उसने घ्यावे लागत नाही तोच खरा श्रीमंत.

त्याच्याजवळ काय आहे त्यापेक्षा तो कसा आहे यानेच तो श्रीमंत किंवा गरीब ठरतो.

जो एकांतात राहू शकतो तो खरोखरीच महान असतो.

जो हसतो तो विजयी होतो.

जो सर्वाना नाखूष करतो त्याचा सर्वजण तिरस्कार करतात.

सज्जन लोकांच्या सहवासाने चांगले संस्कार होतात.

जो विश्वासाचा आदर करत नाही त्याला त्याच्या मार्गावर सुख लाभत नाही.

नीट खाणाऱ्या-पिणार्याने आपले कर्तव्य नीट करावे.

संपत्ती आणि सत्तेमागे लागून जो आपल्या कर्तव्यात कसूर करतो त्याच्यापाशी प्रामाणिकपणा आणि धैर्य फार काळ टिकत नाही.

स्वतःच्या प्रेमात पडणाऱ्याला प्रतिस्पर्धी नसतात.

तुमच्या समोर तुम्हाला घाबरणारा तुमच्यामागे तुमचा द्वेष करतो.

ज्याने श्रद्धा गमावली त्याच्याजवळ जगण्यासारखे काय उरले?

ज्याने कधीच नाडी पाहिलेली नाही त्याला प्रथम नदी पाहून तो समुद्राचं वाटतो.

जो धर्माची कदर करत नाही तो राजा होण्यासाठी लायक नसतो.

ज्याला अमाप पीक मिळाले आहे त्याला त्यातील थोड्याश्या रानटी रोपांचे काही वाटत नाही.

ज्याला कोणाचाच आसरा नसतो त्याला उघड्यावर पडावे लागते.

जो आपले ज्ञान वाढवतो त्याचबरोबर दुःखही वाढवतो.

जो सबबी सांगत राहतो त्याच्याकडून कोणतेही काम होत नाही.

ज्याच्या मनात पूर्वग्रह असतो त्याच्या मनात दृष्टता असते.

दारूच्या नशेत खून करणारा शुद्धीत असतांना फासावर जातो.

ज्याची सदविवेक बुद्धी नॅश पावली आहे त्याच्याजवळ राखून ठेवण्यासारखे काहीच उरत नाही.

स्वतःची स्तुती करणारा स्वतःवरच शिंतोडे उडवून घेतो.

ज्या मनुष्याला आशा नसतात त्याचे जगणे कर्मदरिद्रीच म्हणावे.

जो आपल्या कमला नावे ठेवतो तो उदर्निर्वाहाला मुकतो.

जो आपल्या दुःखापेक्षा आपले सुख लपवून ठेवू शकतो तो माणूस मोठाच समजावा.

जो तारुण्यपणात फक्त स्वतःचाच विचार करतो तो प्रौढपणी कंजूस होईल आणि म्हातारपणी दरिद्री कंजूस होईल.

जो पापाला शक्य असूनही मनाई करत नाही तो त्याला उत्तेजन देतो.

ज्यांना संकटांची चाहूल आधी लागते त्यांना त्यापासून दोनदा त्रास होतो.

ज्याने शंकेवर आणि भीतीवर विजय प्राप्त केला त्याने अपयशावर विजय प्राप्त केलेला असतो.

ज्याने संपत्ती कामवाली आहे तो प्रसिद्ध, शूर आणि न्यायी होतो.

ज्याच्याजवळ सदविवेकबुद्धी नसते त्याच्याजवळ काहीच नसते.

स्वतःवर नियंत्रण ठेवणारा चांगले राज्य करू शकतो.

जो विज्ञानाचा अभ्यास करून त्याचा दैनंदिन जीवनात उपयोग करून घेत नाही त्या माणसासारखा असतो, जो नांगरणीकरून पेरणी करत नाही.

काहीच मूर्खपणा न करता जगणारी व्यक्ती स्वतःला समजते तितकी शहाणी नसते.

आळशीपणाच्या विचाराने ज्याला दुःख होते तो आळशी कसा असेल.

जो सत्याचा पाठपुरावा करतो तो एकाच देशाचा असू शकत नाही.

जो स्वतःमध्ये सर्वांचे अस्तित्व आणि सर्वांमध्ये स्वतःचे अस्तित्व पाहतो त्याला भीती उरत नाही.

इंद्रियसुखात न रमलेली व्यक्ती आत्मसुखातच रमते.

आरोग्य आणि संपत्ती यांचा जीवनात खूप उपयोग होतो.

परमानंदाच्या महत्त्वाचे तत्व आरोग्य होय.

कष्ट करण्याने आरोग्य चांगले राहते आणि कष्ट करणे हा चांगल्या आरोग्याचा राजमार्ग होय.

माहिती कमी असल्याने संतापाची तीव्रता कमीजास्त होते.

व्याजाचा दार जास्त असल्यास ठेवीची सुरक्षितता नसते.

सर्वांनी मान्य केलेला खोटेपणाचा संच म्हणजे इतिहास.

इतिहास म्हणजे उदाहरणांवरून शिकलेले तत्वज्ञान होय.

प्रामाणिकपणा हे अत्त्युत्तम धोरण आहे.

इतिहास हा काळाचा साक्षीदार असतो आणि सत्याचा प्रकाश असतो.

मान किंवा लाज विशिष्ट परिस्थितीतून उत्त्पन्न होत नाहीत, तर तुमच्या चांगल्या कृतीतूनच सन्मान प्राप्त होते.

पवित्र, नम्र, संयमपूर्ण, श्रद्धायुक्त, मनापासून व सातत्याने केलेली प्रार्थनाकधीही वाया जात नाही.

आशा सुखदायक असते. नित्य निराशा जरी पदरात पडली तरी आशा नष्ट होण्यापेक्षा ही निराशा कमी त्रासदायक असते.

आशेवर जगणारे नरकात जातात.

कृतघ्न अपत्य सापाच्या दातांपेक्षा त्रासदायक असते.

मानवी कृतीच काव्याचे उगमस्थान असते.

मानवाचे अस्तित्व नेहमीच अविचारी व क्लेशदायक असते, परंतु पृथ:करणांती ते रमणीय ठरते.

मानवी इतिहास, शिक्षण आणि आपत्ती यांच्यामधील एक चुरशीची चढाओढ होय.

विनम्रतारूपी पेरलेल्या चांगल्या बीजातून स्वर्गीय गुणांचे धुमारे फुटतात.

विनोद प्रतिष्ठेला पृष्ठी देतो आणि त्याच्या वाटल्या जे जे येते त्याबद्दल त्याच्या श्रेठतेचा विनोद हा जाहीरनामा असतो.

गांभीर्याच्या पाठीमागे लपवलेली चेष्टा म्हणजे विनोद होय.

सार्वजनिक करमणुकीच्या कार्यक्रमाचा मी पाठीराखा आहे, कारण ते लोकांना दुर्गुणांपासून दूर ठेवतात.

नुसते मधुर संगीत ऐकून मला आनंद होत नाही.

मी माझ्या नशिबाचा मालक आहे. मी माझ्या मनाचा कप्तान आहे.

मी त्याला काही किंमत देत नाही, जो दुसर्यांमुळे लोकप्रिय झालेला असतो.

मी त्या वाईट माणसाचा तिरस्कार करतो, जो चांगुलपणाविषयी बोलतो.

धूम्रपानाची सवय ही रानटी, घाणेरडी आणि इजा करणारी आहे असे मी नेहमी मानले आहे.

माणसाने आपले आचरण नेहमी शुद्ध ठेवावे.

भविष्यकाळाचा अंदाज घेण्यासाठी भूतकाळाव्यतिरिक्त दुसरा मार्ग नाही.

मी माणसावर प्रेम करत नाही, पण त्याहीपेक्षा अधिक निसर्गावर करतो.

काहीतरी केले गेले पाहिजे हे म्हणण्यापेक्षा मी काहीतरी केले पाहिजे याने अनेक समस्या सुटतील.

कल्पनाच इतिहास कसा घडणार त्याची रूपरेषा ठरवतात.

आळशीपणातूनच सर्व हानिकारक गोष्टींचा उगम होतो.

आळशी माणूस भिंत नसलेल्या घरासारखा असतो. तयार दुर्गुण चोहोबाजूनी प्रवेश करू शकतात.

उद्या येणाऱ्या दुःखाचा विचार न करता आजचा आनंद उपभोगून घ्या.

आपले अस्तित्व इतरांच्या कल्याणासाठी अर्पण करण्यातच मनाचा मोठेपणा आहे.

आळशीपणा हे भिकेचे लक्षण असते.

सर्व वाईट गोष्टींचे मूळ आळशीपणातच असते.

जर श्रीमंत माणसाला निरोगी जीवन जगायचे असेल तर त्याने गरिबाप्रमाणेच राहावे.

धैर्य संपले की सर्वकाही नष्ट झाल्यासारखे वाटते.

जर मूर्खपणाच दुःख असेल तर घराघरात रडणे ऐकू आले असते.

मी जर काही मोठे कार्य करू शकत नसेल तर लहान कार्यच मोठ्या पद्धतीने करू शकतो.

जर माझ्या मनात कृतज्ञतेची भावना असेल तर मी कृतज्ञ होतोच.

ज्यावेळेचं कार्य करावयाचे त्यावेळेस ते केल्यास चांगले आणि तत्परतेने होते.

चुका आणि अपयश हा प्रगतीचाच भाग असतो.

मैत्री हि वर्तुळासारखी असते जीचा कधी शेवट नसतो.

अडथळ्याशिवाय तुम्हाला एखादा मार्ग सापडला असेल तर तो पुढे कोठेही जात नाही.

जर तुम्ही चुकुंपणे एखाद्या रहस्याच्या मुळाशी पोहोचलात तर ते रहस्य, रहस्य राहत नाही.

तुम्ही जे हवेतच किल्ले बांधले तर तुमचे काम वाया जाणार नाहीत, कारण किल्ले हवेतच असतात. आत फक्त त्यांच्या खाली पाय बांधा.

जर तुम्ही नुसतेच बसून राहिलात तर नफा हीनार नाही पण खर्च मात्र होईल.

तुम्हाला दुःख असल्यास देवाचे आभार माना, कारण ते तुम्ही जिवंत असल्याचे लक्षण आहे.

आयुष्यात यश मिळवण्यासाठी चिकाटीला जिवलग मित्र बनवा.

जर तुम्हाला एखादी व्यक्ती कशी आहे हे जाणून घ्यायची इच्छा असेल तर तिला अधिकाराच्या जागेवर बसवा.

जर तुम्हाला खूप लोकांची सहानभूती मिळवायची असेल तर तुम्ही त्यांना असंस्कृत आणि जास्तीत जास्त मूर्खपणाच्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत.

जर तुम्हाला तुमची गुणवत्ता पारखायची असेल तर दुसऱ्याची गुणवत्ता मान्य करा.

जर तुम्हाला मी रडावे असे वाटत असेल तर तुम्हाला स्वतःला दुःखाची जाणीव झाली पाहिजे.

जर तुम्हाला खरेखुरे स्वातंत्र्य उपभोगायचे असेल तर तुम्ही तत्वज्ञानाचे गुलाम झाले पाहिजे.

अज्ञानीपणा व चुका या गोष्टी पाणी व भाकरीइतक्याच जगण्यासाठी आवश्यक असतात.

अज्ञान हा वातावरणातील बिघाडाचाच एक प्रकार आहे.

वाईट मार्गाने मिवलेले वाईट मार्गानेच खर्च होते.

कल्पना आपल्या स्वप्नांवर राज्य करतात.

असभ्य शब्दांचे समर्थन करता येणे शक्य नाही, कारण सभ्यतेचा अभाव म्हणजे बुद्धीचाच अभाव म्हटलं पाहिजे.

अमरत्व हे भाग्य मृत्यूपेक्षा वाईट.

जे अमरत्वाचा लायक आहेत त्यांनाच अमरत्व मिळेल.

खेळात जिंकणे आणि हर्णे या दोन्हींमध्ये समाधान असते, परंतु प्रत्यक्ष जीवनात हरणाऱ्याला शून्य गुण मिळतात.

जीवनाला आवश्यक असणाऱ्या गोष्टींमध्ये सर्वात त्रासदायक गोष्ट म्हणजे नोकर होय.

शहरात दुर्गुण सहजासहजी लपले जातात किंवा त्याची विशेष निर्भत्सरणा होत नाही.

प्रत्येक गोष्टीचा भरपूर चैनीनंतर वीट येतोच.

मोठ्या घटनांच्या बाबतीत सर्वांना खुश करणे कठीण असते.

प्रेमाच्या राज्यात जो प्रथम सावरतो तो खरा सावरला जातो.

माणसांमध्ये आपल्याला अधिराज्य गाजविणारे निरनिराळे विकार सापडतात.

सुज्ञ माणसाप्रमाणे शांततेच्या काळातच त्याने युद्धाच्या वेळच्या जरुरीतींची सोय करून ठेवली.

मराठी सुविचार

राजकारणात प्रयोग म्हणजे क्रांती होय.

अनेक पुस्तकांच्या वाचनाने मनाची चलबिचल होते.

तुझ्या चेहऱ्यात मला सन्मान, सत्य आणि एकनिष्ठा यांचे चित्र दिसते.

हे चित्रालाबाधीत सत्य लिहून ठेवता येईल कि, चांगले कवी हे वाईट टीकाकार असतात.

युद्धामध्ये विजयला पर्याय नसतो.

उद्योगप्रियता ही केवळ प्रगतीचे साधन नाही तर सुखाचा पाया आहे.

अन्याय सहन करणे सोपे असते, पण न्यायाचा दंश सहन करणे कठीण असते.

निर्बुद्ध माणसाला बुद्धिमत्ता दिसत नाही.

बुद्धिमत्ता असली म्हणजे चुका होत नाहीत, असे नाही, तर झालेल्या चुकांच्या त्वरित दुरुस्तीवरून बुद्धिमत्ता समजते.

मरण म्हणजे शेवटची झोप आहे का ? नाही, मृत्यू म्हणजे शेवटची आणि अंतिम जागृती होय.

सुखाचे मरण हवे असल्यास त्याची जबर किंमत मोजावी लागते.

कधीतरी आत्मपरीक्षण करणे चांगले आणि खात्री करून घेणे की, पैश्याने जी गोष्ट विकत घेता येत नाही ती तुम्ही गमावलेली नाही ना.

दुःखाला प्रतिबंध करणाऱ्याच्या कामात शहाणपण असते आणि दुःख आलेच तर सूद न घेणे हे मोठ्या मनाचे काम असते.

ज्यांच्याबरोबर मैत्री आहे त्यांच्याशी जीवनाच्या शेवटपर्यंत मित्रत्वाने राहणे सर्वात चांगले असते.

तरुणपणातच पुस्तके आपणास सुखाचा भरपूर उपभोग घेण्यास शिकवितात आणि म्हातारपणी समाधानाने आठवणी काढण्यास मदत करतात.

आपले कधी न कधी मन चलबिचल होते हे एक सामान्य संकट असते.

एक पद्धत स्वीकारून त्या दिशेने प्रयत्न करा, यातच सुज्ञपणा आहे. जर ती पद्धत अपयशस्वी ठरली, तर ते मोकळेपणनाने मान्य आणि दुसरा मार्ग शोध. पण प्रयत्न करीत रहा.

प्रामाणिकपणापेक्षा फसवणुकीचा धक्का कमी लोकांना बसतो, हा विचार निराशाजनक आहे.

अश्यक्य उपाय सुचविणे सोपे असते.

सुधारणेचा विजय व्हावा अशी इच्छा असेल तर ती केव्हाही यशस्वी होता कामा नये.

शत्रूशी मैत्री झाल्यावर त्याला माफ करणे सोपे जाते.

दुःखामुळे त्रागा करून केस उपटणे याने जर दुःख कमी होत असेल तर टक्कल पडले तर दुःखच वाट्याला येणार नाही असे गृहीत धरता येत नाही.

ज्यांना आपण दुखावतो त्यांचा आपण द्वेष करणे हा मानवी स्वभाव आहे.

मनुष्याच्या अंतर्मनात काय चालले आहे याचा थांग लागणे कठीण असते.

प्रेम करूनही शहाणपणाने वागणे अश्यक्य असते.

माणसाला शत्रू नसणे ही अश्यक्यप्राय: गोष्ट आहे.

ज्ञानच अंतिम मुक्ती देते.

आपले अपराध काबुल करणे अवघड नाही, पण आपल्या हास्यास्पद आणि लाजिरवाण्या कृत्यांची कबुली देणे अवघड असते.

मरणापेक्षा जीवन जगण्याला जास्त धैर्य लागते.

 प्रत्येकालाच काही शोध घेणारे नाक लाभलेले नसते.

दाढी ठेवल्याने कोणी तत्वज्ञ होत नाही.

ईश्वराची मर्जी नसेल तर फाजील विश्वास बाळगणे शहाणपणाचे नाही.

कामामुळे माणसे मारत नाही तर काळजीमुळे मारतात.

अपमानाचा बदला घेण्यापेक्षा त्याच्याकडे दुर्लक्ष करणे नेहमी चांगले असते.

ज्या स्त्रियांना ईश्वर सौंदर्य प्रदान करतो त्यांनाच तो छळवादी का बनवितो हे एक मोठे कोडे आहे.

फक्त हलकट माणसांनाच कायद्याचे बंधन जाणवते.

वेड्याचे सोंग घेण्यात कधीकधी गंमत असते.

दुर्मिळतेमुळे आनंदाला उधाण येते.

टीकाकारांच्या टीकेमुळे लेखकाचे मन क्वचितच दुखावले जाते.

ज्याकामाची सुरुवात कधी होत नाही ते काम पूर्ण होण्यासाठी सर्वात दीर्घकाळ लागतो.

इतरांवर अन्याय करणे हे माहित नसणे हे चांगल्या माणसाचे लक्षण आहे.

शरीराला संपन्नता मनामुळे येते.

चुका करणे हा मनुष्यस्वभाव आहे, परंतु मूर्ख माणूस सतत चुका करत असतो.

जे विसरायचे असते ते शिकणे म्हणजे महामुर्खपणा होय.

जो पिता आपल्या मुलास जाणतो तो सुज्ञ पिता होय.

दुसऱ्यांवरील आपत्ती पाहून सावधानता बाळगणे चांगले.

श्रीमंत असण्यामधील खराबी अशी असते की, तुम्हाला श्रीमंत लोकांबरोबरकंच राहावे लागते.

जशी ज्योतीला इंधनाची आवश्यकता असते त्याचप्रमाणे वक्तृत्वालाहीज्ञानाची आवश्यकता असते.

कुठल्याही गोष्टीची चांगली बाजू पाहणे ही सवय वर्षाला लाख रुपये कामविण्यासारखे होय.

परमेश्वर बोलतो की योद्धा बोलतो यावर बरेच काही अवलंबून असते.

माणसाला ओळखायला माणुसकी लागते.

शांतपणे दुसऱ्याचे संभाषण ऐकून घेणारी व्यक्ती मोठीच असावी लागते.

शंकेवर मत्सर पोसला जातो. ज्यावेळी शंकेची जागा निश्चितता घेते त्या वेळेस तो एक वेडेपणा ठरतो किंवा त्याचा अंत होतो.

विनोद करणारे नेहमीच प्रेषित ठरतात.

सर्वांवर आणि सर्व गोष्टींवर जेव्हा तुम्ही प्रेमाचा वर्षावर कराल, तेव्हा तुम्ही खरे आनंदी व्हाल.

तुमचे मूल्यमापन होऊ नये असे वाटत असेल तर तुम्हीही दुसऱ्याचे मूल्यमापन करू नये.

तुम्ही स्वतःचे परीक्षण कराल तर तुम्ही उदारतेने दुसऱ्याची किंमत करू शकाल.

ज्याप्रकारे हत्तीच्या पावलांच्या ठश्यात इतर सर्व प्राण्यांच्या पावलाचे थशे सामावतात, त्याप्रमाणे अहिंसा या सद्गुणात इतर सर्व सद्गुण सामावलेले असतात.

न्यायला पक्ष, मैत्री आणि नातेसंबंध यांच्याकडे दुर्लक्ष करावे लागते; म्हणूनच न्याय आंधळा असतो असे म्हणतात.

नुसता न्याय देऊन भागणार नाही तर तो न्यायाने झाला पाहिजे व त्याबाबतीत कसलीही शंका उपस्थित होता कामा नये.

लग्नापूर्वी डोळे पूर्णपणे उघडे ठेवा, लग्नानंतर मात्र ते अर्धे बंद ठेवा.

५८०. सद्गुणांच्या सामर्थ्याने ऐहिक स्वार्थ दूर राहून तुमचे मन पवित्र राहील.

तुमची तारुण्यातील स्वप्ने जिवंत ठेवा.

दयाळूपणा वेदनाशामकाचे काम करतो, तो दुःखावर फुंकर घालतो, गर्व कमी करतो, स्वार्थीपणा घालवितो आणि क्रोध शांत करतो.

दयाभाव ही अशी एक भाषा आहे, जी बहिरा ऐकू शकतो व अंधालाही वाचू शकतो.

दयाळूपणा विश्वातील सर्वात प्रभावी शक्ती आहे.

दयाळूपणा हा पचायला जाड असतो. गर्विष्ठ पोटाला तो चालत नाही.

दयाळूपणा हा चटकन विसरला जातो, घाव कधी विसरले जात नाही.

राजा म्हणून कोणी जन्माला येत नाही. ती सार्वत्रिक मोहाची निर्मिती असते.

निसर्गतःच राजे लोकांना साधारण लोकांचा सहवास प्रिय असतो.

राजे राज्यांसाठी लढतात, मूर्ख लोक स्तुतीसाठी लढतात.

बदमाशांचा उत्तम बंदोबस्त म्हणजे बदमाशी.

सर्वांना समजून घ्या म्हणजे तुम्ही सर्वांना क्षमा करू शकाल.

आत्मपरीक्षण करा, ईश्वराच्या खरेखोटेपणाची पडताळणी करू नका, मानव हाच मानवाच्या अभ्यासाचा विषय समजावा.

पैसे कसे कमवायचे व पैसे कसे वाचवावे हे जाणून घेणारच माणूस श्रीमंत होतो.

संशय निर्माण होण्याची शक्यता ज्ञान आणू व्यक्तिमत्वात असते, परंतु संशय नाहीसा करण्याचे कामही ज्ञानच करते.

ज्ञान दुसऱ्याला देता येते, पण शहाणपण देता येत नाही.

आपण खूप शिकलो याचा ज्ञानाला गर्व असतो, पण आपल्याला काहीच माहित नाही म्हणून शहाणपण नम्र असते.

ज्ञान म्हणजे दुसरे काही नसून विविधतेत एकटा शोधणे होय.

सद्गुणानंतर ज्ञान ही एक अशी गोष्ट आहे, की जिच्यामुळे एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा सर्रास ठरू शकते.

श्रम हेच जीवन.

श्रम ही धर्माची दासी आहे.

संपत्तीचा अभाव हे सर्व वाईट गोष्टींचे मूळ आहे.

मुर्खांच्या मूर्खपणावरच वकिलांची घरे बांधली जातात.

आळशी व्यक्तींना नेहमीच काहीतरी करावे असे फक्त वाटत असते.

शिक्षण हे वृद्धांच्या बाबतीत सुद्धा सदैव तारुण्याप्रमाणे ताजेतवाने असते.

विद्या ही गरीबाची संपत्ती आहे, श्रीमंतांचा सन्मान आहे, तरुणांना मदतनीस आहे आणि वयस्करांना आधार व सुख आहे.

ज्या सद्गुणांच्या कृतीमुळे व्यक्ती नैतीकतेत, ज्ञानात आणि अध्यात्मात मोठी होते, त्यात समाधान सामावलेले असते.

मूर्ख माणूस गप्पा राहिला तर त्याला लोक साधू समजतात.

माणसाने प्रेमाने क्रोधावर मात करावी.

कानाला कशाचेच वावडे नसावे, पण कोणत्याही गोष्टीवर चटकन विश्वास ठेऊ नये.

आपण आपली प्रगती करणे हा इतरांनाही प्रगती करायला लावण्याचा उत्तम मार्ग आहे.

कोणत्याही कामाचा आरंभ चांगला करा, म्हणजे त्या कामाचे परिणाम आपोआप चांगले होतील.

मुक्या प्राण्यांना देखील निसर्गाने स्वातंत्र्य दिले आहे.

स्वातंत्र्य हवे असेल तर ते मर्यादित असावे.

आपल्यासारख्या मर्त्य मानवांना हे जीवन श्रमाशिवाय काहीही देता येत नाही.

मरणाइतकेच जीवन हे गूढ आहे, तरी सुद्धा आपल्याला आपले जावं खूप आवडत असते.

जीवन हे फुल आहे आणि प्रेम हा त्या फुलातील मध आहे.

जीवन म्हणजे पराकोटीचा आनंद होय.

जीवन हे कांद्याप्रमाणे आहे, तुम्ही जीवनाचा एकेक पापुद्रा सोलून काढू लागलात की एखादेवेळी तुम्हाला रडू येते.

जीवन हे सारे हास्यानेच भरलेले नसते.

फार दूरचे ध्येय गाठण्यासाठी आयुष्य अपुरे असते, भविष्यातील कीर्ती मिळविण्यासाठीही ते अपुरेच.

जे हजार नाहीत त्यांच्याबद्दल कोणीही वाईट बोलू नये.

जीवन लंबकासारखे दुःख आणि कानातला यांमध्ये मागेपुढे झोका घेते.

जीवनातील वाईटपणा दुरुस्त करता येतो. आपल्याकरिता नव्हे, तर दुसर्याकरिता त्या वाइतपणातील समतोलपणा आणण्याकरिता आपण मदत करू शकतो.

सर्वांनी एकत्र श्रम केल्यास कठीण काम हलके होते.

छोटे-छोटे क्षण मिळून तास होत, छोटे विचार जोडूनच पुस्तक तयार होते.

जगा आणि जगू द्या हा सामान्य न्यायाचा नियम आहे.

एकाकीपणा हा प्रत्येक व्यक्तीचा महत्त्वाचा आणि अटळ असा अनुभव आहे.

कस्तुरीचा सुगंधाची अपेक्षा गव्हाणीत करू नका.

सर्व जिवंत प्राण्यांना तुम्ही आपले जिवलग मित्र माना, कारण सर्वांमध्ये एकच आत्मा असतो.

व्यक्ती गेल्यापेक्षाही माणसे द्रव्य गेले की जास्त जोराने शोक करतात.

जेव्हा प्रेमी केवळ एकमेकांवर प्रेम न करता  एकत्रितपणे अनेक गोष्टींवर प्रेम करतात त्या वेळी ते प्रेम टिकून राहते.

ईश्वरावर प्रेम करा म्हणजे तो तुमच्या संगतीत राहू लागेल.

प्रेम म्हणजे दृष्टीभ्रम करणारे काचेचे भिंग असते.

प्रेम हे गोवरासारखे असते, तो उशिरा आला की फार वाईट असतो.

प्रेम म्हणजे दुसरे तिसरे काही नसून हावरटपणाने इच्छिलेल्या गोष्टींच्या उपभोगाची न शमलेली तहान होय.

प्रेम ही अनेक भावनांपैकी एक तीव्र भावना आहे आणि संपूर्ण जीवनावर त्याचा विशेष परिणाम होत नाही.

मरणाप्रमाणेच प्रेम हे खंबीर असते.

मनुष्याच्या अंतःकरणाचा प्रत्येक कप्पा खुले करण्याची प्रेम ही एक गुरुकिल्ली आहे.

विवाहाची पहाट म्हणजे प्रेम आणि विवाह म्हणजे प्रेमाचा सूर्यास्त.

देश्प्रेमी म्हणजे अपत्यप्रेमाचे विकसित रूप होय.

त्याग करताना विद्वान माणसांची सुद्धा कीर्तीविषयीचे प्रेम ही शेवटची त्याग करण्याची गोष्ट आहे.

प्रेमात पडलेल्या व्यक्तीला दोष कधी दिसत नाहीत.

खोटे बोलणे ही भित्रेपणाची निश्चित खूण आहे

सुद्धा साधेपणा सरोवराच्या निळाईप्रमाणे तुमच्या सत्याची खोली दर्शविते.

तुमच्या हातात जे आहे त्याचा उत्तम उपयोग करून घ्या आणि नंतर बाकीच्या गोष्टी जशा घडतील तशा स्वीकारा.

सर्वच पश्चाताप होऊ द्या. मनापासून पश्चाताप करणे म्हणजे जीवन नव्याने जागणे होय.

करमणूक ही तुमच्या कामाची सेविका झाली पाहिजे, तसे झाले नाही तर करमणुकीचे तुम्ही गुलाम बनून राहाल.

तुमच्या पायांना तुमचे मित्र बनवून खूप फिरा.

माणूस म्हणजे सर्व गोष्टींमध्ये अर्थ शोधणारा प्राणी.

माणूस खरोखरीच एकटा राहू शकत नाही, तसेच एकाकीपणे स्वातंत्र्यात राहून त्याचा विकास होऊ शकत नाही.

मनुष्य हा अनुकरणप्रिय प्राणी आहे.

माणूस स्वातंत्र्य म्हणून जन्माला आला, परंतु सर्वत्र तो बंधनातच गुरफटलेला दिसून येतो.

माणूस हा लव्हाळ्याप्रमाणे निसर्गातील सर्वात दुबळी गोष्ट आहे, पण तो विचार करणारे लव्हाळे आहे.

मानव म्हणजे निसर्गाची एकमेव चूक आहे.

माणसाच्या चेहऱ्यावरून तो माणूस कळतो.

हसण्याच्या सामर्थ्याची देणगी लाभलेला माणूस हा एकमेव प्राणी आहे.

माणूस परिस्थितीचा गुलाम असतो.

खरे सांगायचे तर, माणसाचा आधार आशा असते. माणसाजवळ दुसरी कुठलीही मालमत्ता नसते, फक्त आशा हीच मालमत्ता असते. माणसाचे जग खऱ्या अर्थाने आशेचे स्थान आहे.

माणसाला निसर्गावर मात करता येते, ती निसर्ग समजून घेतल्यामुळे, जबरदस्ती करून नव्हे.

माणसाने विवेकाला परंपरेच्या बंधनात जखडु नये, याउलट परंपरेला त्याने विवेकाच्या बंधनात जखडले पाहिजे.

नुसते धैर्य म्हणजे पुरुषार्थ नव्हे, पुरुषार्थ हा आत्म्याचा गुण आहे.

मानव हा समाजासाठी आहे.

स्वतःसाठी एक खेळणे असावे म्हणून देवाने माणसाची निर्मिती केली.

आनंद हे ईश्वरीय औषध आहे. प्रत्येकाने याचा उपभोग घ्यावा.

शहाणपणात रत्नासारखी चमकणारी अनेक माणसे उपेक्षित राहत असतात, कारण आपली क्षमता उघड करून दाखविण्याचा गुण त्यांच्यात नसतो.

अनेकवेळा खूप सत्य गोष्टी चेष्टेतही सांगितल्या जातात.

अनेक लोक आपला मार्ग निवडण्यात ठाम असतात, पण त्या मार्गाने ध्येय गाठणारे फारच थोडे लोक राहतात.

विवाह ही एक सोडत आहे. या सोडतीत पुरुष आपले स्वातंत्र्य पणाला लावतात, तर स्त्रिया आपले सुख पणाला लावतात.

विवाह म्हणजे हात आणि डोळे यांनी जरायचा करार नाही. विवाह म्हणजे बुद्धी आणि अंतःकरण यांनी करावयाचा करार आहे.

वैवाहिक जीवन म्हणजे कायमची गुलामगिरी असते.

जर सामान्य माणसाच्या दृष्टीने औषध हे एक रहस्य आहे, तर सामान्य वैद्याला सर्व काही रहस्याप्रमाणेच आहे.

वैद्यकीय व्यवसाय हा असा व्यवसाय आहे, त्यात अविरत श्रम करावे लागतात व व्याधींचा नाश करावा लागतो, म्हणजेच वैद्यकीय व्यवसायाचे कारणच नाश्ता करण्यासाठी श्रम करावे लागतात.

वैयक्तिक माणसे क्रूर असतात, पण मानवजात दयाळू आहे.

माणसे जोपर्यंत समर्थ कल्पनेचे प्रतिनिधित्व करतात तोपर्यंत ते सामर्थ्यवान असतात.

यातना भोगण्यासाठी आणि मरण पत्करण्यासाठी माणसे उंच टेकड्या चढण्याचा उद्योग करतात.

अलीकडे माणसे ही हत्यारांच्या हातातली हत्यारे बनली आहेत.

दुसऱ्याला शिकवित असताना माणूस स्वतः शिकत असतो.

सत्य सांगण्याचे धैर्य ज्यांच्याजवळ नसते ते लोक खोटे बोलतात.

ज्याच्या डोक्यात एकच वेड भरलेले आहे त्याची समजूत काढता येणे शक्य नाही.

मानवाचा एकंदरीत विचार करता वय वाढलेली ती बालकेच म्हटली पाहिजेत.

सर्व माणसांचा स्वभाव बहुतेक सारखाच असतो. त्यांच्या सवयीमुळे ते एकमेकांपासून फार लांब जातात.

दया हा खरोखरीच दैवी गुण आहे.

सर्व गोष्टीचा निर्माता मन आहे; म्हणून मनास चांगल्या गोष्टी करण्यास प्रवृत्त करावे.

कुचेष्टेत आनंद मानाने हे क्षुद्रांचे काम असते.

मितपणा फार घातक गोष्ट आहे.

अतिरेकासारखी यशोदायक बाब दुसरी नाही.

राजेलोक क्वचितच उगाचच उसासा टाकीत नाहीत.

पैश्याच्या जोरावर मानसन्मान, मित्र, विजय आणि राज्ये संपादन करता येतात.

द्रव्य आपल्या हातासारखे किंवा पाण्यासारखे असते. ते वापरावेत लागते वापरले नाही तर तुम्ही ते गमावता

पैश्याने मानवाला महत्त्व प्राप्त होते.

पैसे खर्च केला की घोडे सुद्धा धाव घेतात.

प्रथम पैसा मिळवावा त्यानंतर सदधगुण .

नीतिमत्तेच्या गोष्टी दुबळेच करतात.

नीतिमत्ता हा माणसासाठी आहे, माणूस नीतिमत्तेची नाही.

मर्त्यजीवन हे दवाच्या थेंबासारखे रिकामे आणि क्षणभंगुनर आहे.

अनेकदा मैत्री केवळ नाटक असते, बहुतेक प्रेम मूर्खपणाचाच प्रकार असतो.

बहुतेक माणसे अंड्याप्रमाणे असतात. ही माणसे स्वतःच्याच गोष्टींनी इतकी परिपूर्ण भरलेली असतात, की त्यात दुसरे काही मावू शकत नाही.

बहुतेकजण उसनवार मतांवर भागवतात.

कमी शब्द व भरपूर शहाणपण ह्या दोन्ही गोष्टी नेहमी एकत्र असतात.

खुनाबद्दल काही काळ शिक्षा होणार नाही, पण आज ना उद्या त्याला शासन होणारच.

संगीत म्हणजे परमेश्वराने दिलेली वैभवशाली व सुंदर श्रेणी.

कुठल्याही घटनांचा किंवा वस्तूंचा संबंध नसताना आपल्या अंतर्मनातील भावनांना संगीताच्या माध्यमातून आकार येत असतो.

संगीत म्हणजे नैतिक कायदाच आहे.

नजर ही प्रकाशाची भूमिती असते; तसेच संगीत आवाजांचे गणित असते.

संयमित निद्रेप्रमाणे वापरलेले संगीत हे शरीराच्या करमणुकीचे सर्वात चांगले साधन आहे.

माझे पुस्तक आणि अंत:करण यांचा वियोग कधीच होणार नाही.

माणसातील नैसर्गिक गुण हे रानातील झाडांसारखे असतात. कात्री लावून त्यांना नेट आकार देणे आवश्यक असते.

निसर्गाला पोकळी आवडत नाही.

निसर्ग हा न संपणारा आहे आणि सतत श्रमाने त्याला चिरतरुण ठेवता येईल.

निसर्ग हा एक पातळ पडदा आहे; त्यामधून ईश्वराचे सर्व ठिकाणी दर्शन होते.

निसर्ग अगतिकांना बालवानांच्या आधीन ठेवतो.

गरज कायद्याचे बंधन पळत नाही ती गरजच राहते.

गरजेपोटी व्यक्ती वाटेल त्या गोष्टी करायला तयार होते.

तुम्ही तुमच्या अति जिवलग मित्राला जसे बोलणार नाहीत तसे तुम्ही एखाद्या वाळीत ताकलेल्याला सुद्धा बोलू नका.

स्वभाव आणि शहाणपण यांच्यात कधीच दुमत नसते.

स्पष्टीकरण करू नका. तुमच्या मित्रांना त्याची आवश्यकता नसते आणि तुमचे शत्रू त्यावर कधीच विश्वास ठेवणार नाहीत.

मनुष्य रागावलेला असताना तुम्हाला काय बोलला ते विसरू नका.

या जगात द्वेषाने द्वेषाचे पारिपत्य कधी होत नाही, ते फक्त द्वेष न केल्याने होते; आणि हा निसर्गाचा कायदा आहे.

लोकांच्या हसण्याचे करण होऊ नका. जर तुम्ही आयुष्यात यशस्वी झालात तर ते गाढवासारखे निर्विकार राहूनच होईल.

कोणत्याही वाईट सवयीच्या मार्गाला जाऊ नका.

तुमच्या अनुपस्थितीत लक्ष्यात राहील अश्या प्रेमाच्या शब्दांशिवाय निरोप घेऊ नका, करण आयुष्यात पुन्हा भेटण्याची शक्यता कमी असते.

पश्चातापाशिवाय चैन कधीच नसते.

कोणतीही गोष्ट गृहीत धरू नका.

झोपलेल्या मांजरीला कधी जागे करू नये.

वृत्तपत्रे म्हणजे जगाचे आरसेच होय.

परमेश्वरावरील श्रद्धेनंतर परिश्रमावर श्रद्धा असावी.

देवानंतर आपण स्त्रियांचे ऋणी असले पाहिजे. प्रथमतः तिने जन्म दिल्याबद्दल आणि नंतर हे जीवन जगण्यायोग्य बनविल्याबद्दल.

जी कृती उत्स्फूर्त नसते तिला नैतिक म्हणता येणार नाही.

स्वतःशिवाय शहाणपणाचा सल्ला तुम्हाला दुसरा कोणीही देऊ शकणार नाही.

शंभर वर्षे गेल्याशिवाय कोणती बातमी महत्त्वाची आहे ते काळात नाही.

पूर्वपीठिका प्रत्येक गुन्ह्याच्या मागे असते.

कमतरता, दारिद्र्य व असमानता असताना लोकशाही फार काळ अस्तित्वात राहू शकत नाही.

गुलामगिरीचा कोणताही प्रकार वैध नसतो.

चर्चासत्रातून उदात्त कल्पना निर्माण होण्यापेक्षा मूर्ख कल्पनांचा शेवट होतो.

विज्ञान, राजकारण व धार्मिक बाबींमध्ये दुमत असल्याशिवाय प्रगती होत नाही.

मोठी व्यक्ती संधी मिळाली नाही अशी तक्रार कधीच करत नाही.

कोणत्याही स्त्रीला आपला पती थोर पुरुष वाटत नाही.

जो माणूस स्वतःला सुखी समजत नाही तो कधीच सुखी नसतो.

जी व्यक्ती स्वतःची मालक नाही ती स्वातंत्र्य असू शकत नाही.

एखाद्या व्यक्तीची परीक्षा तिला काय माहित नाही यावरून न करता ती किती समंजसपणे व किती तत्परतेने नवी कर्तव्ये पार पडते यावरून करावी.

ज्याचा आत्म स्वर्गाशी आधी एकरूप झाला नाही त्याने तिथे आधी जात कामा नये.

आपले स्वातंत्र्य कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही.

शेतकर्या इतका स्वतःच्या कामाचा कंटाळा कोणीही करीत नाही.

कोणीही स्वतःला दुय्यम मनात नाही.

कोणालाही सल्ला नको असतो, फक्त पाठिंबा हवा असतो.

ज्या सुखात विविधता नसते ते फार काळ टिकत नाही.

कोणताच नियम अपवादाशिवाय सर्वसामान्य नसतो.

आत्म्याने पेरलेले बी कधीच नाहीसे होत नाही.

शुभ प्रभात सुविचार


गावात वाढताना ज्याप्रमाणे दिसत नाही त्याप्रमाणे इतिहास घडताना दिसत नाही.

एकट्यादुकट्याकडून इतिहास घडत नाही.

एकांतामय चिंतन आणि निशब्द प्रार्थनेशिवाय आत्मा आपल्या अस्तित्वाचा मोहर आणि कोमलता राखू शकत नाही.

शत्रू मेल्यावर कोणी आश्रू गाळत नाही.

शहाणी व्यक्ती चिरकाल तरुण राहण्याची इच्छा करत नाही.

देशद्रोही माणसावर विश्वास ठेवावा असा विचार शहाणा माणूस करत नाही.

वाईट पुस्तकाइतका अट्टल चोर कोणताच नाही.

दुसऱ्याचे ओझे किती वजनदार आहे हे कोणी जणू शकत नाही.

विचार न करता केलेल्या कृतींमुळेच पुष्कळशी दुःखे भोगावी लागतात.

जे निर्दयी असतात ते कुरुपच असतात.

ज्याला आपल्या जवळील संपत्तीची कल्पना आहे तो गरीब नाही, तर जो आपल्या जवळील पैसा खर्च करत नाही तो खरा गरीब.

माणसात जी कला नसते ती कलावंताला येते.

विद्यार्थीदशेत माझे शिक्षक माझे मित्र नव्हते याचा मला खेद वाटतो.

दया दाखविल्यामुळे पाप वाढत जाते.

आस्था-उत्साहाशिवाय कोणतीही मोठी गोष्ट प्राप्त होत नाही.

तुमच्या मनाच्या सच्चेपणा इतकी पवित्रता नाही.

श्रीमंतीने आलेल्या उद्धटपणाचाच गरीब लोक द्वेष करतात.

मूर्खहास्याइतका मूर्खपणा दुसरा नाही.

अल्पसमृती इतकी प्रशंसनीय गोष्ट राजकारणात नाही.

वेळेइतकी किंमत आणि मौल्यवान गोष्ट कोणतीही नाही.

आपल्या मालकीचा फक्त वेळच आहे. ज्याच्या जवळ काहीच नाही त्याच्याजवळ सुद्धा फक्त वेळच आहे.

कोणत्याही गोष्टीपेक्षा माणूस ज्याकडे पाहून हसतो त्यावरून त्याचे चारित्र्य लक्षात येते.

अबोल राहण्यानेच दुःखाला वाचा फुटते.

परत न येणाऱ्या आनंदाच्या आठवणी दुःखदायक असतात.

जोडे तयार करणारा नेहमी अनवाणी राहतो.

म्हातारी माणसे धोकादायक असतात, करण त्यांना जगात काय चालले आहे या गोष्टीची मुळीच चिंता नसते.

असत्याचा आधाराने कोणीही सत्याचा मार्ग गाठू शकत नाही.

चर्चा करून कोणीही काळजी दूर करू शकत नाही.

शांततेत केलेले एक परीक्षण गाइगर्दीने दिलेल्या हजार उपदेशांबरोबर असते. आवश्यकता असते ती उजेडाची.

एका वाईट कृत्यातूनच दुसरे वाईट कृत्य घडते.

आपले विचार लपविण्यासाठी शब्दांचा खूप मोठा उपयोग होत असतो.

लोकशाहीत प्रेत्येकाला चुका करण्याचा अधिकार असतो.

एका वाईट ताणाने सुद्धा सर्व रस्ता बिघडू शकतो.

मद्याच्या अमलाखाली असलेल्या व्यसनी माणसासारखा रागाने क्रोधीत झालेला मनुष्यही बेजबाबदार असतो.

जहाजाला असलेल्या एखाद्या लहानश्या भोकामुळे जहाज बुडू शकते, तर पापी माणसाच्या एका पापामुळे त्याचा नाश होईल.

एक खून केला की एक खलनायक निर्माण होतो, तर लाखो प्राण घेतल्यावर वीरपुरुष.

जीवनाचा अर्थ लक्ष्यात ठेवण्यासारख्या अनेक धड्यांपैकी हा एक महत्वाचा धडा आहे, की जे आवडते ते न करणे व जे करतो ते आवडणे.

सर्व वाचन आधाशीपणाने करू नका, तर ज्या वाचनाचा आपल्याला उपयोग होईल तेच वाचन करा.

एका कृतघ्न माणसाच्या चुकीमुळे ज्यांना खरोखरीच मदतीची गरज असते ते ताटकळत उभे राहतात.

जेथे जो सुखी असतो तोच त्याचा देश.

कर्तृत्वामुळेचमाणसाचे जीवन सामर्थ्यशाली होते.

आत्मिक सक्तीने जे कार्य केले जाते त्यालाच अध्यात्मिक अर्थ प्राप्त होतो.

आपले हृद्य सर्वांसमोर मोकळे करू नका.

तुमचे हृद्य द्येसाठी उघडे ठेवा, परंतु उद्वेगासाठी बंद ठेवा.

आशावादी आणि निराशावादी सत्याला घाबरतात, हा दोघांमधील एक सामान्य दोष आहे.

दुसरे लोक खाण्यासाठी जगतात त्याच वेळेस मी जगण्यासाठी खातो.

आपले देह धूलिकण आहेत, परंतु ते निर्माण करणारा स्तुतीस पात्र आहे.

तुलनेमुळे असमाधान निर्माण होते.

आपल्या इच्छेनुसार नाही, तर आपल्या ताकदीनुसार दुसऱ्याच्या उपयोगी पडणे हे आपले कर्तव्य आहे.

आपली चांगली आणि वाईट कृत्येच सावलीसारखी आपल्या मागे असतात.

अज्ञानाच्या सागरातील लहान बेटासारखे आपले ज्ञान असते.

सुख आणि दुःख उजेड आणि आंधाराप्रमाणे एकापाठोपाठ येत असतात.

दुःख हे मानवाचा मोठा गुरु आहे. दुःखाच्या उसशाखाली सुटण्याचा विकास होत नसतो.

भूतकाळात जमा झालेले दुःख, दुःख राहत नाही.

संयम नावाच्या कटू वृक्षाची फळे गोड असतात.

शांतपणे वाट पाहणे ही गोष्ट म्हणजेच ईश्वरी इच्छेच्या आंबालबजावणीचा श्रेष्ठ मार्ग आहे.

शांतता ही माणसाची आनंदी व नैसर्गिक स्थिती आहे, युद्ध हे दुर्वर्तन, विटंबना आहे.

जेथे मनावर बुद्धीचे अधिपत्य असते त्या काळात शांततेचे अधिपत्य असते.

लोक म्हणतात प्रत्यक्ष जीवन महत्त्वाचे आहे, पण मी वाचन अधिक महत्वाचे मानतो.

सर्वसाधारणपणे एकाकी राहण्याला वेळ लावणाऱ्या लोकांजवळ सखोलता, कल्पकता आणि भिडस्तपणा असतो.

तुम्ही लोकांचे भले केले असले तर त्याबद्दल ते तुम्हाला क्षमा करतील, पण त्यांनी जर तुम्हाला दुखावले असेल तर ती गोष्ट ते सहजरित्या विसरणार नाहीत.

आळशी म्हणावा असा मानव हा एकच एक प्राणी कदाचित असावा.

हेकटपणा ही मानवी मनाची मूलभूत प्रेरणा आहे.

क्षुल्लक कायदे मोठे गुन्हा घडवितात.

पोरकट वृत्तीच्या लोकांना धर्मनिष्टतेचा आनंद वाटतो.

युक्तिवादापेक्षा नम्रपणा अधिक चांगला. तुम्ही पटवू शकला नाही तर मन वळवू शकता.

राजकारणी लोक जहाजासारखे असतात. संकटात सापडल्यानंतर ते खूप आरडाओरडा करतात.

गरीब माणसांना भूक मिटवण्यासाठी अन्न हवे असते, तर श्रीमंत लोकांना जेवणासाठी भूक असावी लागते.

सत्ता अत्यंत चांगल्या अंतःकरणाच्या लोकांनाही मद्याप्रमाणे धुंदी चढविते.

सागराची स्तुती करा, पण जमिनीवरच राहा.

गर्वाला कधीच दुःख होत नाही.

उधळेपणा दुर्बल स्वभावाचा गुण आहे.

जनमत हे मूर्खपणा, दुर्बलता, पूर्वग्र, चुकीच्या जाणिवा, योग्य जाणिवा आणि वर्तमानपत्रातील परिच्छेद यांचे मिश्रण.

 शिक्षा हि लंगडी असली तरी ती तुम्हाला गाठतेच.

भांडखोर माणसे काहीच न साधता घारी येतात.

लेखकाची सुवचने वापरून त्यांच्याविषयीचा आदर तुम्ही व्यक्त करू शकता.

आटोक्यात राहणार नाही एवढे स्तोम माजवू नका.

क्वचितच माणूस आपल्या नशिबापासून पळू शकतो.

शरीराला जसा व्यायाम आवश्यक आहे, तसे मनाला वाचन आवश्यक आहे.

वाचनामुळे आनंद मिळतो.

वाचन हे अलंकारासारखे असते.

वाचनाने कार्यक्षमता वाढते.

धूर्त मनुष्य वाचनाला तुच्छ समजतो.

साधा मनुष्य वाचनाची प्रशंसा करतो आणि शहाणा मनुष्य वाचनाचा उपयोग करून घेतो.

तुमच्यातील जे सर्वोत्तम आहे ते प्रकाशात आणण्याचे काम करणारे खरे शिक्षण होय.

मानवतेच्या पुस्तकाहून दुसरे कोणते चांगले पुस्तक नाही.

निष्काळजी तारुण्यानंतर पश्चाताप घडविते.

करमणूक हि सर्वात चांगली मौजमजा नाही, तर तिच्या वेळी आणि जागी ती प्रार्थनेइतकीच योग्य आहे.

सुधारणा लादून होत नाही ती आतून व्हावी.

सद्गुणाकरिता कायदे करावे लागत नाही.

धर्म दारिद्र्याच्या बाजूस असतो.

धर्माला भीती हीच, की तो कोणाला पूर्णत्वाने काळात नाही.

व्यापक अर्थाने धर्म म्हणजे आत्मसाक्षात्कार आणि स्वतःची ओळख होय.

धर्म हृदयात असतो; पायापाशी नसतो.

मानवाच्या सखोल अनुभवाचे बोल म्हणजे धर्म.

निरनिराळे धर्म म्हणजे एकाच ठिकाणी जाणारे मार्ग होय.

भावनांचा स्पर्श असलेली नीतिमत्ता म्हणजे धर्म होय.

फक्त पापच नेहमी अंधार आणि गुप्तता शोधतात.

जगातील बहुतांशी सर्वात सुंदर गोष्टी सर्वात जास्त निरुपयोगी असतात.

इच्छांचा त्याग न करता नुसता वस्तुंचा त्याग केलात तर तो त्याग कितीही मोठ्या प्रमाणावर असला तरी क्षणभंगुर ठरतो.

तीक्ष्ण तालवारींपेक्षाही निर्भत्सरनेने जास्त खोल जखम होते आणि अंतःकरण कापून निघते.

लोकशाही राज्ये उधळपट्टीमुळे नेस्तनाबूत होतात, तर राजसत्ताक राज्ये दारिद्र्यामुळे.

ज्या वेळेस भविष्यात पुन्हा संधी मिळेल असे वाटते तेव्हा मोहावर ताबा मिळविणे सोपे असते.

धडपडीनंतर विश्रांती सुखकर असते.

सूडातून काही निष्पन्न होत नाही.

सुडाची भावना ही स्वतःच्याच नाशाला कारणीभूत होते.

क्रांत्या घडवून आणल्या जात नाहीत तर त्या घडतात.

श्रीमंत माणसे कधी शीळ घालत नाहीत, गरीब माणसे घालतात.

श्रीमंती कष्टाने मिळते, काळजीने टिकते आणि दुःखाने जाते.

श्रीमंती निषिद्ध नाही, परंतु त्याचा गर्व आहे.

जितका आनंद संपत्तीच्या मालकीने होत नाही तितके दुःख त्याच्या वियोगाने होते.

राजपद हे माणसाच्या टोपीतले पीस आहे; त्याच्या खुळखुळण्याची मौज मुलांना घेऊ द्या.

जे शिकवतात त्यांच्यासाठी विज्ञान असते, ज्यांना जाणीव असते त्याच्यासाठी काव्य असते.

विज्ञान म्हणजे एकत्रित केलेले ज्ञान होय.

सुखाची खूप हाव धरू नका, दुःखाला घाबरू नका.

आपल्या व्यवसायात खूप मेहनत घेणारा आपण पाहिलात का? राजासमोरही तो ताठपणे उभा राहू शकेल.

स्वाभिमान हा सर्व सद्गुणांचा पायाच म्हणता येईल.

मौन हा संभाषणाचा एक पैलू आहे.

संभाषणातील सुरक्षित जागा म्हणजे मौन असते.

मौन ही सत्याची जणांनी आहे.

खरे शहाणपणाचे उत्तर म्हणजे मौन होय.

आळ आणि बदनामी याना मौनाने उत्तर देणे फार फायदेशीर ठरते.

तुमच्या प्रतिस्पर्ध्याला बुद्धीने नामोहरम करा. आरडाओरड करून नव्हे.

साधेपणाने कर्तव्य करताना भीतीचे कारण नाही.

काळासारखे पाप तेजस्वी असते, पण पापाचा अंत रात्रीप्रमाणे काळ असतो.

प्रत्येक गोष्टीची सर्व माहिती आपल्याला असणे शक्य नाही तेव्हा सर्व गोष्टींची थोडी थोडी माहिती आपल्याला असणे जरुरीचे आहे.

सत्याला शोधण्याचा मार्ग अग्नीतून जातो तेव्हा पाऊस, वर किंवा हिम यांचा काय विचार करायचा?

जो प्रामाणिकपणा गंभीर व अंतःकरणाला जाणवणारा असतो, तो प्रामाणिकपणा म्हणजे खऱ्या उदात्त मानवतेची खूण आहे.

गुणवान दारिद्र्यामुळे सावकाश पुढे येतो.

लाजिरवाणा समाज निर्दयी असतो, जेव्हा तो दुसऱ्याचा नाश करून स्वतःची झोळी भरतो.

समाज हवेसारखा असतो. श्वासासाठी गरजेचा परंतु जगण्यासाठी अपुरा.

सौम्य शब्द हे अतिशय जोरदार प्रतिपादन करतात.

सैनिक हे मृत्यूच्या कठोर राज्यातले नागरिकच म्हणावे लागतील.

एकांतवासास भेट देण्यासाठी चांगली, परंतु राहण्यासाठी हलकी जागा.

काही लोक काहीच न करता अलौकिक असतात आणि ते काम ते फार निष्ठापूर्वक पार पडतात.

काही विचार करण्याकरिता वाचतात- असे कमी असतात; काही लिहिण्याकरिता पुष्कळ असतात; काही  बोलण्याकरिता – असे बहुमताने असतात.

दुःखे आठवलीत की वर्तमानकाळ जास्त सुखावह वाटतो.

बोलणे चंदेरी असेल तर मन सोनेरी असते.

जीवनातील यश हे खूप कष्टाने मिळते.

योग्य दिशेने उचललेले चुकीचे पाऊल सुद्धा नेहमी यश मिळवून देते.

तुमचे सवयीने घडलेले विचार जसे असतील तशी तुमच्या मनाची जडण-घडण होत असते.

माणूस पाहून तुमचे वर्तन ठेवा.

सहानुभूतीमुळे चांगले वातावरण निर्माण होते व त्यात आपण मोकळे व आनंदी राहतो.

शिष्टाचाराविषयी अनुभूती मने जुळवितात.

प्रेम काढून टाकल्यास आपले जग थडग्यावत होईल.

सलोखा झालेल्या शत्रूपासून सावध राहा.

दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव व्हावी, दिसणारे दोष दृष्टीआड व्हावेत, दुसऱ्यांवर दया दाखवावी अशी शिकवण मला देण्याची दया माझ्यावर कर.

कधीकधी आपणच आपले नुकसान करतो.

संयमीपणा पवित्रतेचे काळजी घेतो.

सर्वांना न कळणारी भाषा चांगली नसते.

लोकांना सुखी करण्याची इच्छा बाळगणारे व कसे सुखी करता येईल हे जाणणारे सरकार सर्वात चांगले सरकार असते.

दृष्टीआड सृष्टी हे आपल्या मागे गेलेल्यांच्या बाबतीत सत्य असते.

नरकात गेलेल्या आत्म्याला तेथेही मुक्ती नसते, हा सर्वात मोठा छळवाद आहे.

सोपेपणा करण्याची क्षमता म्हणजे अनावश्यक गोष्टी वगळून आवश्यक बोलणे होय.

गैरहजर असणारे नेहमीच चूक ठरतात.

जो बदलत नाही तो असमंजस असतो.

औषध योजणे म्हणजे वेळेचा प्रश्न आहे, वेळीच दिलेले मद्य उपयुक्त ठरते, अवेळीचे मारक ठरते.

ज्या मधमाशीच्या मुखात मध असतो, तिच्याच शेपटीत डंख मारायची नांगी पण असते.

जगात सर्वात  भक्कम पाय द्रवाचा असतो.

एक क्षणाचा आनंद मिळाला तरी तो आनंदच.

जर धनुष्य सैल केले नाही तर त्याची ताकद जाते.

जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत श्रद्धा ठेवण्याची माणसाला गरज भासते अश्या वस्तुस्थितीमुळे एखाद्या विशिष्ट श्रद्धेचे समर्थन करता येत नाही.

संपूर्ण निरोगी शरीर व त्यावर बुद्धिमत्तेचा मुकुट असणे ही मानवजातीची सर्वात मोठी आशा असते आणि तीच या पृथ्वीवरील सर्वात मोठी समस्याही असते.

ज्या उदारतेमुळे सांत्वन होते, व्रण भरून येतात आणि आशीर्वाद मिळतात; तो उदारपणा त्या उदार व्यक्तीच्या चरणाशी वाहिलेल्या फुलांप्रमाणे असतो.

सहानभूती ही जीवनातील सुंदर गोष्ट आहे.

सकाळ ज्याप्रमाणे दिवस सूचित करते, त्याप्रमाणे बालपण प्रौढत्व सूचित करते.

शस्त्रांच्या खणखणाटात कायद्याचा आवाज बुडून जातो.

कोणालाही तुच्छ लेखू नका.

वडीलधाऱ्यांच्या आदर करा.

बदलाची इच्छा असणे, ही गोष्ट सुरक्षितपणाचे द्योतक आहे.

फसविण्यास अत्यंत सोपी व्यक्ती म्हणजे आपण स्वतःच होय.

या जगात सर्वात सोपी आणि निरुपयोगी गोष्ट म्हणजे चिंता करणे.

श्रमाचा शेवट आनंद मिळवण्यात असतो.

मत्सरी माणसाला दुःखाची कधीच वाण नसते.

दृष्टी टाकून नेत्राचे काम संपत नाही.

तुम्ही ज्या कुटुंबातून आलात यापेक्षा जे कुटुंब तुम्ही घडविणार आहात ते जास्त महत्वाचे आहे.

दुर्बल मतांसमोर कापतात, मूर्ख आव्हान देतात, शहाणे परीक्षण करतात, कुशल त्यांना मार्गदर्शन करतात.

पहिली आणि सर्वात वाईट लबाडी म्हणजे स्वतःला फसविणे होय.

लोकांना बंधुभाव शिकविणे, हे पहिले कार्य तत्वज्ञान करीत असते.

भेट ही देणाऱ्याला कधी ना कधी बहुतेक करून परत मिळत असते.

सज्जन व्यक्ती इतरांना सज्जन करते.

चांगल्याना कायद्याची भीती नसते. तो त्यांचे संरक्षण असते आणि दृष्ट लोकांची दहशत असतो.

माणूस जितका मूर्ख तितका तो खोत बोलणारा असतो.

जो खरा बुद्धिमान असतो तो खरी बुद्धिमत्ता कोणत्या माणसात आहे, हे शोधून काढतो.

अति वैभव, अति चिंता.

अति द्वेष चावणाऱ्या कुत्र्याप्रमाणे शांत असतो.

जी व्यक्ती खूप दृढनिश्चयाने योग्यच गोष्टीची निवड करते, ती महान असते.

दुसऱ्याच्या अस्तित्वाची जाणीव नसणे, हा सर्वात मोठा गुन्हा आहे.

जीवनाची मोठी कार्ये साध्या उपायांनी आणि थोड्याश्या गुणांनी पार पडली जातात.

जगात चूक करणार्याचा हक्क हा सर्वात मोठा हक्क आहे.

राजदरबारात माणसांची गर्दी असते, पण मित्रांचा अभाव असतो.

माझ्या जीवनातील काही क्षण म्हणजे, जे मी माझ्या कुटुंबातीच्या सहवासात घालविले ते होय.

ज्या व्यक्तीचे विचार चांगले असतात, तीच व्यक्ती सर्वात सुखी असते.

उंबरठ्याबाहेर टाकलेले पहिले पाऊल सर्वात अवघड असते.

हृदयातील भावनांचे गीत डोळ्यांत वाचता येते.

भुकेलेले न्यायाधीश तत्परतेने शिक्षा ठोकतात आणि पंचांचे पोट भरावे म्हणून कमनशीबींला फासावर जावे लागते.

हुतात्म्यांच्या रक्तापेक्षा विद्वानांची शाई जास्त पवित्र असते.

पृथ्वीवरील आनंदाच्या ध्वनींमुळे मुलींचे हास्य नेहमी आनंददायी होते आणि राहील.

जेव्हा पान प्रेम करते त्या वेळी त्याचे फुल होते. फुल जेव्हा उपासना करते तेव्हा त्याचे फळ होते.

भूक आणि राग यांच्यामागील रेषा धूसर असते.

ईश्वरास आपल्या कामासाठी जे उत्तम अनुयायी मिळतात ते दुःखाच्या डोंगराळ प्रदेशातूनच मिळतात.

संपत्ती गमविणे म्हणजे क्षुद्र गोष्ट गमविणे.

राजपुत्राइतकीच सत्तेची हवं शेतकऱ्याच्या हृदयात प्रामुख्याने असते.

बहुसंख्य माणसे पूर्णपणे खोट्या असलेल्या अशक्य गोष्टींवर विश्वास ठेवतात.

ज्या व्यक्तीमध्ये संगीत नाही आणि संगीताच्या गॉड सुरांनी ज्याचे मन आनंदी होत नाही तो देशद्रोह, गनिमी कावा, लुटालूट करणाऱ्यालाच योग्य आहे; कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवू नये.

ज्याने कल्पनेत आणि विचारात स्वर्गाचा प्रवास केला नाही तो कलावंत नाही.

माणूस जेव्हा त्याच्या बुद्धीने ऐकतो तेव्हा त्याचा मार्ग चुकतो. जो बुद्धीवर हुकूमत गाजवू शकत नाही तो बुद्धीचा गुलाम होतो.

घरातील कर्ता माणूस घरातल्या आनंदाला गालबोट लावू शकतो, परंतु तो आनंद निर्माण करू शकत नाही. हे काम स्त्री कडेच असले पाहिजे आणि तो तिचा सर्वात मोठा विशेष हक्क आहे.

जे परमेश्वराला घाबरून वागतात त्यांना त्याच्या कृपेचा लाभ आनंतकाळापर्यंत होत राहतो.

जमावाला खूप डोकी असतात परंतु बुद्धी नसते.

जमाव भित्र्यांना पायदळी तुडवितात.

जितकी गोष्ट कंकाटेकोर तितकी ती जितका परिपूर्ण आनंदाचा अनुभव देते तितकाच दुःखाचाही देते.

सत्य वक्तृत्वाचा उद्देश नसून मन वाळविणे हा असतो.

शास्त्रज्ञ किंवा इतर लोक जे कधीही चुका करीत नाहीत ते खरोखरच काहीच करीत नाही.

स्त्रीला समजून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तिच्यावर प्रेम करावे आणि नंतर तिला समजून घेण्याची गरज नसते.

विचारी माणसांची मते वाढत्या मुलांसारखी नेहमी प्रगल्भ व बदलणारी असतात.

वक्ता म्हणजे देशाचे मुख होय.

भूतकाळ आणि भविष्यकाळ दोन्ही स्वप्नवत आहेत, वर्तमान हे सत्य आहे.

भेट देण्यासाठी भूतकाळ हि चांगली जागा आहे, परंतु मला तिथे राहायला आवडणार नाही.

ईश्वराकडे जाण्याचा मार्ग साध्या वळणाचा व सर्वांना जमेल असा आहे.

एका शतकाचे तत्वज्ञान पुढच्याचे सामान्य ज्ञान आहे.

जसा हुद्दा माणसाला बनवत नाही तसा राजदंडाने राजा होत नाही, मोठेपणा हा अंगीच असावा लागतो.

युद्धाची शक्यता व युद्धाची शस्त्रे किती प्रमाणात प्रभावी आहेत त्या प्रमाणात वाढत असते.

पसरलेल्या सूर्यकिरणांप्रमाणे मनाची शक्ती असते. हे किरण जेव्हा एकत्रित येतात तेव्हा ते तेज:पुंज असतात.

वर्तमानकाळ भविष्यकाळात महान ठरतात.

आरोग्य चांगले ठेवणे हे कर्तव्य आहे. शारीरिक नैतिकतेची फार थोड्या लोकांना जाणीव असते.

जी श्रीमंती स्त्री पैशाचा लोभी असणाऱ्या माणसाशी लग्न करते, ती अविवाहितासारखीच असते.

प्रगल्भ मनाला मोठ्या ग्रंथालयाची आवश्यकता नसते.

लुटला गेलेला हसत राहिला तर तो चोरांकडून काहीतरी मिळवतोच.

थोड्या आनंदात गोडी असते.

श्रम करणाऱ्याला गोड झोप लागते.

या माणसाचा जीव त्याच्या कपड्यात आहे.

अनिश्चित आणि दुर्बल हेतू असलेले आत्मे चांगल्या हेतूंची दफनभूमी असते.

जो एकाकी उभा राहू शकतो तो माणूस जगात सामर्थ्यवान ठरतो.

चांगल्या कामाची परीक्षा म्हणजे तुम्ही ते शेवटपर्यंत करत राहता.

भरती कोणासाठी थांबत नाही.

अफवा पसरविणारे आणि अफवांवर विश्वास ठेवणाऱ्यांना पाठीला पाठ लावून फाशी द्यावयास हवे, एकाची जीभ व दुसऱ्याचे कान बांधून.

बलिष्ठ नेहमीच सामर्थ्यवान राहण्याइतका बलिष्ठ कधीच नसतो.

कार्यात जो वेळ खर्च होतो तो कधीच वाया जात नाही, हे शहाणपणाचे सार आहे.

आपण असे दिसावे अशी इच्छा अमलात आणण्याचा प्रयत्न करणे हा कीर्ती मिळविण्याचा मार्ग आहे.

वाईट नोकराच्या अंगचा सर्वात वाईट दुर्गुण म्हणजे त्याची जीभ होय.

मूर्खाचा खजिना नेहमी त्याच्या जिभेतच असतो.

आपल्या शत्रूला मारण्याचा खरा व उदात्त मार्ग म्हणजे त्याला न मारता दयाळूपणे त्याला असा बदलायचा की, तो शत्रू राहणार नाही आणि आशेनेच त्याचा शेवट होईल.

जीवनाचा खरा आनंद आपल्यापेक्षा कमी दर्जाच्या लोकांबरोबर राहणे होय.

खरा कवी हा सर्वज्ञ असतो.

खरा न्यायाधीश गुन्ह्याचा धिक्कार करतो, परंतु गुन्हेगाराचा धिक्कार करत नाही.

आपल्याला मनातील गुपिते सांगतात या गर्वामुळेच बरेचजण ती गुपिते बाहेर बोलून मोकळी होतात.

मृत सिंहाच्या शरीराचा ससे देखील अवमान करतात.

दुसऱ्याकडून आपल्यावर झालेल्या जुलुमाचा दुःखापेक्षा स्वतःने स्वतःवर केलेल्या जुलुमाचे दुःख जास्त असते.

चंचल मन हि हलकी मालमत्ता असते.

बेताल शिंगरू पुढे चांगले घोडे बनते.

शहाणा आणि कार्यक्षम अडचणींवर मत करण्याचे धैर्य दाखवितात.

बुद्धिमान व्यक्ती पुस्तकांबरोबरच आयुष्याचे वाचन करतात.

काहींना प्रगती करण्याकरिता व काहींना ऱ्हासाकडे नेणारी शिडी म्हणजे जग होय.

जग हे फक्त यशस्वी लोकांची लहर सहन करते, परंतु इतरांची नाही.

व्यवसायातील उच्च व्यवस्थापकांचा त्यांच्या कामातील वाईट आजार सर्व सामान्यसमजला जाणारा मद्यपान हा नसून त्यांचा अहंकार असतो.

लबाड मनुष्याला मित्र नसतात.

तरुणांना कधीही परिपूर्ण न होणाऱ्या आकांक्षा असतात. वृद्धांना ज्या गोष्टी घडल्याचं नाहीत त्यांच्या आठवणी असतात.

अशी थोडीच माने असतात, ज्यांना जुलूम आनंददायी वाटत नाही.

पुष्कळशी कामे ढिलाईने केली तर कंटाळवाणी होतात आणि रस घेऊन केलीत तर आनंददायी ठरतात.

जगात दोन्ही तर्हेचीच कुटुंबे आहेत एक हो म्हणणारे आणि दुसरे नाही म्हणणारे.

शिक्षणाची तीन जीवनसत्त्वे आहेत; अभ्यास कसा करावा, अभ्यासाविषयीच प्रेम आणि अभ्यास हाच पुरेसा नाही याची जाणीव असणे.

एखाद्याच्या आयुष्यात दोन प्रकारची माणसे असतात- ज्यांना तुम्ही थांबवून ठेवता आणि ज्यांच्याकरिता तुम्ही थांबता.

पुस्तकांतील वाईट गोष्टी घेण्याकरिताच काही लोक जन्मतात.

भित्र्याच्या मनाची भीती घालविणारी वनस्पती अजून उगवली नाही.

प्रत्येक मनुष्यास कमी समजायला लावणारी व्यक्ती मोठी असते; पण त्यापेक्षा मोठी व्यक्ती ती असते, जी प्रत्येकाला आपण मोठे आहोत असे समजायला भाग पाडते.

चोरांमध्ये सन्मान बाळगण्याची पद्धत असते.

स्वत्वाचा शाश्वत त्याग करणे, हा जगातील एकमेव सद्गुण आहे.

अशा अनेक गोष्टी आहेत ज्याला जग निराशाजनक म्हणतात, पण श्रद्धेच्या शब्दकोशात आनंद घेतात.

दुर्दैवात आनंद मानणारे काही लोक असतात आणि ते दुसऱ्याच्या दुःखातून आनंद घेतात.

गुण आणि दुर्गुण यांच्यात चटकन समेट होत नाही. चांगुलपणाची गुंतवणूक कधीही वाया जात नाही.

चेहऱ्यावरून मनाची रचना सापडवणारी कला नाही.

आशेचे दास्य असण्यासारखे चांगले व वरदानासारखे दुसरे दास्यत्व असू शकत नाही.

ईश्वराच्या पितृत्व भावनेशिवाय माणसाचा बंधुभाव अस्तित्वात असू शकत नाही.

तब्येत चांगली आहे असे समजणाऱ्या आजारी माणसास बरे करणे कठीण.

विशाल जगात गुंडाला लपविता येईल अशी गुहा नाहीच.

संकटासारखे शिक्षण नाही.

सुख हे नेहमी कतूमिश्रितच असते.

मोकळेपणा सारखा शहाणपणा नाही.

असणे आणि मिळविणे यात सुख नाही, खरे सुख देण्यात आहे; पण सुखाचा मागोवा घेण्यात अर्धे जग नेहमी चुका करीत असते.

आनंद पसरविण्याचा इच्छेपेक्षा क्रांतीचे तेज वाढविणारे दुसरे काही नाही.

शत्रू कधीही लहान नसतो.

कमी शहाण्यांनी जास्त शहाण्यावर राज्य केले नाही असे एकही राज्य नाही.

वक्त्याच्या आवाजाचा चढउतार, त्याची नजर, त्याचे हावभाव या सर्व गोष्टींना वक्तृत्वामध्ये शब्दांच्यानिवडीपेक्षा थोडेही कमी महत्त्व नसते.

मन तरुण ठेवायला दयेसारखे व एखाद्या धैयासाठी उत्साहाने स्वतःला झोकून देण्यासारखे दुसरे योग्य कारण नाही.

इतकी कटू कोणतीच गोष्ट नाही, की ज्यावर शांत मन विरंगुळा शोधू शकत नाही.

काव्यातील वेदनांत सुख असते हे फक्त कवीच जाणतात.

दारिद्र्यासारखी दुसरी कोणतीच गोष्ट सुरक्षित नाही.

कायिक प्रेमाइतकी अत्यंत आवडीची व सुखाची पण निर्बुद्धतेची दुसरी गोष्ट नाही.

दुःखातून येणारा आनंद सुखमय असतो.

हे साधे विचार पानांची सळसळ वाटतात आणि त्यांची आनंदमयी कुजबुज माझ्या मनात चालते.

ते काही कारणास्तव मत्सर करातात असे नाही, तर मस्तरासाठी मत्सर करतात.

परमेश्वराच्या लेकरांची सेवा जे करतात, ते त्याची खरी सेवा करतात.

रात्रीच्या पहिल्या प्रहरात जेव्हा तुम्ही जागे असता तेव्हा तुमच्या स्वतःच्या दोषांचा विचार करा आणि रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात जेव्हा तुम्ही निद्रिस्त असता तेव्हा दुसऱ्यांच्या दोषांचा विचार करा.

वीरपुरुष होण्यासाठी आवश्यक अट अशी आहे की, आपण मरण केव्हा पत्करावे हे समजले पाहिजे.

जे मित्र आपल्या मित्रांना त्यांच्या चुकांबाबत आणि त्यातील धोक्याबाबत मित्रत्वाने सावध करीत नाहीत किंवा त्यांच्या स्वातंत्र्याचा आणि विश्वासाचा मान ठेवत नाहीत असे मित्र हे दुर्बल व कुचकामी म्हटले पाहिजेत.

डोळ्यांतुल झरणारे प्रेमळ आश्रू नेहमीच आत्म्याला मानवी बनवतात.

जरी मी निसर्गतःप्रामाणिक नसलो तरी मी काहीवेळा चुकून तसा बनतो.

चटकन वाचन देणारे वाचन निभावण्यात दिरंगाई करतात.

जे संगीत आणि समारंभ यांच्या आधाराने लोकांची माने गुंतवून, उदारपणा आणि निष्ठा यांचा आव आणून लोकांचे समाधान करू पाहतात ते त्यांचं स्वतःची मूळ प्रवृत्ती गमावून बसतात.

जो स्वतःचा राजा असतो तो केव्हाही इतरांपेक्षा त्रिवार श्रेष्ठ असतो.

भरती आणि वेळ कोणासाठीही थांबत नाही.

काळ सर्वांना माणसाळतो.

सुविचार अनमोल वचन

मृत्यू आणि अंतविधीनंतर काळ सर्व गोष्टी मोठ्या करून दाखवितो. माणसाची कीर्ती तोंडातोंडी वाढत जाते.

जे जे दिसते ते काहीच शिल्लक न ठेवता काळ गिळंकृत करतो. तो मोठमोठ्या लोकांचीही गय करीत नाही. 

वेळ आपल्या विनाशी पंखाने एकसारखा पुढे पुढे जात असतो, आपल्या जगण्यातला प्रत्येक दिवस मृत्यूकडे नेत असतो.

तत्वज्ञानांच्या नजरेला धर्मगुरूंच्या दुर्गुणांपेक्षा त्यांचे सद्गुणच अधिक धोकादायक वाटतात.

उपकार घेणे म्हणजे स्वतःचे स्वातंत्र्य गमावणे होय.

राग म्हणजे दुसऱ्यांच्या चुकांकरिता आपल्यावर घेतलेला बदला होय.

स्वतःच्या अज्ञानाची जाणीव नसणे हेच अज्ञानी माणसाचे खरे दुर्दैव आहे.

एखाद्या गोष्टीची गुप्तता पाळणे हे स्वभावातच असावे लागते, कर्तव्य म्हणून नव्हे.

साधे जीवन जगणे हि जगातील सर्वात चांगली गोष्ट आहे.

इतरांना जे कठीण वाटते ते सहजासहजी करून दाखविणे हे बुद्धिमत्तेचे लक्षण असते.

खाणे मनुष्याच्या हाती आहे, पण ते पचविणे ही देवाची कृपा आहे.

चुका करणे हा माणसांचा, परंतु क्षमा करणे हा ईश्वराचा गुणधर्म आहे.

दुर्गुणांपासून पळणे ही सद्गुणांची सुरवात आहे.

स्वतंत्र लोकांना भीतीची बाधा होत नाही.

ईश्वर सतत कार्यरत आहे, म्हणजेच ईश्वर आपल्या सेवा करण्याची संधी सदैव उपलब्ध करून देत आहे यावर श्रद्धा ठेवणे होय.

महान काव्याची महान श्रोतृवर्गही हवा असतो.

सर्वात मोठे वरदान म्हणजे खरा मित्र लाभणे होय.

सदा श्रवण करणे, नेहमी विचार करणे, अव्याहत शिकणे असेल तर ते खरे जीवन जगणे होय.

श्रम करणे म्हणजेच प्रार्थना करणे.

दीर्घायुष्याकरिता संयमाने जगण्याची आवश्यकता आहे.

माता आणि पिता यांच्यावर प्रेम करणे हा निसर्गाचा पहिला नियम आहे.

चांगले बोलणे आणि वाईट तऱ्हेने जगणे ही मूर्ख फसवणूक आहे; त्यामुळे आपले स्वतःचेच नुकसान होते.

गोडी निर्माण करणे आणि उत्साह उत्पन्न करणे हे सोप्या पद्धतीने आणि यशस्वीरितीने शिकविण्याचे खात्रीचे मार्ग आहेत.

सहिष्णुता ही खऱ्याखुऱ्या संस्कृतपणाची द्योतक आहे.

खूप निष्काळजीपणा सारखाच अति भपकेबाजपणा म्हातारपणात सुरकुत्याच दाखवितात आणि म्हातारपणाच्या छटा तीव्रतेने दृष्टीस आणतात.

अधिक चिकित्सकपणा दुःख निर्माण करतो. अति बेपर्वाही गुन्ह्याला प्रवृत्त करतात.

आपण कोण आहोत हे परिक्षेवाचून काळात नाही, परीक्षा आपली पाळेमुळे खणून आपण कोण आहोत हे दाखवितात.

खरे सुख माणसाला दयाळू आणि शहाणे ठेवते. त्या सुखात दुसर्यांचा सहभाग असतो.

न पाहिलेल्या गोष्टीतच खरे सुख वास्तव्य करते.

सुखाची निर्मिती संयमातूनच होते.

१०८२. भविष्यकाळ कितीही सुखमय वाटत असला तरी त्यावर विश्वास टाकू नका. मृत भूतकाळाला पुरून टाका.

सत्य आपल्याकडे सावकाश व सावधगिरीने पावले टाकत येते.

सत्य कोणत्याही कसोटीला घाबरत नाही.

सत्य हे कल्पितापेक्षा फारच अद्भुत असते.

सत्य विश्वातील वस्तुस्थिती आहे, अंतर्मनातील अचूक न्याय. अमर प्रेम आहे.

सत्याला शपथांच्या आधाराची गरज नसते.

कलांकाचे बाण लागले की सत्य देखील मागे सरते.

यशस्वी माणूस होण्यासाठी धडपड करू नका, पण काहीतरी मूल्य असणारा माणूस होण्यासाठी प्रयत्न करा.

आपल्याला काय पाहिजे हे न कळणे आणि त्याकरिता मृत्यूस कवटाळणे, ही दुःखाची गोष्ट आहे.

अन्यायी शासन सर्वकाळ कधीही टिकत नाही.

अनैसर्गिक कृत्ये अनैसर्गिक त्रासाला जन्म देतात.

तुम्हाला भेटणाऱ्या प्रत्येकाशी तुम्ही जाणूनबुजून दयाळू राहिला नाहीत तर नकळत तुम्ही आयुष्याच्या प्रत्येक दिवशी निर्दयी ठराल.

आपण आपल्या क्षुद्र इंचांवर मत करावयाची ठरविली तरच त्या मार्गातून दूर होतील व आपल्याला विनाशातून वाचवतील.

निस्वार्थी महत्वाकांक्षा, उदात्त जीवनध्येये आणि निर्मळता यामुळे वैयक्तिक आणि सामुदायिक विचारांची सुंदर गुंफण होऊन खरा आनंद, जोम आणि चिरकालता मिळते.

निस्वार्थीपणाचा फायदा खूप होतो, फक्त त्याचे पालन करण्याचा धीर लोकांत नसतो.

साधनांचा उपयोग करा आणि ईश्वर आशीर्वाद देईलच.

उपयुक्ततेची किंमत शूरांच्या हातात असते.

संपत्ती म्हणजे शूरांच्या हातातील मौल्यवान गोष्ट होय.

पोकळ मतांची सर्वांवर हुकूमत असते.

जखमेमुळे धैर्य वाढते.

पोकळ गर्व माणसाला हास्यास्पद, खोट्या अभिमानास्पद आणि राक्षसी महत्वाकांक्षी बनवतो.

स्त्रीयांचे प्रेमाने जितके नुकसान होत नाही तितके ते पोकळ गर्वाने होते.

तुम्ही जे दुसऱ्या गोष्टींवर विजय मिळवितात, तेच तुम्ही तुमच्या भावना आणि राग लोभांवरही मिळवायला हवा.

सत्य हा नीतिमत्तेचा आत्मा होय.

मनाई केल्यामुळे दुष्कृत्ये हानिकारक ठरतात असे नाही, तर ती हानिकारक असल्यामुळे त्यांना मनाई केली जाते.

जी व्यक्ती अजून वृद्ध झालेली नाही तिच्याकडे उत्साह असतो आणि जी वयाने फार लहहन नाही तिच्याजवळ दूरदर्शित्व असते.

सत्याच्या तीव्र आस्थेला तिरसटपणा, महत्वाकांक्षा, अभिमान अशा एकशे एक गोष्टी आडव्या येतात.

सद्गुण आणि श्रीमंती क्वचितच एकाच व्यक्तीच्या जवळ असतात.

समर्थनाने सद्गुणांची किंमत कमी होते.

सद्गुण उदात्तपणाची पहिली पदवी आहे.

चांगली माणसे सद्गुणाला उत्तेजन देतात, परंतु दृष्ट माणसे त्यापेक्षा जास्त प्रमाणात सद्गुणाला छळतात.

सद्गुण कधीच वृद्ध होत नाही.

स्वातंत्र्याशिवाय सद्गुणांची काय किंमत?

आदर्श मन:चक्षुसमोर आणा, सतत इच्छा धारा, नांतर आत्मविश्वासाने त्याची अपेक्षा करा. नंतर तुम्हाला कळून येईल की अडचणींवर मत करणे हा एक चांगला खेळ आहे.

आनंदीवृत्ती आणि बुद्धिचातुर्य यामुळे व्यक्ती समाजात चमकते, पण नावीन्य नसलेले विनोद आणि मोठ्याने हसणे यामुळे ती व्यक्ती विदूषक बनते.

मानवी देहात सद्गुण आणि पाप या दोन्ही गोष्टी जन्मजातच असतात.

प्रतीक्षा ही निष्क्रियतेचे धोरण असू शकेल, पण त्याला प्रत्यक्ष कृती इतकीच ताकद लागते.

स्त्रीला जसे मातृत्व नैसर्गिक असते, तसेच युद्ध हे देशाला नैसर्गिक असते.

युद्ध हा मानवजातीला होणारा घातक साथीचा रोग आहे.

वेळेचा अपव्यव ही सर्वात मोठी उधळपट्टी व सर्व खर्चातील महागडी गोष्ट आहे.

सावलीचा पाठलाग करू लागले की आपण सर्व हसतो, परंतु असंख्यजण तेच करीत असतात.

आपण ज्यांना ओळखत नसतो त्यांच्यावर विश्वास ठेवण्यासाठी आपली तयारी असते, कारण त्यांनी आपणाला कधी फसविले नसते.

कायदेशीर गोष्टींनीच आपला निकाल लागत असतो.

आपल्याला वाटते त्यापेक्षा आपण खरोखर खूपच श्रीमंत असतो. सार्वजनिक जागा, रस्ते, पदपथ, अफाट आणि निरनिराळ्या तऱ्हेचा समुद्रकिनारा हे सर्व आपले असते.

नशिबाला पकडून त्याच्याशी झगडा केला तर आपल्याला नशिबाकडून पुष्कळ चांगले मिळविता येऊ शकेल.

आपण आपल्याला समजतो तितके कधीच सुखी किंवा दुःखी नसतो.

प्रत्येक गोष्ट करण्याचे सामर्थ्य आपल्यात नसते.

आपल्याला कोणी आपुलकी दाखविली तरच आपण त्यांच्या विषयी आपुलकी दाखवितो.

आपले कार्यच आपले नशीब असते. आपल्या नशिबाचे न्यायाधीच आपणच.

आपल्या वैयक्तिक संपत्तीत आपण भर घालू शकतो, तसेच अधूनमधून दुसऱ्या विषयीच्या थोड्याशा प्रशंसेने आपल्या खाजगी आनंदातही भर घालू शकतो.

जे आपल्याला माहित नसते त्याची आपल्याला इच्छा होत नाही.

आपण ज्याची इच्छा करणे योग्य नसते त्याचाच आपणाला लोभ असतो.

आपण आपल्या जीवनाचा मार्ग नेहमी निवडू शकत नाही, परंतु आपण मार्गाच्या सावलीच्या बाजूने चालायचे की उन्हाच्या याची निवड करू शकतो.

जो पर्यंत माणसाजवळ मोजण्यासारखे काही राहत नाही तोपर्यंत त्याच्या आयुष्याची वर्षे आपण मोजत नाही.

आपण श्रद्धेवर जगात असतो.

सत्य एका दृष्टिक्षेपात दिसते, पण चूक करणे सोपे असते म्हणून आपण चूक करतो.

वाईट लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला चांगले कायदे मिळत नाहीत, परंतु वाईट कायद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला चांगले लोक मिळतात.

आपल्या कालखंडाकडे दुर्लक्ष करून प्राचीन गोष्टींचे कौतुक करतो.

आपण बादलीभर सल्ला देतो, पण कणभर सल्ला दुसर्याकडून घेत नाही.

आपण काही व्यक्तींचा द्वेष करतो, कारण आपण त्यांना जाणून घेतलेले नसते आणि आपण त्यांचा द्वेष करतो म्हणूनच त्यांना जाणून घेऊ शकत नाही.

थोर दिवंगतांचे उदाहरण जिरुनच आपण त्यांचा जास्त सन्मान करू शकतो.

सुख निर्माण न करता ते उपभोगण्याचा आपल्याला हक्क नाही.

उद्याची आपल्याला काहीच माहिती नाही. आज चांगला आणि सुखमय कारण हे आपले काम आहे.

आपण क्रांती शोधून काढली पण ती पुढे कशी चालवावी हे आपणाला माहीत आहे.

आपण आपले भविष्य बनवितो आणि त्यालाच आपण आले नशीब म्हणतो.

आपल्याजवळ नेहमी गतस्मृती आणि ताज्या आशा असल्या पाहिजेत.

आपण आपले अपयश आणि दोष यांवरील टीका ऐकून घेतली पाहिज, स्तुती मात्र नव्हे.

तुकड्याशिवाय वस्तूचे मोल कळत नाही. विहीर कोरडी होईपर्यंत पाण्याचे मोल कळत नाही.

शेजाऱ्याकरिता आपणाला जेवढे चांगले काम करता येईल तेवढे करावे. जर आपण चांगले केले तर आपले चांगले केले जाईल. वाईट केले तर परतफेडीत वाईट केले जाईल. 

इतरांचा उद्धार करूनच आपण मोठे होऊ शकतो.

आपल्या मित्रांनी जसे वागावे असे आपणाला वाटते तसेच आपणही त्यांच्याशी वागले पाहिजे.

आपणाला क्वचितच अशी माणसे आढळतील, की जी सांगू शकतील की ते सुखी जीवन जगले, ते जीवनाबाबत समाधानी आहेत आणि ते जगाचा समाधानाने निरोप घेऊ शकतील.

आपले मन विचलित करणाऱ्या विचारात आपण कधीही गुंतू नये.

आपण आपले मन कणखर केले पाहिजे.

आपण आपले जीवन असे जगावे व कष्ट करावेत, की जे आपल्या पिढीच्या वाट्याला बी म्हणून आले त्याचे रूपांतर फुलांच्या बहरात केले असावे.

आपण आपल्या विचारांवर लक्ष ठेवले पाहिजे. जर दयेचे विचार केले तर दयामय कार्य होईल.

कधीकधी आपल्याला वाटते आपण स्तुतीचा नित्कर करतो, परंतु ज्या तर्हेने आपली स्तुती केली जात आहे त्याचा आपण तिटकारा करत असतो.

आपण आपले पहिले अर्धे आयुष्य जुन्या पिढीला समजावून घेण्यात आणि दुसरे अर्धे नव्या पिढीला समजावून घेण्यात खर्च करतो.

आपण असे समजतो कि आपली संस्कृती मध्यान्हाच्या शिखराजवळ पोहोचलेली आहे, परंतु अजूनही संस्कृतीची ही पहाटच आहे.

धोका न पत्करता मिळालेल्या आपल्या विजयला कीर्ती लाभत नाही.

स्वतःविषयी काहीही न बोलणाऱ्यापेक्षा स्वतःविषयी वाईट का होईना बोलावे.

दुःखाचे दुर्बलचा हे एक कारण आहे.

संपत्तीमुळे अनेक गोष्टींवर अधिकार मिळविता येतो, जसे फुरसत, दुसऱ्याला मदत करण्याची कुवत, ग्रंथ, कलेच्या गोष्टी, संधी आणि प्रवासाची साधने.

डोळ्यात श्रीमंती भरते, परंतु दारिद्र्य लपून राहते.

ज्याच्याजवळ नुसती संपत्ती असते ती त्याची नसते, परंतु जो तिचा उपभोग घेतो त्याची असते.

संस्कृतीचा जन्म संपत्तीतून होत नाही, परंतु संस्कृतीमुळे संपत्तीची निर्मिती होते.

हातातून गेलेल्या सुवर्णसंधीकरिता रडत बसू नका. प्रत्येक रात्री दिवसभरातील गोष्टी मी मनातून काढून टाकतो. सूर्योदयाच्या वेळी प्रत्येक जीव नव्याने जन्मतो.

रडल्याने दुःखाला उतार पडतो.

व्यक्तींचे मते मोजू नका त्यांचे महत्त्व बघा.

ज्या गोष्टीचे व्यक्तीला आकलन होत नाही ती त्याच्याजवळ असत नाही.

पत्नीला कशी ताब्यात ठेवावी ते ब्रह्मचाऱ्याशिवाय इतर कोणालाही जमत नाही ही केवढी खेदाची गोष्ट आहे.

पैश्याच्या नुसत्या राशीत काय सौंदर्य असू शकते?

ज्याच्यावर काहीच उपाय नाही ते तसेच सहन करावे.

कामूकपणातून बऱ्याच भयंकर गुन्ह्यांना जन्म मिळतो.

शिक्षण नेहमी काय करते? वळ्णावलनाने स्वछंद्पणे वाहणाऱ्या निरझारचे ते सरळ प्रवाहात रूपांतर करते.

गाढवाला जर सिंह म्हटले तरी त्यापासून चांगले काय होणार?

कीर्ती म्हणजे काय? तर केवळ एक पोकळ बुडबुडा होय.

माणसाचा खरा शत्रू कोण असतो तर तो स्वतःच असतो.

जर संगतीची गोडी नसेल तर गाण्यांच्या स्वरांचा काय उपयोग?

जे सोपे असते ते क्वचितच उत्कृष्ट असते.

निश्चय काय करू शकणार नाही?

असा आजार घालविणारे काही औषध आहे का, ज्यात प्रेमातून द्वेष निर्माण होतो आणि द्वेषातून प्रेम निर्माण होते.

जो एक दिवस देतो ते दुसरा दिवस घेऊन जातो.

मोठे जे करतात त्याच्याविषयी छोटे नुसतीच बडबड करतात.

जे करायचे आहे त्याचे शिक्षण ते प्रत्यक्ष केल्यानेच मिळते.

टप्प्याटप्प्याशिवाय कोणतीच जखम भरून येत नाही.

जे वाक्य दोनदा वाचले जाते ते लिहिण्यासाठी दोनदा विचार करावा लागलेला असतो.

तुम्ही काहीही करा, परंतु तुमच्या उत्पन्नाच्या चौकटीत जगा.

शुद्धीवर असलेल्या माणसाच्या जे मनात असते ते दारुड्याच्या जिभेवर असते.

विनाशाकडे जाणाऱ्यास सर्वजण मदत देऊ करतात.

आपल्या अपयशाबद्दल ज्या वेळी एखादी व्यक्ती दुसऱ्यांना दोष देते, त्या वेळी आपण तिच्या यशाचेही श्रेय इतरांना द्यावे ही कलपना किती उदात्त आहे.

जेव्हा एखादी व्यक्ती तुमचा सल्ल्ला मागते तेव्हा त्याला सर्वसाधारणपणे त्याच्या स्तुतीची अपेक्षा असते.

जर व्यक्तीच्या ज्ञानात सुसंगतपणा नसेल तर ज्ञान जितके जास्त तितका त्याचा गोंधळ जास्त असतो.

जेव्हा व्यक्तीच्या इच्छा अमर्याद असतात, तेव्हा त्याच्या कष्टाना शेवट नसतो.

जेव्हा चारित्र्याचा प्रश्न येतो तेव्हा कर्तव्याची आवश्यकता भासते.

जेव्हा राष्ट्रात संघर्ष होतात, तेव्हा असंख्य देशभक्त निर्माण होतात.

कलाकार जेव्हा विचार करू लागतो, तेव्हा त्याला कलेतील काही कळेनासे झाले आहे असे समजावे.

राग आला की बोलण्यापूर्वी दहापर्यंत व अति राग आला तर शंभरपर्यंत मोजा.

जेथे फुशारकी संपते, तेथे प्रतिष्ठा मिळणे सुरु होते.

दैवी चांगुलपणा अमलात आणला की जीवन आनंदमयी होते. आनंद ही चांगल्या माणसाची सामान्य स्थिती आहे.

जेव्हा व्यक्ती धर्मापासून स्वातंत्र्य होते, त्या वेळीच तिला साधारण आणि संपूर्ण जीवन जगण्याची संधी मिळते.

ज्या वेळी प्रत्येकजण चुकीचा स्टो, त्या वेळी प्रत्येकजण बरोबर असतो.

जेव्हा आपल्याला नशिबाची साथ मिळते, त्याचबरोबर लोकप्रियताही येते.

ज्यावेळी सन्मान नष्ट होतो, त्या वेळी मरण हे सुखाचे असते. अपकीर्तीपुढे माघार घेण्यासाठी मरण हा खात्रीचा मार्ग आहे.

मी जन्माला आल्यावर रडलो आणि पश्चाताप केला. आता मला रोज त्याचे कारण कळत आहे.

ज्याच्या घरी समृद्धी असते, तो नेहमीच बरोबर असतो.

महत्वाचे निर्णय घेतेसमयी माणूस एकटाच असतो.

जेव्हा स्वातंत्र्य जाते, तेव्हा जीवन निरस होते आणि त्यातील चैतन्यच नष्ट होते.

जेव्हा प्रेमळ स्त्रीला तिचा मार्ग हवा असतो, तेव्हा ईश्वरालादेखील नकार देणे कठीण जाते.

मी तरुण असताना विचार करायचा की, जीवनात पैसे ही महत्वाची गोष्ट आहे आणि आता म्हातारपणी मला कळते तसा तो आहेच.

जेव्हा एखादी व्यक्ती वीस वर्षाची होते, तेव्हा जागविषयीच्या कल्पना व आपण त्यावर काय परिणाम करू शकतो याचा विचार प्रामुख्याने येतो.

जेव्हा लोक मार्गापासून ढळू लागतात, तेव्हा त्यांना कुठे थांबायचे हे कळत नाही.

जेव्हा लोकांची अचानक भरभराट होते, तेव्हा ते हास्यास्पद सुद्धा होतात.

जेव्हा लोक तुम्हाला सांगतात की तुम्ही किती तरुण आहेत, तेव्हा ते हे सुद्धा तुम्हाला सुचवीत असतात, की तुम्ही वयस्कर आहात.

जेव्हा लोक त्यांच्या स्वातंत्र्यासाठी झगडत असतात, तेव्हा त्यांना विजयाच्या मोबदल्यात नवीन मालकाशिवाय काहीच मिळत नाही.

जेव्हा गरिबी दारात येऊन उभी राहते, त्या वेळी प्रेम खिडकीतून निघून जाते.

जेव्हा अंतःकरणात द्वंद्व सुरु होते, तेव्हा तो माणूस काहीतरी योग्यतेचा आहे असे समजावे.

जनतेवर जुलूम करायला कोणी नसला, की सार्वजनिक मत हेच जुलूम होते.

जेव्हा चंद्र नसतो, तेव्हा तुम्हाला ताऱ्याबरोबरच चालावे लागते.

जेव्हा आपल्याला प्रेमासाठी केलेली कृत्ये वाचावयाची असतात, तेव्हा आपण कोठे वळतो? अर्थात खुनाच्या स्तंभाकडेच.

जेव्हा आपण आपली दुःखे हलकी करू शकत नाही, तेव्हा आपण ती अंधारातच ठेवतो.

ज्यावेळी तुम्ही अत्युच्च स्थानावर जाण्याची महत्वाकांक्षा मनात ठेवता, त्या वेळी दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानावर जाण्यातही तुमचा सन्मान असतो.

जेव्हा दोन वाईटांतील एक कमी वाईट निवडता, तरीही वाईट ते वाईटच असते.

तुम्ही सकाळी उठल्यावर एखाद्याला शिक्षा करता, त्याची भरपाई तुम्हाला नंतर करावी लागते.

जेव्हा तुमचे नशीब साथ देत नाही, तेव्हा आधीचे सर्व विसरून जा आणि नव्याने आयुष्याची सुरुवात करा.

जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या मनात कटू भावना बाळगून असते, तेव्हा ती गोष्ट भावनात्मक प्रभावाचे चिन्ह असते.

जेथे सर्व स्वार्थी असतात, तेथे संत अज्ञानी माणसापेक्षा निराळा नसतो.

सामर्थ्य कुचकामी ठरत, तेथे धोरण यशस्वी होते.

जेथे मन निर्मळ असते, तेथे थोड्या शब्दांनी काम होते.

जेथे कायदा संपतो, तिथे जुलूमशाही सुरु होते.

जेथे मनाचे अस्तित्व नसते, तेथील निसर्ग उजाड असतो.

जेथे सैतान व्यक्तिश: जाऊ शकत नाही, तेथे तो मद्याला पाठवितो.

जेथे भय नसते, तेथे धर्मही नसतो.

जेथे तुमची संपत्ती असते तेथे तुमचा जीव असतो.

मातीचा घडा दगडावर आप्तो आगर दगड मातीच्या घड्यावर आप्तो, शेवटी घोड्याचे दुर्दैव.

जोपर्यंत तुरुंग आहेत, तोपर्यंत त्यात कोण जाईल ही बाब गौण आहे.

जगात सर्वात वाईट लोक कोण? ज्यांना आपली कर्तव्ये माहीत आहेत, परंतु ती ते पार पडत नाहीत.

सुरक्षिततेची आशा कोण करेल? कोणती पुरेशी सावधगिरी ठरू शकेल? त्यांना कितीही संरक्षण करण्याचा प्रयत्न केला, तरीही प्रत्येक क्षण दाब धरून बसलेला असतो.

झोपेविरुद्ध कोण झुंज देऊ शकेल? अशी ही महाकाया शांत वृत्तीची असते.

जे पैश्याच्या रूपात देऊ शकत नाही, त्यांनी मोबदल्यात श्रम द्यावेत.

ज्याची नीच व्यक्तीबरोबर मैत्री असते, त्यालाही लोक नीच कृत्यातला भागीदार समजतात.

जो सर्वांना देतो, तो कोणालाच काही देत नाही.

ज्याने राजदरबार पहिला, त्याने सर्व जग पहिले असे समजावे.

जो लांडग्याच्या संगतीत वाढलेला असतो, तो त्याच्याप्रमाणे आवाज काढायला शिकतो.

स्वातंत्र्य कोण असतो? स्वतःवर जो मनुष्य अधिकार गाजवू शकतो तो.

मातृभूमीवर प्रेम करीत नाही असा क्षुद्र मनुष्य कोण असेल?

मी कोण आहे हे मला कोण सांगू शकेल?

माणसात सर्वात सुखी कोण आहे? जो दुसऱ्याच्या गुणांची कदर करतो आणि त्यांच्या आनंदात आनंद मानत, जसा तो त्याचा स्वतःचाच आनंद आहे असे समजतो.

ज्याचे बागेवर प्रेम असते, त्याने स्वर्ग अजून गमावलेला नसतो.

पैशाशिवाय प्रेमापोटी जो लग्न करतो त्याच्या रात्री आनंदी व दिवस भिकार असतात.

समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजावण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. 

साधे राहणीमान, पण उच्च विचार.

कोणताही मनुष्य परिपूर्ण नसतो.

हळूहळू का होईना पण सातत्याने प्रगती केल्यास तुम्ही जिंकू शकता.

सामान्यज्ञान हीच खरी शक्ती आहे.

जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही.

संताप हा अग्नीसारखा माणसाला जाळतो.

शिक्षणावर केलेली गुंतवणूक उत्तम व्याज मिळवून देते.

यशाच्या प्रवासात उन्हाचे महत्त्व जास्त असते कारण सावली मिळाली की पावलं थांबतात.

दुःख सहन करणारा माणूस एक ना एक दिवस सुखी होतोच, परंतु दुःख देणारा माणूस कधीच सुखी होत नाही.

माणूस म्हणतो पैसा आल्यावरच मी काहीतरी करील, परंतु पैसा म्हणतो काहीतरी कर तरच मी तुझ्याकडे येईल.

एकटं उभं राहण्याची हिंमत ठेवा…कारण माणसं ज्ञान देतात साथ नाही.

दानापेक्षाही त्यागाने माणूस मोठा होतो.

आज का सुविचार

गर्वाने मित्र शत्रू बनतात.

सुख हे पैश्यात नसून संतुष्टात आहे.

जो मनाला जिंकतो तो जगालाही जिंकू शकतो.

विश्वास तुटला की नातं संपत.

मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा.

माणसं माणूस बघून माणुसकी दाखवत असतात.

आई-वडिलांची संपत्ती नाही तर त्यांची सावली आपल्या आयुष्यात महत्वाची असते.

जन्माला आल्यावरसुद्धा आपण काही घेऊन येत नाही आणि मेल्यानंतर सुद्धा काही घेऊन जात नाही… मागे उरते ती फक्त माणसाची माणुसकी.

उद्याच काम आज करा आणि आजच काम आत्ताच करा.

आपल्या वयापेक्षा मोठ्या व्यक्तींबरोबर मैत्री करा, अनुभव न घेताही खूप काही शिकायला मिळत.

आयुष्यात कोणत्याच गोष्टीचा गर्व नसावा कारण देव देऊ पण शकतो आणि घेऊ पण शकतो.

थोडा वेळ लागेल पण आपण चांगल्या भावनेनं पेरलेलं चांगलाच उगवत, मग ते आपलं कर्म असो किंवा अजून काही.

ओझं आणि मन अश्याच ठिकाणी हलकं करावं ज्याठिकाणी ते सुरक्षित राहील.

ज्याच्याजवळ निस्वार्थ अश्या माणुसकीचे धन आहे, त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कुठल्याच पद, प्रतिष्टेची किंवा पैश्याची गरज नसते.

नात्यांमध्ये भांडण होणं पण फार गरजेच असतं कारण तेव्हाच माहीत पडत, समोरचा व्यक्ती आपली किती कदर करतोय आणि आपल्याबद्दल काय विचार करतोय.

ओठांवर हसू होत, खांद्यावर ओझं होत पण बालपणी समाधान अधिक होत.

ज्यांचं भेटणं नशिबात लिहलेला असतं परमेश्वर त्यांची कोणत्या ना कोणत्या रूपात भेट घडवून आणत असतो.

आई शिवाय घर अपूर्ण असतं आणि वडिलांशिवाय आयुष्य. नाशिबावन आहेत ते सर्वजण ज्यांच्या डोक्यावर आई-वडिलांचा हात असतो.

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.

कदर करायला शिका, ना आयुष्य परत येतं ना आयुष्यातील माणसं.

माणसाने गरीब असले तरी चालेल पण स्वाभिमानी असावे.

आपण समजदारपणा घेतला की लोक त्याचा गैरफायदा घेतात.

माघार घ्यायच्या वेळेस माघारही घ्यावी लागते पण चूक नसेल तर कोणाला शरण जायचं नाही.

कोणतीही वेळ निघून जाते पण आपण वेळेला कोणाचे उपकार करून घेतले तर आयुष्यभरासाठी होतात.

मरावे परी किर्तीरुपी उरावे.

जो लग्न करतो त्याचे चांगले होते, जो करीत नाही त्याचे अधिक चांगले होते.

काहीच न करण्यापेक्षा थोडे करणारा जास्त उद्योगी असतो.

जो कधीच जिंकत नाही त्याचा हरण्याची प्रश्नच येतं नाही. जो चढत नाही तो क्वचितच पडतो.

जो शक्तीचा वापर करून विजय मिळवितो, त्याने शत्रूवर अर्धाच विजय मिळवलेला असतो.

ज्याला कीर्तीची उत्कंठा असते, त्याला थोडेच स्वास्थ्य लाभते.

ज्याला गुन्ह्यापासून फायदा असतो, तोच गुन्हा करतो.

जो शहाणपणाने वाद घालतो तो शहाणच असतो असे नाही. त्याचा अभिमान त्याच्या वादविवादात असतो, कार्य करण्यात नसतो.

जर आपणच आपले रहस्य राखले नाही, तर आपल्याशा दुसरा कोण प्रामाणिक राहू शकेल?

जो माझे धन चोरतो, तो कवडीमोलाची चोरी करतो.

जे स्वतःविषयीच पूज्यबुद्धि बाळगतात, त्यांना जग तुच्छ लेखते.

ज्यांचे समाधान सद्गुणाने होत, तो जनसमुदायास कसा खुश करणार? जनतेचे समाधान जिंकायला लबाडीचा करावी लागते.

जो दूरच प्रवास करू इच्छितो, तो आपल्या गोड्याला जास्त दमवीत नाही.

या क्षणी जो जिंकत असेल, तो नेहमी अजिंक्य राहील असे सर्वांना वाटते.

जी व्यक्ती दारूवर प्रेम करते तिच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही, कारण ती गुप्तता पळू शकत नाही.

माणसाचा खरा आनंद समाजात राहण्यात असतो,तर त्याला तुमच्या सहवासाचा त्रास कसा होईल?

सोसल्याने शहाणपण येते.

चाकोरीबाहेर जाऊन आपण भावी पिढीसाठी काही का करावे? भावी पिढीने आपल्यासाठी काय केले आहे?

दृष्टपणा हा दैन्य आणि लज्जा यांच्याबरोबरच दहशत, गडबड, पश्चाताप आणि अखंड चालणार गोंधळ यांचाही आश्चरकरीत्या कुशल कारागीर आहे.

इच्छाशक्ती सद्सद्विवेकबुद्धीचा प्रकार आहे.

हवेने पोकळ फुगे तर मताने मूर्ख फुगतात.

शहाणपण फक्त खरेपणातच सापडते.

थोडीशी विश्वासू माणसे सुज्ञ माणसांजवळ असतात, पण धूर्तांजवळ कोणीही नसतात.

इच्छा म्हणजे गरीब लोकांना कमीतकमी मिळणारे सुख असते.

ज्या माणसाला त्याची इच्छा आणि सामर्थ्य यांच्यामधील दरी माहीत असते तो सुखी होय.

ज्यावेळी द्वेषाच्या सहवासात चातुर्य राहू लागते, त्यावेळी त्या चातुर्याबाबत आदर राहत नाही.

श्रम हाच उन्नतीचा पाय आहे या कल्पनेबरोबरच श्रम हे मुक्त असले पाहिजेत, हा विचार पुढे येतो.

शेजाऱ्याच्या घरातून काढता पाय घ्या, नाही तर त्याला तुमचा तिटकारा येऊन तो तुमचा द्वेष करू लागेल.

श्रीमंत अंतःकरणाशिवाय संपत्ती कुरूप भिकाऱ्यासारखी असते.

भावनांच्या अधिष्ठानाशिवाय घर होऊ शकत नाही.

संपत्तीशिवाय नुसता मान म्हणजे व्याधी होय.

जन्मजात कार्यक्षमता नसेल तर नियम आणि कल्पना वापरून कार्यक्षमता येऊ शकत नाही.

कार्याशिवाय सर्व जीवन वाया जाते.

जेव्हा लोक तुझ्याबद्दल चांगले बोलतील तेव्हा तू संपलाच म्हणून समज.

स्त्रिया आणि हत्ती कधीही विसरत नाही.

स्त्रिया चित्राप्रमाणे असतात. जोपर्यंत सुज्ञ लोक त्यांची किंमत सांगत नाही, तोपर्यंत मुर्खांना त्यांची किंमत कळत नाही.

स्त्रिया घाव विसरतील, पण उपेक्षा विसरणार नाहीत.

भिंतींना कान असतात तश्या जंगलांना जिभा असतात.

एकदा उच्चरलेले शब्द परत मागे घेता येत नाहीत.

सारेजण धूलिकणचं असतात, परंतु काहीजण धुळीचे सुवर्णकण असतात.

तुम्हाला विरोध झाला तर नमते घ्या. नमते घेतल्याने तुम्ही जिंकता.

आपण गरीब लोकांसाठी काहीही करू, पण त्याची पाठ सोडणार नाही.

दृष्ट प्रवृतींसमोर नमु नका, परंतु अधिक जोमाने त्यांच्यावर हल्ला करा.

स्वतःजवळ ठेवलेल्या संपत्तीपेक्षा, दिलेल्या संपत्तीमुळे तुम्ही अधिक श्रीमंत होतात.

आज सकाळपेक्षा तुम्ही आज रात्री श्रीमंत ठरलं, जर दुसऱ्यातील सर्वात चांगल्या गोष्टी तुम्ही शोधल्यात आणि तुमच्यातील सगळ्यात चांगल्या गोष्टी दिल्यात तर.

ज्या गोष्टींची तुम्हाला मनापासून इच्छा असते त्यांवर तुम्ही चटकन विश्वास ठेवता.

तुम्ही सामर्थ्यवानाला दुर्बल बनवून दुर्बळाला सामर्थ्यवान बनवू शकत नाही.

तुम्ही स्वतः चांगले झालात तरच तुम्ही इतरांना जास्त चांगले बनवू शकता.

तुम्ही लोकांना शब्दांनी गर करू शकता.

हलक्या गोष्टींपासून तुम्ही भारी गोष्टी तयार करू शकत नाही.

तुम्ही दुसऱ्यांकडून माहिती घेऊन विद्वान होऊ शकता; पण तुम्ही स्वतःच्याच शहाणपणाने शहाणे होऊ शकता.

काटकसरीला नाउमेद करून तुम्ही भरभराट करू शकत नाही.

तुम्ही अन्याय केलात तर त्याची झालं तुम्हाला लागणारच.

काट्याच्या भीतीशिवाय तुम्ही गुलाब तोडू शकत नाही.

तुम्ही म्हाताऱ्या श्वानांना नवीन युक्त्या शिकवू शकत नाहीत.

तुम्ही एखाद्याला चूप बसविले म्हणजे तुम्ही त्याचे मतपरिवर्तन केले असे नाही.

ज्या गोष्टीवर तुमचा खरोखर विश्वास आहे त्यासाठी तुम्ही मरेपर्यंत लढू शकता, परंतु अश्या गोष्टी मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करा.

तुमच्या शारीरिक उपस्थिती बरोबरच तुमची मानसिक उपस्थिती सुद्धा धावत्या संधीचा फायदा करून घेण्यासाठी उपयुक्त ठरली पाहिजे.

तुमच्या मनावर चिरकाल परिणाम करणारे विचार हवे असतील, तर तुम्ही महान विचारवंतांच्या ग्रंथांचे वाचन करून विचार आत्मसात करावयास पाहिजेत .

इतर कोणत्याही सामाजिक कामापेक्षा बक्षीस देण्याची जी धोकादायक कला आहे तिच्यात जास्त सावधानी बाळगावी लागते.

तुम्हाला एखाद्या व्यक्तीची पारख करावयाची असेल तर त्याचे शत्रू आणि मित्र कोण आहेत यावरून करता येईल.

तुम्ही स्वतः मोठे असाल तर कोणतेही कर्तव्य तुम्हाला लहान समजणार नाहीत.

जेव्हा तुम्ही गुन्ह्याला शासन करत नाहीत, अश्या वेळी तुम्हीच गुन्हेगार ठरू शकता.

तुम्हाला खात्री आहे तुम्ही बरोबर आहेत? किती चांगले आणि पक्के! परंतु तुमची पक्की खात्री असूनही तुम्ही चुकत असाल.

तरुण परीक्षा करण्यापेक्षा शोध लावण्यास जास्त योग्य असतात. सल्ला देण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करण्यात हुशार असतात. चालू व्यवसायापेक्षा नवीन योजना आखण्यात हुशार असतात.

तुमच्या मनाचा कलच तुमची निवड असू शकते.

तरुण व्यक्तींना दूरदर्शी होण्याइतके ज्ञान नसते, म्हणून तरुण व्यक्ती अशक्य ते करण्याचा प्रयत्न करतात आणि सध्याही करतात. हीच प्रार्थना पिढ्यानपिढ्या चालू आहे.

तुमचा लहान मुलगाच फक्त तुमच्या लोकसत्ताक राज्याचा पुरस्कर्ता असतो.

तारुण्य म्हणजे प्रेम.

तुम्ही सातत्याने जो विचार करता त्या विचारांच्या दर्जावर तुमच्या चालीरीती अवलंबून असतात, कारण विचारांचे जे स्वरूप असते त्याचीच रंगरंगोटी तुमच्या आत्म्याने केलेली असते.

तारुण्य अविचारी, मध्यमवय संघर्ष, वृद्धत्व पश्चाताप आहे.

तुमच्या दुय्यम दर्जाचे काम दुसऱ्याच्या दुय्यम दर्जाच्या कामापेक्षा चांगले नसते.

तरुणपण बेताल चैनीत घालविले, की म्हातारपणी त्रास होणारच.

चांगल्याचे मागे कोणी पळत नाही, परंतु वाईटाच्या मागे सर्व पळतात.

जगासमोर कितीही चांगले पणाचा देखावा केला तरी कर्म हे कर्म असतात ते आज ना उद्या भोगावेच लागतात.

आयुष्य हे एकदाच मिळते त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये आनंदी राहायला शिका.

चुकीला कारणं देता येतात कर्माला नाही.

माणसं आणि नाती जपायची असतात , वापरायची नसतात.

मनापासून मन जपणारी माणसं मोजकीच असतात.

चांगले कर्म करत राहा, त्याचे फळ आपोआप मिळेल.

मदतीसाठी पुढे केलेला हात, हाताने केलेल्या कामापेक्षा मोठा असतो.

आयुष्यात झालेल्या जखमा स्वतःलाच बऱ्या करता यायला हव्यात.

पाऊस प्रत्येकासाठी सारखाच असला तरी प्रत्येकाचं भिजणं वेगळा असतं.

मन मोठं असला की सर्व सामावून घेता येत.

कसलाही विचार न करता साथ देणारे मोजकेच असतात.

जपायला यायला हवी मग ती आवड असो किंवा निवड.

अपयश आलेल्या माणसाला शब्दांची नाही सोबतीची गरज असते.

बरेचदा सर्वजण दिसण्याला महत्त्व देतात, पण वेळ आल्यावर त्यांना हे पण काळात दिसण्यापेक्षा असणं महत्वाचा असतं.

दहा वेळा हरला तरी चालेल पण एकच विजय असा मिळवा की लोकं नेहमी लक्षात ठेवतील.

आनंद पैश्यांवर नाही तर परिस्थितिवे आवलंबून असतो.

प्रत्येक गोष्टीची नक्कल करता येते, पण चारित्र्य आणि ज्ञानाची नक्कल करता येत नाही ती कमवावी व मिळवावी लागते.

दुःख हे आयुष्याचा एक भाग आहे हे वास्तव्य स्विकारलं की जीवन जगण्याचं ओझं वाटत नाही.

बाप गरीब असेल तर मुलं लवकर मोठी होतात.

एखाद्याच कौतुक किती करायचं तेवढा करा पण अपमान विचारपूर्वक करा, कारणं अपमान हे कर्ज आहे जे प्रत्येकजण संधी मिळाल्यावर व्याजासह फेडतो.

पुस्तके आणि चांगली माणसं लगेच कळत नाहीत, त्यांना वाचावं लागत.

स्वतःच्या खिश्यात लाखो रुपयांचा खळखळाट असावा पण त्यामागे रुपयाचाही कोणाचा तळतळाट नसावा.

पैज लावायची झाली तर स्वतःशीच लावा कारणं जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकेल आणि हरला तर स्वतःचा अहंकार हरेल.

मदतीची परतफेड करता नाही आली तरी चालेल पण मदत करणाऱ्याला कधी विसरू नका.

ज्ञान म्हणजे आपण काय करू शकतो याचे भान आणि भान म्हणजे आपण कधी काय करू नये याचे ज्ञान.

 

सर्वश्रेष्ठ सुविचार

सर्वश्रेष्ठ सुविचार

मंगलाष्टक / mangalashtak / tulsi vivah mangalashtak

।। श्री ।।

मंगलाष्टक / mangalashtak

संस्कृत भाषेतील महत्त्वाची मंगलाष्टके / sanskrut bhashet mangalashtak

 

स्वस्ति श्रीगणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं ।

बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणि स्थेवरं ।।

लेण्याद्रीं गिरिजात्मकं सुरवरदं विघ्नेश्वरं ओझरं ।

ग्रामो रांजण संस्थितं गणपतिः कुर्यात् सदा मंगलम् ।।

शुभ लग्न सावधान ।। १ ।।

कस्तुरीतिलकं ललाटपटले वक्षःस्थले कौस्तुभं ।

नासाग्रे वर मौक्तिकं करतले वेणुःकरे कंकणम् ।

सर्वांगे हरिचंदनं सुललितं कंठेच मुक्तावली ।

गोपस्त्रीपरिवेष्टितो विजयते कुर्यात् सदा मंगलम् ।।

शुभ लग्न सावधान ।। २ ।।

गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा ।

कावेरी शरयु महेन्द्रतनया चर्मण्वती वेदिका ।

क्षिप्रा वेत्रवती महासुरनदी ख्याता गया गंडकी ।

पूर्णा पूर्णजलैः समुद्रसहिता कुर्यात् सदा मंगलम् ।।

शुभ लग्न सावधान ।। ३ ।।

रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे ।

रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः ।

रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं ।

रामे चित्तलयः सदा भवतु मे कुर्यात् सदा मंगलम् ।।

शुभ लग्न सावधान ।।४ ।।

कंठे यस्य विराजते हि गरलं शीर्षेच मंदाकिनी ।

वामांके गिरिजाननं कटितटे शार्दूलचर्मावरम् ।।

माया यस्य रुणद्धि विश्वमखिलं तस्मै नमः शंभवे ।

सस्थाणुः स्थिर भक्तियोग सुलभः कुर्यात् सदा मंगलम् ।।

शुभ लग्न सावधान ।।५ ।।

या कुंन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।

या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।।

या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वंदिता ।

सा मां पातु सरस्वती भगवती कुर्यात् सदा मंगलम् ।।

शुभ लग्न सावधान ।। ६ ।।

यं ब्रह्मा वरुणेंद्ररुद्रमरुतः स्तुन्वंति दिव्यैस्तवैः ।

वेदैः सांगपदक्रमोपनिषदैर्गायंति यं सामगाः ।।

ध्यानावस्थितद्गतेन मनसा पश्यंति यं योगिनो ।

यस्यांतं न विदुः सुरासुरगणा कुर्यात् सदा मंगलम् ।।

शुभ लग्न सावधान ।। ७ ।।

अंबा अष्टभुजा त्रिलोकजननी देवी कुलस्वामिनी ।

आली लग्नघरा निवास करण्या आवाहना ऐकुनी ।।

आता तीच उभी मुठीत मिटल्या घेऊनिया अक्षता ।

माते हो वरदायिनी वधुवरा, कुर्यात सदा मंगलम् ।।

शुभ लग्न सावधान ।।८ ।।

वधु वर चिंतन शुभलन सावधान मंत्र शुभलग्न सुलग्न सावधान

सावधान 

श्री

 

इष्टदेवता कुलदेवता ग्रामदेवता चिंतन सुमुहर्त सावधान ।।

लक्ष्मीनारायण-चिंतन सुलग्न सावधान ।।

ब्रह्मसावित्रि चिंतन सुलग्न सावधान ।।

उमामहेश्वरचिंतन सुलग्न सावधान ।।

जयघंटाशब्दप्रमाण सुलग्न सावधान ।।

अति समीप शुभ लग्न सुलग्न सावधान ।

अंतःपट दृढ असिजे सुलग्न सावधान ।।

अति सुलग्न चिंतन सावधान ।।

आली लग्नघटी समीप नवरा घेऊन यावा घरां ।

गुह्योक्तें मधुपर्कपूजन करा अंतःपटाते धरा ।।

दृष्टादृष्ट वधुवरां न करितां दोघे करावी उभीं ।

वाजंत्री बहु गलबला न करणें लक्ष्मीपते मंगलम् ।।

कुर्यात सदा मंगलम् ।।

तदेव लग्नं सुदिनं तदेव ।

ताराबलं चंद्रबलं तदेव ।

विद्याबलं दैवबलं तदेव ।

लक्ष्मीपते तँऽघ्रियुगं स्मरामि ।।१ ।।

(वाजंत्री वाजवून या ठिकाणी अक्षता पूष्पे वर्षाव करणे.)

tulsi vivah mangalashtak / mangalashtak lyrics / marathi mangalashtak / tulsi vivah mangalashtak marathi / mangalashtak marathi

 

उखाणे | उखाणे पुरुषांकडून घेतली जाणारी नावे | marathi ukhane

उखाणे | उखाणे पुरुषांकडून घेतली जाणारी नावे | marathi ukhane

उखाणे | उखाणे पुरुषांकडून घेतली जाणारी नावे | marathi ukhane

१)   दारी होते अंगण अंगणात होता बदाम….च्या हाती संसाराचा लगाम.

२)   भाजीत भाजी मेथीची…. आहे माझ्या प्रितीची.

३)   बांबुची काठी त्याला लोखंडाचा भाला…. ने खूण केली फिरावयास चला.

४)   चांदीचा पाट त्याला सोन्याचे ठसे…. ला पाहून चंद्र सूर्य हसे.

५)   शोकेसच्या कपाटात ठेवला पैका…. चे नाव घेतो सर्वजण ऐका.

६)   चांदीची सायकल सोन्याचे सीट…. चल जाऊ दोघेजण डबल सीट.

७)   शंकराच्या पिंडीला नागाचा वेढा…. चे नाव घेतो माझी वाट सोडा.

८)   पांडूरंगाच्या देवळाला सोन्याचा कळस….चे नाव घ्यायला मला नाही आळस.

९)   चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण…. चे नाव घेवून सोडतो आता कंकण.

१०)  गव्हात गहू बन्सी, तांदुळात आंबेमोहर…. चे नाव पटकन घेतो सांगितल्याबरोबर.

नावरदेवसाठी मराठी उखाणे

११)  नाशिकची द्राक्षे नागपूरची संत्री…. आहे आजपासून माझी गृहमंत्री.

१२)  काश्मीरच्या नंदनवनात गुलाबाचा गंध…. च्या जीवनात मला आहे आनंद.

१३)  देवाच्या देवळात मखमली पडदा…. नाव घेतो, बोला पुंडलीक वरदा.

१४)  आजचा शुभदिन उद्याची कशाला बात…. च्या बरोबर केली संसाराला सुरूवात.

१५)  लग्नानिमित्त मला आली आहे ग्रीटींग तार…. चे नाव घेतो घाई आहे फार.

१६)  आमच्या घरी आहे आज सत्यनारायणाची पूजा…. माझी राणी, मी तिचा राजा.

१७)  संसार रूपी सागरात पती पत्निची नौका…. नाव घेतो सर्वजण ऐका.

१८)  पिक्चरमध्ये पिक्चर जॉनी मेरा नाम…. चे नाव घेतो आता तुमचे काय काम.

१९)  काश्मीरच्या नंदनवनात गुलाबाचा गंध…. च्या जीवनात मला आहे आनंद.

२०)  खडीसाखरेचा खडा, खावा तेव्हा गोड…. च्या रुपात नाही कुठेच खोड.

लग्नासाठीचे उखाणे

२१)  चंद्र आहे चांदणीच्या संगती…. आहे माझी जीवनसाथी.

२२)  ताऱ्यांचं लुकलुकणं चंद्राला आवडलं….ला जीवनसाथी म्हणून निवडलं.

२३)  देवाजवळ करतो मी दत्ताची आरती…. माझ्या जीवनाची सारथी.

२४)  दही, चक्का, लोणी आणि तूप…. मला आवडते खूप खूप.

२५)  आई-बाबांच्या शिरावर सेवेचं तोरण बांधीन…. बरोबर सुखाने मी संसार करीन.

२६)  हिरवा चुडा, मंगळसूत्र गळ्यात, नेसलाय हिरवा शालू…. उभी आहे मैत्रिणींच्या मेळाव्यात, कसा मी तिच्याशी बोलू.

२७)  भरल्या पंगतीत उदबत्तीचा वास…. ला देतो जिलबीचा घास.

२८)  हत्तीच्या अंबारीला मखमली झूल, माझी…. नाजूक जसे गुलाबाचे फूल.

२९)  संसाररूपी संसारात पती-पत्नीची नौका…. चे नाव घेतो सर्वजण ऐका.

३०)  श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनूची रंगत न्यारी…. साठी केली लग्नाची तयारी.

ukhane marathi

 

३१)  वाटीत वाटी सोन्याची…. माझ्या प्रीतीची

३२)  काश्मीरच्या नंदनवनात फुलतो निशीगंध…. सोबत जीवनात मला आहे आनंद.

३३)  भारत देश स्वतंत्र झाला, इंग्रज गेले पळून… चे नाव घेतो जरा पहा मागे वळून.

३४)  ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल…. चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.

३५)  आपल्या देशात करावा हिंदी भाषेचा मान… चे नाव घेतो, ऐका सर्व देऊन कान.

३६)  नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री…. आजपासून माझी गृहमंत्री.

३७)  शंकरासारखा पिता अन् पार्वतीसारखी माता.. राणी मिळाली, स्वर्ग आला हाता.

३८)  इंद्राची इंद्राणी, दुष्यंताची शकुंतला…. नाव ठेवले माझ्या प्रिय पत्नीला.

३९)  गुलाबाचे फूल गणपतीला वाहिले…. च्या प्रेमासाठी…. गाव पाहिले.

४०)  हिऱ्याचा कंठा, मोत्याचा घाट…. च्या हौशीसाठी सगळा थाट.

marathi ukhane for male

 

४१)  चाकणच्या किल्ल्यावर ठेवल्या फौजा,…. च्या जीवावर…. मारतो मौजा.

४२)  टाळ-चिपळ्यांचा गजर, त्यामध्ये वाजे बीणा…. चे नाव घेतो सर्व जयहरी म्हणा.

४३)  बांबूची काठी, त्याला लोखंडाचा भाला….. नी खूण केली फिरावयास चला.

४४)  शृंगारलेला हत्ती मांडवामध्ये झुले…. वर प्रीतीची उधळितो फुले.

४५)  भारतीय संस्कृतीचे प्रतीक अजिंठा-वेरूळ लेणी…. आहे माझ्या हृदयाची राणी.

४६)  पुढे जाते वासरू, मागे जाते गाय…. ला आवडते दुधावरची साय.

४७)  जिजाईसारखी माता, शिवाजीसारखा पुत्र…. गळ्यात बांधतो मंगळसूत्र.

४८)  वीजनिर्मितीसाठी कोयनेला बांधले धरण….चे नाव घेतो आज आहे कारण.

४९)  विजेचे नर्तन, ढग करती गडगड…. चे नाव घेताना, माझी होई गडबड.

५०)  उगवला सूर्य, मावळती रजनी…. चे नाव सदैव माझ्या मनी.

ukhane

 

५१)  सनई आणि चौघडा वाजतो ताल सुरांत…. चे नाव घेतो…. च्या घरात.

५२)  मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा…. चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.

५३)  पाण्यात भरला कलश, त्यावर आंब्याची पाने- फुले…. चे नाव घेताना चेहरा माझा खुले.

५४)  आपले कल्याण आपल्याच आहे हातात…. चे नाव घेतो मित्रांच्या गोतावळ्यात.

५५)  गृहिणीशिवाय घर म्हणजे अगदीच अरण्यासमान…. चे नाव घेऊन राखतो तुमचा मान.

५६)  स्वप्नातल्या सुखामुळे कोणीही होत नाही राजा…. चे नाव घेतो, पहिला नंबर माझा.

५७)  द्राक्षाच्या वेलीवर त्रिकोणी पान….. चे नाव घेऊन राखतो आपला मान.

५८)  तूप, साखर, पोळी…. माझी अगदीच भोळी.

५९)  नाव घे, नाव घे चा करू नका गजर…. चे नाव घ्यायला मी आहे हजर.

६०)  ज्ञान आणि योग याच्या पेक्षा श्रेष्ठ आहे भक्ती आमच्या संसारात मी शिव तर…. माझी शक्ती.